Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

15 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 १५ ऑक्टोबरप्रार्थना -

 सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना...


श्लोक - ॐ असतो मा सदगमय । तमसो मा ज्योतिर्गय । मृत्योर्मामृतं गमय । ॐ शांतिः शांतिः शांतिः ।। हे परमात्मन्, आम्हाला तू असत्याकडून सत्याकडे ने. अंधारातून (अज्ञानातून) प्रकाशाकडे (ज्ञानाकडे) मरणाकडे जाणाऱ्या मार्गावरून अमरतेच्या मार्गानेच ने. सर्वत्र शांतीचे 


चिंतन - जे सहजगत्या रुजते त्याला कोणीही पाणी घालील, पंरतु जे सुकू पाहतंय, कोमेजायला लागलंय त्याला खतपाणी घालून ते फुल आगळा अवर्णनीय आनंद प्राप्त होतो. मुलांच्या विकासाच्या बाबतीतही हेच तत्व लागू पडते. वर्गात सर्वच मुले भिन्नभिन्न कुवतीची, क्षमतेची, भिन्न आर्थिक परिस्थितीतून आलेली असतात. सर्वच मुलांना प्रगतीची दिशा दाखविण्याची जाबाबदारी शिक्षकाची, त्याने म मुलांच्या प्रगतीतले अडथळे अचूकपणे हेरण्याची आणि समस्येवर मात करण्याची जिद्द मुलांमध्ये निर्माण करण्याची गरज असते.


 

कथाकथन 

 - कथाकथन - भा. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम - (जन्म १५ ऑक्टो १९३१) अनि संशोधक म्हणून जगविख्यात डॉ. ए. पी. जे (अब्दुल पाकिर जैनुलाबदिन) अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ साली दक्षिण भारतातील रामेश्वर याच छोटयाशा बेटावरील गावात मध्यवर्गीय तामिळनाडू नावाड्याच्या अल्पशिक्षित कुटुंबात झाला. चिकट पार्श्वभूमीतून, व्यक्तिगत आणि व्यवसायिक परिस्थितीशी झगडा देत डॉ. कलाम ज्या उंचीवर पोहचले !! त्या प्रवासाची ही कथा आहे. तशीच संरक्षण तंत्रज्ञानातील स्वयंपूर्णतेसाठीच्या स्वतंत्र भारताच्या लढ्याचीही ही कहाणी आहे. सर्वधर्म समभावाची शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर ठसलेली होती. प्राथमिक शिक्षण आटोपताच पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते. त्याआधी भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी मद्रास (चेन्नई) इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. तेथे त्यांनी एरोडायनॅमिक्सचा परिचय करून घेतला व उड्डाणाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला. पण हवाईदलात त्यांना प्रवेश मिळाला नाही. पुढे ते संरक्षण आणि उत्पादन विभागाचे प्रमुख बनले व १९५८ साली ज्येष्ठ वैज्ञानिक सहाय्यक बनले. संपूर्ण देशांतर्गत बनावटीच्या हॅवरक्रप्टचा आराखडा तयार करून तो संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना दाखविला व एक वर्षात त्यांनी हॅवरक्रॅफ्ट त्यांना तयार केली. पण पुढे डॉ. विक्रम साराभाई यांच्याशी त्यांचा स्नेह जमला. अमेरिकेत टिपू सुलतानच्या युद्धतंत्रातील एक अग्नीबाण पाहून त्यांनी अग्नीबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरू केले. रोहिणी या उपग्रहाने सुरू झालेला हा प्रयत्न पृथ्वी, अग्नी, नाग, आकाश अशी विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तयार करून थांबला. त्यांचा वैज्ञानिक प्रवास आता उपग्रहांपर्यंत पोहोचला आहे. डॉ. साराभाई, प्रा. मेनेन, डॉ. वसंतराव गोवारीकर, डॉ. राजा रामण्णा, डॉ. धवन, डॉ. ब्रह्म प्रकाश यांचे कर्तृत्व व सहकार्य यांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. " मला भाषण करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी २५ हजार कि. मी. च्या वेगाने जाणारा अग्नीबाण बनवायला सांगा. ते जमेल. "एका सभेत ते उद्गारले. इंदिरा गांधींसह त्या सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. सन १९९८ मध्ये त्यांनी परमाणू बाम चे संशोधनाचे यशस्वी नेतृत्व केले. त्यामुळे पूर्ण जग आश्चर्यचकित झाले. त्यावेळेसचे प्रधानमंत्री श्री. अटलबिहारी वाजपेयी हे त्यांच्या संशोधनावर खूप खूष झाले. डॉ. कलाम यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले असून १९९७ ला भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार देवून गौरन्वित केले. पुढे दि. २५ जुलै २००२ रोजी त्यांची १२ राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या महान कार्यातून जगाला निरंतर प्रेरणा ऊर्मी मिळेल असे हे विश्वविख्यात व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तिमत्वास त्रिवार वंदनवंदन व मानाचा मुजरा. 


→ सुविचार 

• असाध्य ते साध्य । करिता सायास तुका म्हणे ।। • एखादी गोष्ट साध्य होत नाही असे नाही, मात्र ती साध्य न होणारी गोष्ट साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी, कल्पकता यांची अत्यांतिक गरज असते. → दिनविशेष - 

 • सम्राट अकबर जन्मदिन - १५४२ : भारतातील मोगल साम्राज्यातील सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणजे अकबर होय. यांचा जन्म १५४२ मध्ये राजा हुमायून वनवासात असताना झाला. परंतु जन्म वनवासात होऊनही आपल्या बुध्दिसामथ्र्यनि सर्व संकटांवर मात करून राज्यकारभाराची घडी व्यवस्थितपणे बसविली ती अवघ्या १३-१४ व्या वर्षी आणि पुढे मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत मोठे व सर्व सामर्थ्यशाली साम्राज्य बनविले. साम्राज्य विस्तार करूनही सर्व थरांमध्ये लोकप्रिय असणारा हा एकमेव मोगल सम्राट. सर्वधर्म सहिष्णुता हे त्याच्या राज्याचे वैशिष्ट्य होते. सर्व धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून त्याने दीन-ए-इलाही हा नवा धर्म स्थापन केला. आग्रयाचा लालकिल्ला व फतेहपूर सिक्री हे शहर अकबरानेच स्थापन केले. तानसेन, बिरबल यासारख्या दुर्मिळ नररत्नांनी भूषित अकबराचा नवरत्न दरबार हा आजही नावाजला जातो अत्यंत कार्यक्षम व प्रजाहितदक्ष असणाऱ्या नृपसम्राटाची शेवटची वर्षे मात्र खडतर अवस्थेत गेली. २७ ऑक्टोबर १६०५ मध्ये याच अवस्थेत त्याची प्राणज्योत मालवली

 

 → मूल्ये 

 • सर्वधर्मसमभाव.

 • संशोधनात्मवृत्ती

 • सर्जनशीलता 

 

→ अन्य घटना

 • भूतपूर्व १२ वे राष्ट्रपती भा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस - १९३१ 

 • शिर्डीच्या साईबाबांचा निर्वा दिन - १९९८.

 • मुंबईत पहिले नागरी विमान आले - १९३२.

 • कर्मवीर दादासाहेब गायकवाड जन्मदिन - १९०२.० वीर हुतात्मा किसन अहिर जन्म - १९१५ 

 

→ उपक्रम 

• अकबर बादशहाच्या नवरत्न दरबारासंबंधी माहिती मिळवा. 

 

→ समूहगान

 • झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान.... 


 

→ सामान्यज्ञान 

- मुंग्यांना स्पर्शज्ञान व गंधज्ञान यामुळे विशिष्ट वास कळतो. त्यांच्या मिशांसारख्या अँटिनाद्वारे त्या हे ज्ञान ग्रहण करतात. अँटिनावर स्पर्शज्ञानाचे दोनशे आणि गंधज्ञानाचे दोन हजार बिंदू असतात. • कापड छपाई - विणलेल्या कापडावर शोभादायक नक्षी करण्याच्या पध्दतीला कापड छपाई म्हणतात. छपाईत कापडाच्या मूळ रंगापेक्षा एक किंवा अधिक रंग वापरण्यात येतात. रंजनक्रिया ही छपाईहून भिन्न आहे. रंजनक्रियेत कापडाचे मूळ धागेच एकसारखे रंगवून मग ते विणण्यात येतात. विणलेले कापडही रंगवितात, तर कापड छपाईत कापडावर निराळी नक्षी। | उठवतात. कापड छपाईसाठी ठसा, जाळी व रुळ या पध्दती मुख्यतः वापरण्यात येतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा