Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

17 सप्टेंबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 


प्रार्थना

राम रहीम को भजनेवाले, तेरे है बड़े खुदा या... 

श्लोक

 [दृष्टिपूतं न्यसेत्पाद, वस्त्रपूतं पिबेन्जतम् । शास्त्रपूतं वदेदावर्य, मनःपूतं समाचरेत् । 

नीट पाहून पुढे पाय टाकाया यस्थाने गाळून स्वच्छ व शुद्ध केलेले पाणी प्यावे. शास्त्राचा आधार पूर्ण विचार करून जे योग्य वाटेल ते आचरावे, जय सावित्री 

चिंतन 

स्वभूमीत स्वलोकात स्वधर्मात आणि स्वाचारात राहून अविचारी व अज्ञान देशांच्या निदेश किंवा कधी भांडून कधी युक्तीवाद करून लाडीगोडी लावून अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्याची सुधारणा करणे यातच खरी देशप्रीती खरी बंधुता, खरे शहाणपण व खरा पुरुषार्थ आहे. आगरकर 

कथाकथन

 ज्यात सर्वाचंच भलं आहे... 

मृत्यूनंतर एका माणसाला यमाने विचारले 'सुता स्वर्गात जायचंय का नरकात जायचंय?" निर्णय घेण्यापूर्वी मला दोन्ही बघता येईल का, असं त्या माणसाने विचार बनाने प्रथम त्याला नरकात नेले. तिथे एका प्रशस्त दालनात मध्यभागी स्वादिष्ट पंचपक्वान्ने, फळफळावळ, मिठाया मांडून ठेवलेल्या त्याला दिसल्या अतिशय सुरेल असे संगीतही तिथं ऐकायला येत होते. फिकुटलेल्या आणि दुःखी चेहन्याच्या माणसांच्या रांगाही त्याच दालनात त्याला दिसल्या. ते सगळे उपाशी आणि खंगलेले दिसत होते आणि त्यांच्या हाताला हातभर लांबीचे चमचे बांधले होते आणि त्यांच्या साहाय्याने ते तिथलं अन्न स्वतःच्या तोंडात पाण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ते जमत नव्हत. नंतर यमाने त्याला स्वर्गात नेलं. तिथही तशाच एका प्रशस्त दालनात पदार्थ ठेवले होते आणि सुस्वर संगीत ऐकायला येत होतं. इथंही तसेच लोक होते आणि त्यांच्या हाताला तसेच हातभर लांब चमचे यांयते होते. पण, इथं त्याता काही वेगळच दिसतं. इथं लोक हसत होते. आनंदी आणि निरोगी दिसत होते. मग त्याच्या लक्षात आलं की ते एकमेकांना भरवत होते. ते फक्त स्वतःचाच विचार करत नव्हते तर इतरांवहीं भल करण्याचा त्यांचा दृष्टीकोन प्रत्ययास येत होता. ते सुखात होते. संतुष्ट होते. आपल्या आयुष्याच्या बाबतीतही हेच खरं आहे. आपण जेव्हा आपले ग्राहक, आपले कुटुंब, आपले नोकर आणि आपले मालक यांची काळजी घेतो तेव्हा आपण आपोआप यशस्वी होत असतो. आनंद आणि सुख मिळवित असतो. 

सुविचार 

● 'सेवाधर्माला जीवनात श्रेष्ठ स्थान आहे. मानवजातीची निःस्वार्थ सेवा हीच परमेश्वराची उपासना मानाची गुरुग्रंथसाहेब 

• 'दुसऱ्याचा विचार करून त्याच्याशी नम्रतेने बागा, विचारपूर्वक वागण्यातून दुसऱ्याची कदर करण्याची वृत्ती दिसून येते. 'चांगल्या कामाला वेळ लागतोच, तो लागला तरी चालेल, पण काम उत्तम करा.

'चांगल्या कामाला वेळ लागतोच, तो लागला तरी चालेल, पण काम उत्तम करा. प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिन १८८५. प्रबोधनकार ठाकरे' या नावाने महाराष्ट्राता परीचित असलेले वादळी व्यक्तिमत्व 

दिनविशेष 

म्हणजेच सीताराम केशव ठाकरे होय. विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे संचार करणाऱ्या प्रबोधनकारांनी हाताळले नसेल असे क्वचित एखादे क्षेत्र असेल. | टंकलेखक, तैलचित्रकार, छायाचित्रकार, जाहिरातपटू, विमा कंपनीचे प्रसारक, नाटक कंपनीचे चालक अशा अनेक क्षेत्रात काम करून आपल्या अष्ट व्यक्तिमत्वाचा परिचय दिला. पण या सर्वापेक्षासुध्दा मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, इतिहासकार म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्राला अधिक परिचित आहे. महात्मा फुले, लोकहितवादी आणि आगरकर ही त्यांची स्फूर्तिस्थाने होती. शाहू महाराजांबद्दल त्यांना नितांत आदर होता. अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध यांसारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी झिजविली. सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन ही नियतकालिके त्यांनी चालविली. त्यापैकी 'सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीचा नायनाट' करण्यासाठी काढलेल्या प्रबोधनाशी त्यांचे नाव कायमचे निगडित राहिले. संयुक्त | महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांनी भाग घेतला आणि तुरुंगवास भोगला. त्यांनी कुमारिकांचे शाप, प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी, हिंदी स्वराज्याचा खून, कोदंडाचा टणत्कार, माझी जीवनगाथा इ. पुस्तके लिहिली. अत्यंत सडेतोड, ठाशीव आणि प्रखर विदारक भाषा हे त्यांच्या वाणी-लेखणीचे वैशिष्ट्ये होते. आपल्या लेखणीद्वारे समाजात विचारजागृती करण्याचे कार्य करण्यासाठी त्यांनी 'प्रबोधन' हे साप्ताहिक सुरू केले. ते व्यंगचित्रेही उत्कृष्ट काढत असत. प्रबोधनकार ठाकरे या नावानेच ते अवघ्या महाराष्ट्राला आजही परिचित आहेत. २० नोव्हेंबर १९७३ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. 

मूल्ये 

व्यासंग, जिद्द, राष्ट्रप्रेम 

अन्य घटना 

• धम्मपाल अनगारिक यांचा जन्मदिन १८६४ दक्षिण भारतातील बहुजन चळवळीचे आद्यक्रांतीकारक पेरीयार ई. व्हि. रमास्वामी जयंती- १८७९ उपक्रम प्रबोधनकारक ठाकरेंचे 'देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे' हे पुस्तक मिळवा व वाचन करा. समूहगान हा देश माझा याचे भान, जरासे राहू द्यारे... 

-> सामान्यज्ञान • सकस अन्नाअभावी जगातील ७५ टक्के लोकसंख्या ही उपाशी, अर्धउपाशी किया प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्त्व, स्निग्ध पदार्थ व भरपूर पाणी यांची मानवाला गरज असते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा