Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

9 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

                 9 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

→ प्रार्थना 

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.... 


→ श्लोक 

- क्षमातुल्यं तपो नास्ति न संतोषात् परं सुखम् । न च तृष्णापरो व्याधिः न च धर्मो दयापरः ॥ 

- क्षमेसारखे तप नाही, संतोषापेक्षा मोठे सुख नाही, लोभासारखा रोग नाही आणि दयेपक्षा मोठा धर्म नाही. जय सावित्री 

 

→ चिंतन

  - दुर्बल मनुष्याला कोणत्याही कार्यात यश येणे शक्य नाही. मनाचा दुबळेपणा हा साऱ्या गुलामगिरीचा मूळ पाया आहे. दुबळेपणा म्हणजे खरोखर साक्षात मृत्यूच. दुबळेपणा हेच दुःख, सुदृढता हेच जीवित. मनोबल हेच सुख सर्वस्व. हेच चिरंतन जीवित, हेच अमरत्व.

कथाकथन 

लेल गेलं, तूप ये एक गाव होतं. त्या गावात एक ब्राह्मण होता. त्याचे नाव होत अनंत त्या गावात देवी एक मोठं देऊळ होतं. अनंतभट त्या देवीचे पुजारी होते. रोज सकाळीच ते देवळात जायचे. साफसफाई करवून घ्यायचे. देवळाच्या मागे असलेल्या विहिरीवर आंघोळ करून मग देवीची पूजा करायचे. संध्याकाळीही परत अनंतभट देवळात जात. देवीची आरती करत. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी बरीच माणस देवळात हजर असतं. टाळ, घंटा टाक्या यांच्या निनादात सारे देऊळ गर्जून जाई. आरतीच ताट मग सगळ्यांपुढे फिरवले जाई. लोक आरती घेत. आपल्या आणि पोरांच्या चेहन्यावरून भक्तीभावाने हात फिरवत. देवाकडे कृपादृष्टीची याचना करत. एखादे नाणे खणखण आवज करत आरतीच्या ताटात टाकत. सगळ्यांमध्ये फिरून आरतीचे ताट अनंतभटांकडे परत येई. तेव्हा त्या ताटात बरीच नाणी जमलेली असत. ती भटजींची रोजची कमाई असे. आरतीच्या ताटात जमलेली सगळी नाणी भटजींनी आपल्या खिशात घातली. देवीला नमस्कार केला. मग गाभान्याला कुलूप लावून ते बाहेर सभामंडपात आले. तिथे कोपन्यात देवाची काही भांडी पडली होती. त्यातल्या धुपाटण्याकडे भटजींच लक्ष गेलं. अरेच्या ! फारच काळं झालं आहे हे धुपाटणं ! भटजी स्वतःशीच म्हणाले. साफ करण्यासाठी ते धुपाटणं घरी न्यायचं त्यांनी ठरवलं. ते हातात उचललं अन् ते देवळाच्या बाहेर पडले. भटजी आपल्याच नादात चालले होते. किसनशेठच किराणामालाचं दुकान समोर आलं तसे ते एकदम थबकले. 'काय वर आणायला सांगितलं होतं | आपल्याला या किसनशेठच्या दुकानातून ?' ते आठवू लागले. मग सकाळी बायकोशी झालेला संवाद त्यांना आठवला. त्यांची बायको रमाबाई सकाळी त्यांना निघताना म्हणाली होती, 'आज तेल अन् तूप दोन्ही संपलंय. संध्याकाळी घरी याल तेव्हा किसनशेठच्या दुकानातून अगदी नक्की घेऊन या हं.' भटजींनी "बर बरं" "बरं बरं नका करू नुसतं नक्की आणा. अगदी आठवणनं.' तेलही अन् तूपही रमाबाईंनी बजावलं होत. किसनशेठचं दुकान पाहून भटजींना एकदम त्याची आठवण झाली. ते थबकले, 'या, या गुरुजी' किसनशेठनं आपले ओठ फाकवून रुंद हास्य करत गुरुजींना आत बोलावलं. अहो या अनंतभट' अनंतभट आत, दुकानात गेले. 'अहो, काय हवंय तुम्हाला?' 'मला ना... मला थोडं तेलं हवं होतं.' अहो, मग घ्या की. त्यात काय एवढं ! किती देऊ सांगा?" "द्यां? आपलं पाव लिटर.' 'बरं बरं हे घ्या' 'ऑ' किसनशेठनं तेलाच माप पुढे केलं पण ते कशात घ्यायचं. भटजींना प्रश्न पडला. 'कशात ओतू?" किसनशेठनं विचारलं 'अं!' भटजी गोंधळलेलेच होते. पण एकदम त्यांना धुपाटण्याची आठवण झाली. त्यांनी पटकन ते पुढं केले. 'यात या, ' किसनशेठनं तेल त्यात ओतलं. 'आणखी काय हवंय !' 'तूप' 'तूपहोय. हे घ्या.' भटजींनी धुपाटणं पटकन उलटं केले. दुसऱ्या बाजूला खोलगट भागात तूप | घेतलं. पण उलटं केल म्हणून तेल सांडून गेलं होतं. भटजी गोंधळले. 'असं कसं झालं? तेल कसं सांडलं ?' ते पाहण्यासाठी त्यांनी पुन्हा धुपाटणं उलट केलं. | आता तुपाची बाजू खाली गेली अन् त्या मुळे तुपही सांडले, भटजीबुवा गोंधळून उभे होते. त्यांच्या हातात होतं रिकामं धुपाटणं. किसनशेठ म्हणाले, 'अरेरे! तेल गेलं तूप गेलं, हाती धुपाटणं फक्त राहील!"

सुविचार

 एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय. कोणतेही काम निष्ठेने, एकाग्रतेने, काळजीपूर्वक करावे.

→ दिनविशेष

 हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन - १९४२: म. गांधींच्या चलेजाव चळवळीने देशभर जनआंदोलन उसळले, प्राणापेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचे ही लोकांची मनोभूमी तयार झाली. गावगावातून चलेजावचे नारे घुमू लागते, तिरंगी झेंडे घेऊन मिरवणुका निघू लागल्या. त्यातून लहान मुलेही मागे राहिली नाहीत. धुळे जिल्ह्यातील नंदुरबार गावतील शिरीषकुमार व त्यांचे चार मित्र ही अशीच छोटी मुले. शिरीषकुमारच्या हाती तिरंगा घेऊन 'वंदे मातरम्' घोषणा देत मुले मिरवणुकीच्या अग्रभागी निघाली. पोलिसांनी बंदुकीची भीती दाखवली पण शिरीषकुमार न भिता तिरंगा झेंडा उंचावून वंदे मातरम् घोषणा मुख्य ठेवली. क्षणार्धात बंदुकीच्या गोळीने छोटा शिरीषकुमार धारातीर्थी पडला. सालदास, धनसुख, घनश्याम आणि शक्तीधर या त्याच्या मित्रांनीही एकेकांच्या हातून झेंडा घेत छातीवर गोळी झेलली. छोटी मुझे पण स्वातंत्र्याच्या इतिहासात आपल्या बलिदानाने अमर होऊन गेली.

मूल्ये 

 देशभक्ती, साहस, त्याग,

अन्य पटना

जागतिक तत्त्वज्ञ टॉलस्टॉय यांचा जन्मदिन १८२८

उपक्रम

  शिरीषकुमार व त्याच्या मित्रांची गोष्ट अधिक माहिती मिळवून सांगा. 

→ समूहगान 

जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता...

→ सामान्यज्ञान 

• भुंगा - भारतात यांच्या १८ जाती आढळतात. भुंग्यांचा रंग चमकदार व काळा असतो. डोके, छाती व पोट यावर बिंदुवत खळगे असतात. भुंगा आपले घरटे वाळलेल्या लाकडाला भोक पाडून व क्वचित पोकळ खोडात करतो. भोकामध्ये कप्पे असून त्या कप्यात मध व पराग यांचा साठा केलेला असतो. प्रत्येक कण्यात एक अंडे असते. भुंगा आपल्या लांब जिभेने परागकण गोळा करीत असल्याने फुलांच्या परागीभवनास मदत होते. तो उडताना मागे-पुढे जात असतो व दिवसभर गुंजारव करीत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर हिंडत असतो. • योग जगातील सगळ्या उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात हा प्राणी आढळतो. बहुतेक गोमा दिवसा जमिनीच्या, दगडधोंड्याच्या किंवा पालापाचोळ्याच्या खाली खडकांच्या भेगात किंवा घरांच्या काळोख असलेल्या कोपऱ्यात राहतात, पण रात्री भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडतात. धडाचा पहिला आणि शेवटचा खंड वगळून जवळजवळ प्रत्येक खंडावर पायांची एक जोडी असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा