4 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना.....
→ श्लोक -
विद्या नसे ज्या तप, दान नाही । न ज्या गुण, ज्ञान, न शील काही । न धर्म, भूमीप्रति भारकारी पशूच तो मानव देहधारी ।।
ज्या मनुष्यापाशी विद्या, तपश्चर्या, दातृत्व, ज्ञान, शील, सद्गुण व धर्माचरण नाही, तो मनुष्य या भूमीचा भारच समजावा. मनुष्यरूपात तो अगदी पशूच असतो.
→ चिंतन
- व्यक्तित्वाच्या सर्व गरजा भागाव्या आणि त्याचा सर्वोत्कृष्ट फायदा राष्ट्राला किंबहुना सर्व मनुष्यजातीला मिळावा एवढ्यासाठी कसलीही ब उच्चनीचत्वाच्या भावनेने कृत्रिमपणे लादू नयेत. कृत्रिमपणे लादलेल्या बंधनांनी विकसित होणारे व्यक्तित्व खच्ची होऊ लागेल. अशा अने खच्ची होऊ पाहणाऱ्या व्यक्तित्वांचा परिणाम राष्ट्रांवर अहितकारक असा होईल.
→ कथाकथन
कुरुप उंट' एक उंट होता. त्याला एक वाईट सवय होती. तो नेहमी इतर प्राण्यांच्या रुपाची टिंगल करत असे. तो एकाही प्राण्या || कधी चांगले बोलायाचा नाही. तो गाईला म्हणायचा, “जरा तुझ्या रुपाकडे पाहा. किती कुरुप आहेस तू ! तुझी हाड कोणत्याही क्षणी कातडी फाडून ||येतील असंच मला वाटतं." तो म्हशीला म्हणायचा, “तू देवाचा नक्कीच काही तरी अपराध केला आहेस, म्हणून त्याने तुला काळ्याकुट्ट कोळश्याच्या रंगविले आहे. तुझी वाकडी शिंगे तुझ्या कुरुपपणात भरच टाकतात. " तो हत्तीला म्हणायचा,”" तू तर सगळ्या प्राण्यांमध्ये गबाळा प्राणी आहेस. काही तरी गंमत करून पाहावी म्हणूनच देवाने तुला बनवले आहे. शु शरीराचे अवयव किती मोठे आहेत ! तुझ्या या अगडबंब देहाची शेपूट मात्र पिटुकली आहे. तुझे डोळे मण्यांसारखे अगदी बारीक आहेत, तर सुपाएवढे मोठे. तुझी सोंड, पाय आणि सुळे याबद्दल मी काही बोलू नये हेच बरे.” तो पोपटाला म्हणायचा,“ तुझी बाकदार चोच लालभडक करून देवाने तुझी मोठी गंमतच केली आहे.” अशा प्रकारे उंट प्रत्येक प्राण्यांची दि करायचा. एकदा उंटाला एक कोल्हा भेटला. कोल्हा अगदी स्पष्ट बोलणारा आणि फटकळ होता. उंटाने त्याला काही बोलण्यापूर्वीच तो म्हणाला, "ए दुसऱ्यांची टिंगल करण्याची वाईट सवय सोडून दे. एकदा तुझ्या रुपाकडे तरी बघ! हे तुझे लांबोडे तोंड, दगडांसारखे डोळे, पिवळेधमक दात, वेडेवाकड काठ्यांसारखे पाय आणि पाठीवरचे हे ओंगळवाणे कुबड ! सर्व प्राण्यांमध्ये तूच सर्वात ओंगळ प्राणी आहेस. इतर प्राण्यांमध्ये एखाद-दुसरी गोष्ट व असेल, पण तुझ्यातील वाईट गोष्टींची गणतीच करता येणार नाही." उंटाने शरमेने मान खाली घातली आणि तो काहीही न बोलता निघून गेला.
→ सुविचार
• दुसऱ्यांच्यातील दोष पाहण्याआधी स्वतःतील दोष पाहावेत.
→ दिनविशेष
भारताचे पितामह दादाभाई नौरोजी जन्मदिन १८२५. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतात विषमता व निरक्षरता दूर करण्यासाठी झगडणारे व त्यासाठी आयुष्यभर तळमळीने कार्य करणारे दादाभाई नौरोजी है या देशातील सर्व A चळवळीची प्रेरक शक्ती होते. 'रास्त गोफ्तार' म्हणजे 'खरी बातमी' या वर्तमानपत्रातून भारतातील बेकारी व दारिद्र्याला इंग्रजांची शोषणनीती आहे. असे त्यांनी ठामपणे सतत मांडले. १८९२ साली पहिले भारतीय सभासद म्हणून ते इंग्लंडच्या लोकसभेत निवडून गेले. भारतीय काँग्रेसचे ते होते. १९०६ साली काँग्रेसच्या व्यासपीठावरून भारतीय स्वराज्याची घोषणा त्यांनी प्रथम केली. दि. ३० जून १९१७ हा दादाभाईंचा स्मृतिदिन
→ मूल्ये
देशप्रेम, समाजसेवा
→ अन्य घटना
शिवाजी महाराज व मुघल सम्राट यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला १६६५
• समता संघाची स्थापना - १९२७
• हिंद सियारामशरण गुप्त जन्मदिन - १८९५
• लॉर्ड बेडेन पॉवेल यांनी सुरु केलेल्या बालविर चळवळीचा पहिला मेळावा भरवत - १९०९
• असहकारिता चळवळीस कोलकता येथे प्रारंभ १९२०
→ उपक्रम
• दादाभाई नौरोजींच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांकडुन लिहून घ्या.
→ समूहगान हिंद देश के निवासी, सभी जन एक है....
→ सामान्यज्ञान -
• जगातील सर्वात
• उंच पर्वत हिमालय भारत ८८६३ मी २९०७९ फूट -
- • मोठे वाळवंट - सहारा उत्तर आफ्रिका ८४,००,००० चौ.मी.
• उंच धबधबा - अँजेल - व्हेनेझुएला - ९७९ मी. ३,२१२ फूट
• लांब नदी - नाईल - उत्तर आफ्रिका ६६७०कि.मी. ४,१४५
• मोठे बेट - ग्रीनलंड
• २१,७५,००० चौ. कि.मी.८,४०,०५ चौ. मैल ३२,५०,००० चौ. मैल
• लांब पर्वत - अँडीज - द. अमेरिका ८,९०० कि.मी. ५,५०० पे
• मोठे महानगर - टोकियो - जपान - १,९०,४०,००० लोकसंख्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा