७ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो.....
→ श्लोक
- प्रारंभी पणती करू गणपती, विद्या- दया सागरा। अज्ञानव हरुनि, बुध्दि मति दे, आराध्य मोरेश्वरा । चिंता, क्लेश, दुःख, दारिद्र्य देशांतरा पाठवी । हेरंबा, गणनायका, गजमुखा, भक्तां बहु तोषवी ॥
- आम्ही आधी विद्येचा व करुणेचा सागर असा जो श्रीगणेश, त्याला नमस्कार करतो. हे पूजनीय गजानना, आमचे अज्ञान दूर कर: आम्हाला ज्ञान ग्रहण करण्याची आणि विचार करण्याची शक्ती दे. आमच्या सर्व चिंता, यातना, दुःखे व दारिद्र्य नाहीसे कर. हे गणनायका, हेरम्बा, आम्हाला तुझ्या या बालभक्तांना सतत प्रसन्न ठेव.
→ चिंतन - मनुष्याच्या अंतःकरणात परमेश्वराने प्रेरिलेल्या न्यायोपसानेमुळे पुढे-मागे जगास असा दिवस खास येणार की, ज्या वेळेस राष्ट्राराष्ट्रांमधलाच काय पण स्त्री-पुरुषांमधला सुध्दा व्यवहार संमतीने चालणार आहे - आगरकर
कथाकथन -
- 'जो नम्र झाला भुतो, देणे कोडिते अनंता संत तुकाराम - अल्बर्ट श्वाइटझर एक महान भूतदयावादी होता. सर्व प्राणी मात्रावर जर त्याचे प्रेम होत. एकदा तो आपल्या मित्राबरोबर एका गावी चालला होता. त्यावेळे गाडी, घोडे, टांगे, बस, टॅक्सी अशी वाहने सक्ती, स्टेशनही दूर होते. त्यांनी एका काठीला आपले सामान बांधले व दोघांनीही आपल्या खांद्यावर काठीची दोन टोके ठेवून से स्टेशनकडे निघाले. गाडी स्टेशनात होता. पण गाडी चुकू नये म्हणून दोघही जलद गतीने स्टेशनाकडे जात होते. मित्र पुढे होता. अल्बर्ट मागे होता. स्टेशन इष्टीच्या टप्यात येताच मित्राने आपल्या चालीचा वेग थोडा वाढविला. मित्राला अकस्मात जोराचा धक्का लागला, आणि सारे सामान जे काठीच्या मध्यावर होते ते सरकून मित्राच्या डोक्यावर आले. तो पडता पडता थोडक्यात बचावला. त्याने घाबरून अटला विचारले, "मित्रा! काय झाले रे?" अल्बर्ट म्हणाला, "मला क्षमा कर बाबा! हा वध रस्त्यावर किडा पडला आहे. कोणाच्या तरी पायाखाली चिरडून मरून जाईल. त्याला बाजूला करण्यासाठी मी जरा दूर सरकलो. माझा तोल गेला नि सारे ओझे तुझ्या खाद्यांवर पडले. जरा थांब, मी या किड्याला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवतो, एवढे बोलून एका लहानशा काडीने त्याने काला रस्त्याच्या कडेला ठेवले नि तो कोणाच्या पायाखाली येणार नाही याची खबरदारी घेतली. आणि मग दोघेही पळतच स्टेशनवर गेले तेव्हा कुठे त्यांना गाडी मिळाली. आपली जीवनात नेहमी धावपळ चाललेली असते. आपली जीवनात नेहमी धावपळ चाललेली असते. कॉन्फ्यूशंस नावाचा असाच एक थोर तत्वज्ञ होता. अनेक लोक त्याला सल्ला मसलत विचारायला येत. 'आपल्या जीवनातील अडी-अडचणी सांगत. तोही त्यांना मार्गदर्शन करी. एकदा एका माणसाने त्याला विचारले, "दीर्घायुषी कोणाला म्हणायचे?" कॉन्फ्यूशसने मंद स्मित हास्य केले व म्हणाला, "जरा माझ्याजवळ ये," तो जवळ आला, कन्फ्यूशंस म्हणाला, "माझ्या तोंडात पहा." म्हणून त्याने आपले तोंड उघडले. "मला जीभ आहे ना?" कॉन्फ्युशसने विचारले. "हो, जीभ आहे." ठीक, "आता मला दात आहेत का पहा". त्या माणसाने पुन्हा वाकून पाहिले. पण त्याला एकही दात दिसला नाही. तो म्हणाला, "दात तर एकही दिसत नाही. कॉन्स्युशस म्हणाला "जीभ तर दातांच्या अगोदर जन्माला आली होती. ती अजूनही शाबूत आहे. दात गेले तरी जीभ शाबूत आहे, याचे कारण तू सांगशील का?" तो माणूस गोंधळून गेला. त्याला काही उत्तर सुचले नाही. मला काही उत्तर सुचत नाही, " तो म्हणाला. कॉन्फ्युशस म्हणाला, “जीभ कोमल आहे. दात कठीण असतात. ज्या अंगी कोमलता असते, नम्रता, दया असते तो दीर्घायुषी होतो." अल्बर्ट श्वाइटझर असो वा कॉन्फ्युशियस असो, थोर हृदयाची माणसे जगात नेहमी नम्रतेने वागतात. किडा-मुंग्याची काळजी घेतात. त्यांची हृदये भूतमात्रांविषयीच्या प्रेमाने भरलेली असतात. ती जगातून निघून गेली तरी जग त्यांची आठवण काढते. तुकोबारायांनी म्हटले आहे, "जो नम्र झाला भूतां तेणे कोडिले अनंता 'l
- सुविचार
- • वादळात मोठ-मोठी झाडे ताठ असल्यामुळे तुटून पडतात व इवलेसे गवत झुककल्यामुळे (नम्रतेमुळे) त्याचे काहीही नुकसान होत नाही. -
• अहंकारापेक्षा ममतेचे मोल महान आहे.
• सत्याच्या पुजाऱ्याने जमिनीवरील धुळीइतके विनम्र असले पाहिजे. सत्याचरणाने त्याची विनम्रता वाढत जाते.
→ दिनविशेष
• शरदत्वंद्र बोस जन्मदिन - १८८९. आझाद हिंद सेनेचे सेनापती सुभाषचंद्र बोस यांचे बंधू म्हणजेच शरदचंद्र बोस बोसबंधूंनी आपले पूर्ण जीवन देशासाठीच समर्पित केले. वकिलीचे शिक्षण पूर्ण करुन त्यांनी वकिलीला सुरुवात केली. बघता बघता उत्कृष्ट वकील म्हणून बंगालभर त्यांचा लौकिक पसरला. परंतु भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी स्वतःला झोकून दिले. काँग्रेसमध्ये प्रवेश करुन बंगाल विधानसभाही अमोघ वक्तृत्वाने गाजविली. |ते क्रांतिकारकांचे मित्र आणि मार्गदर्शक होते. सुभाषचंद्रांच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी सर्वतोपरी ते झटले. स्वतंत्र भारतात मिळणारे मंत्रीपदाचे मानाचे स्थान नाकारून समाज सुधारणेचे व्रत चालू ठेवले. 'द नेशन' आणि 'महाजाति' अशी दोन वृत्तपत्रे ते चालवीत असत. झुंजार पत्रकार, उत्कृष्ट वकील, श्रेष्ठ राजकारणी, सुधारक, समाजसेवक म्हणून आयुष्यभर कार्यरत असणारा हा व्रती २० फेब्रुवारी १९५० रोजी अचेतन झाला.
→ मूल्ये
ज्ञाननिष्ठा, देशसेवा
→ अन्य घटना
• महाराष्ट्रातील पहिली स्वदेशी बँक 'बँक ऑफ इंडिया' स्थापना - १९०६
• वीर उत्तमराव मोहीते जयंती (१९१०)
→ उपक्रम
• सुभाषचंद्र व शरच्चंद्र बोस यांच्या चरित्र्यातील निवडक प्रसंग सांगा.
→ समूहगान
धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर...
→ सामान्यज्ञान
• धाम हे आपल्या शरीरातील वातानुकूल यंत्रणेचे साधन आहे. घाम उष्णता कमी करून शरीराचे तापमान थंड करण्यास मदत करते. • सामान्यतः वीस डिग्री सेंटिग्रेड हे तापमान आल्हाददायक मानले जाते. या तापमानात मानवी शरीर उत्साहाने काम करू शकते. वातानुकूलन यंत्राने बरेचदा तापमान कायम राखले जाते. चाळीस सें. ग्रेडपेक्षा जास्त उष्मा त्रासदायक ठरतो. तर पंधरा से. ग्रेडपेक्षा कमी तापमानात थंडी वाजायला सुरुवात होते. सभोवतालचे तापमान, हवेतील बाष्प, शारीरिक श्रम, शरीरातील उष्णतेमध्ये होणारी वाढ/घट व भावनेचा उद्रेक यावर घाम स्त्रवण्याची क्षमता अवलंबून असते. उन्हाळ्यात घाम फार येतो. शारीरिक श्रम केल्यास हिवाळ्यातही घाम येतो. भीतीमुळेही घाम येतो..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा