Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

3 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

3 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना 

ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय... 

श्लोक

 - एकेनापि सुपुत्रेण विद्यायुक्तेन भासते । कुलं पुरुषसिंहेन, चंन्द्रणेव हि शर्वरी । एका चंद्रामुळे रात्र उजळून निघते. तसेच एक जरी विद्याविभूषित सुपुत्र असला तरी तो पुरुषसिंह सबंध कुलाला प्रकाशित करतो.

 → चिंतन

  अपयशी होण्यामध्ये कधीही मोठेपणा नाही, पण अपयशातून पुन्हा यशाकडे वाटचाल करण्यात निश्चितच मोठेपणा आहे. हाती घेतलेल्या कामावरील श्रध्दा, एकाग्रता, प्रयत्नांची चिकाटी एक ना एक दिवस यश मिळवून देईल. प्रत्यक्ष यश मिळविण्यापेक्षाही त्या मार्गावरील खडतर वाटचाल सातत्याने करीत राहणे जास्त महत्त्वाचे आहे. 

कथाकथन 

:- न मातुः पर दैवतम् मुलांनो, मी तुम्हाला मातृपूजनाचे महत्व मातृदिनाच्या पर्वावर समजावून सांगणार आहे. खास तुमच्या साठी आईची महती मुक्त कंठाने गाणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील आईला एक विलक्षण असे स्थान आहे. आई हा शब्द जरी आपण उच्चारला तरी आपले हृदय आनंदाने भरून येते, हा आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. तेवणारी शांत शीतल वात ही जशी समईतील प्रकाशाची जागा आहे तशी आपल्या आयुष्यातली आई ही एक आत्यंतिक प्रेमाची खूण आहे. अगदी खरे सांगायचे तर भारतीय संपन्न संस्कृती ही मूलतः मातृपूजक संस्कृती आहे. सिंधू काळापासून मातृपूजनाचा दिव्य आविष्कार प्रगट झालेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये काय, तर मानवी आविष्कारात प्रगट झालेल्या देहधारी मातेला आपण देवतेच्या अत्युच्च पदावर नेऊन ठेवले आहे. आपली प्राचीन संस्कृती म्हणते की, व मातुः पर देवतम्। मातेसारखे अजोष्ट असे दैवत मानवी आयुष्यात दुसरे कुठलेही नाही. तुम्हाला खरे सांगू का? निर्गुण निराकार भगवंताने आईच्या रुपाने देहधारी आकार घेतला. प्रेमाने इतके भारलेले सुंदर रूप या विश्वात दुसरे कुठलेही नाही. अगदी लहान वयापासून आपण समजून काय घ्यायचे तर आईच्या रुपाने परमेश्वर आपल्या भोवती भोवती अष्टौप्रहर वावरतो आहे. आपल्या प्रत्येक सुखाला सुंदर आकार देणारी आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक लहान मोठया यशाला आनंदाने ओंजळीत घेणारी फक्त आपली आईच असते. आपल्याला काही दुखापत झाली, बरे वाटेनासे झाले तर दुःखाने गदगदून येणारी आणि रात्र आपल्या उशाला बसून आपली काळजी घेणारी ही आपली प्राणप्रिय आई ही खरेतर परमेश्वरच आहे, याची तीव्र जाणीव होणे आवश्यक आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभावीण प्रीती। मनामध्ये कसलाही हेतू न ठेवता केवळ प्रेम अर्पण करणारी आपली आई। म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला कृतज्ञतेचा परमोच्च बिंदू आहे. मानवी मनाने अंतःकरणपूर्वक पूजा करावी अशी एकमेव देवता म्हणजे आई..... मुलानो, म्हणून मी तुम्हाला वारंवार एकच सांगते की अखंड मातृपूजनातच केवळ दंग रहा. तिचीच गाणी गा. आयुष्यातला एकही क्षण मातृस्मरणाव्यतिरिक्त घालवू नका. एक कायम पण लक्षात ठेवा. मातेला पर्याय नाही. आईसारखे दुसरे दैवत नाही. तला अर्पण करू देया यज्ञामुळे तु मला काही देणार आहेस का? देत असशील तर...हे आई! मलाप्रत्येक लहान मोठया यशाला आनंदाने ओंजळीत घेणारी फक्त आपली आईच असते. आपल्याला काही दुखापत झाली, बरे वाटेनासे झाले तर दुःखाने गदगदून येणारी आणि रात्र आपल्या उशाला बसून आपली काळजी घेणारी ही आपली प्राणप्रिय आई ही खरेतर परमेश्वरच आहे, याची तीव्र जाणीव होणे आवश्यक आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभावीण प्रीती। मनामध्ये कसलाही हेतू न ठेवता केवळ प्रेम अर्पण करणारी आपली आई म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला कृतज्ञतेचा परमोच्च बिंदू आहे. मानवी मनाने अंतःकरणपूर्वक पूजा करावी अशी एकमेव देवता म्हणजे आई .... मुलानो, म्हणून मी तुम्हाला वारंवार एकच सांगते की अखंड मातृपूजनातच केवळ दंग रहा. तिचीच गाणी गा. आयुष्यातला एकही क्षण मातृस्मरणाव्यतिरिक्त घालवू नका. एक कायम पण लक्षात ठेवा. मातेला पर्याय नाही. आईसारखे दुसरे दैवत नाही.

सुविचार 

• हे आई! माझी अपवित्रता तुला अर्पण करू देया यज्ञामुळे तु मला काही देणार आहेस का? देत असशील तर हे आई! मला आत्मविजय मिळू दे. हे आई! मला सर्व सिध्दी प्राप्त होऊ दे. हे आई! माझ्यात शांती आणि शक्तीचा संचार होऊ दे. हे आई! मला आनंदमय बनवून सत्याचा विजय माझ्या हातून होऊ दे. हे आई! माझ्यात आणि सर्वत्र प्रभुसत्ता स्थापन होऊ दे. हे आई! माझा अहंकार आणि मोह तुला अर्पण करतो. गुरूपेक्षा श्रेष्ठ, आकाशापेक्षा उंच, सागरापेक्षा अथांग आईचे वात्सल्य असते. 

दिनविशेष

 - • अँडरसन कार्ल डेव्हिड जन्मदिन - १९०५. हा अमेरिकन पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ. त्याचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत शिक्षण घेतल्यावर तेथे त्याने अध्यापनाचे काम सुरू केले. बाह्य अवकाशातून पृथ्वीकडे येणाऱ्या अतिशय भेदक | किरणांमुळे विश्वकिरणांमुळे वातावरणात निर्माण होणाऱ्या विद्युतभारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणाऱ्या कणांचा त्यांनी १९३० मध्ये अभ्यास सुरू केला. या कणांमुळे चुंबकीय क्षेत्रात होणाऱ्या बदलाच्या दिशेचे निरीक्षण करून अँडरसन यांना त्या विद्युतभाराचे चिन्ह ठरविणे शक्य झाले. १९३२ मध्ये त्यांना विश्वकिरणांमध्ये नेहमीच्या ऋण विद्युत्भारित इलेक्ट्रॉनशिवाय धन विद्युत्भारित इलेक्ट्रॉन असतात, याचा सबळ पुरावा मिळाला. या नवीन कणाला “पॉझिट्रॉन” असे नाव देण्यात आले. या शोआकरिता अँडरअन यांना १९३६ मध्ये व्हिक्ट हेस चा दुसऱ्या शास्त्रज्ञाबरोबर नोबेल पारितोषिक विभागून | देण्यात आले. १९३७ मध्ये विश्वकिरणासंबंधी संशोधन करीत असताना त्यांनी व नेडरमेयर यांनी मेसॉन या मूलकणाचा शोध लावण्यात यश मिळविले. 

मूल्ये 

• विज्ञाननिष्ठा, अभ्यासूवृत्ती.

अन्य घटना 

• अॅनी बेझंट यांनी होमरूल लीगची चळवळ सुरू केली - १९१६

 • केडगावचे नारायण महाराज यांचे देहावसान - १९४५.

  • शे. का. के.तर्फे पुणे करार विरोधी सत्याग्रह, नागपुर- १९४६ 

  • प्रख्यात तबलावादक खानुमाय पर्वतकरांचे निधन - १९५३.

   • थोर आध्यात्मिक विचारवंत दत्ता बाळ यांचे निधन १९८२. 


उपक्रम 

 • नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांची माहिती गोळा करा.

 → समूहगान

  बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.... 

सामान्यज्ञान

 • अंटार्क्टिका हे खंड सतत हिमाच्छादित असते. प्रचंड हिमसाठयामध्ये हे भूखंड पृथ्वीच्या कवचांमध्ये दाबले गेले असून त्या दाबामुळे | काही ठिकाणी सागरी पातळीपेक्षाही भूकवच खाली गेलेले आहे. हे जगातील सर्वांत उंच खंड आहे. ते सरासरीने समुद्र सपाटीपासून २१००-२४०० मी. (७००० ते ८००० फूट) उंच आहे. मात्र त्यावरील खंडीय हिमवाह नाहीसा झाला तर त्याची उंची फक्त ४६० मी. (१५०० फूट) होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा