प्रार्थना
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो
श्लोक
उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणम् । विरक्तस्य तृर्ण भार्या, निःस्पृहस्य तृणं जगत् ॥
उदार पुरुषाला धन हे तृणासमान वाटते. शत्रूला मरण सुणासमान भासते. विरक्त पुरुषाला बायको संसारातील विषयोपभोग तृणासमान असतात, तर ज्याला कसलाही लोभ नाही त्या पुरुषाला सारे जगच तृणासमान असते.
→ चिंतन
आपली मदत अनाठायी जाऊ न देण्याविषयी फार जपले पहिजे. नाहीतर खरा गरजू मागे राहून लफंग्या धटिंगणाच्या तोंडी तुमचा घास पडावयाचा. अनाठायी खर्च होता कामा नये. स्वल्पात स्वल्प पेरणी करून मोठ्यात मोठे पीक काढावयाचे आहे.
→ कथाकथन
'हे चालूच राहू दया
मार्क ग्वे पिअर्स हा हॉलंड देशातील प्रख्यात प्रवचनकार होता. तो जीवनमूल्ये आणि नीतीची जीवनाशी कशी सांगड घालावी याची रसाळ वाणीने प्रवचने करीत असे. अत्यंत गरीब माता पित्यांचा पोटी जन्मलेला मुलगा होता तो. हॉलंडमधील बोटीच्या धक्यावर मक्याची (भाजलेली कणसे) विकून तो आपली उपजीविका करीत असे. प्रार्थना तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो...
एकदा तो एका उपहारगृहात गेला. पोटभर जेवला. बिल आले तेव्हा त्याच्या पोटात खळगा पडला. तो रडवेला चेहरा करून बसून राहिला. उपहारगृहातील व्यवस्थापकाने त्याचा चेहरा पाहिला, त्याने त्याला जवळ बोलविले, 'खिशात पैसे नाहीत तर एवढ्या पदार्थांवर ताव कसा मारलास ? चांगली खरडपट्टी काढली. त्याला त्याचे नाव विचारले, पत्ता विचारला, तेव्हा त्याला पिअर्सच्या आईचे नाव कळले. ती फार दयाळू स्त्री होती. आज पंचतारांकित उपहारगृहाचा व्यवस्थापक बनलेल्या मुलाला त्याच्या लहानपणाची आठवण झाली आणि तिच्या मोठ्या मनाचीही जाणीव झाली. त्या व्यवस्थापकाला त्याच्या वडिलांचा दयाळूपणा आठवला. त्यांनी व्यवस्थापकाच्या आईला तिच्या गरिबीच्या अवस्थेत खूप आर्थिक मदत केली होती. सहानुभूतीची वागणूक दिली होती. व्यवस्थापकाने स्वतःच्या खिशातून ते भरले आणि म्हणाला, तू जेव्हा मोठा होशील तेव्हा आता जशी तुझी गरज भागली, पोटभर जेवलास, प्रसन्न झालास तसेच पुढे एखाद्या गरजू माणसावर दया कर दानधर्म कर हे कर्म सतत पुढे चालले पाहिजे हे विसरू नकोस.' हेन्स बर्टनने जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा त्याने यावर फार सुंदर कविता लिहिली आहे. नाव आहे. 'पास इट ऑन' (हे पुढे चालू ठेव) तुम्हाला कुणी दया दाखविली की तुम्हीही ती तशी दया दाखवा कारण ती तुमची एकट्याची नाही. वर्षानुवर्षे ती चालतच राहिली पाहिजे. दुसऱ्यांचे अश्रू ओघळताना पाहिले की तुमच्या डोळ्यातही ते पाणी आले पाहिजे. स्वर्गापर्यंत ती पोचली पाहिजे कृतज्ञतेचा मधुर शब्द अमृताचा बिंदू असतो, कोकिळेचा तो पंचम असतो, तो तसाच पुढे दुसऱ्यानेही ऐकला पाहिजेत. वैऱ्याचाही हृदयात ते घुसले पाहिजेत, प्रेमाला प्रेमळ हृदयाची ओढ असते सतकृत्याला विकासाची ओढ असते. तुम्ही जे पेराल तेच उगवेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तुमच्या मित्राची गरज पहा, ती गरज भागवा. तुमची गरजही दुसरा कुणीतरी भागवील. स्वतःसाठी जगाल तर ते जगणेच नव्हे, मेणबत्ती जळत राहते तेव्हा दुसऱ्याला प्रकाश मिळतो. ख्रिस्ताने स्वतःच्या खांद्यावर सूळ घेतला, तो तुम्ही आता आपल्या खांद्यावर घ्या. तो आजही जगत आहे, ज्योतीने ज्योत पेटत आहे. तत्त्वे जगतात पण माणसे सुळावर चढतात. हे चालूच ठेवा. हे चालू ठेवणाऱ्याला कृतज्ञता मिळते भूतमात्रांकडून. एक लहानसे वाटणारे साधेसे जेवण याच तृप्तीच्या डेकराची वाट पाहत असते दया भूतदया ही महान भूक आहे. नुसती कोरडी भाकर खाऊ नये. म्हणून संत नामदेव कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले होते. भुकेकंगाल गरिबाच्या झोपडीत दयेचा निर्झर वाहू लागला की आकाशाचे प्रतिबिंब त्या दया सागरात पडते. म्हणून हे चालूच ठेवा. जीवन हा प्रवाह आहे, मार्ग आहे. हा सन्मार्गाने वाहू द्या. मार्गात दया मिसळली की तो सन्मार्ग होतो.
सुविचार
जे अंतःकरणाचे शुध्द से धन्य, कारण ते देवाला पाहतील - येशूलि
→ दिनविशेष
खंडोजीबल्लाळ स्मृतिदिन
१७२६ शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्याला लागले ते बठावर शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांचा खंडोजी एक मुलगा संभाजीराजे गादीवर येताच त्यांची चिटणीस राम्र पडली. सान्यांना प्राणास मुकावे लागते. पण राणी येसूबाईने खंडोजीस याचमान सोडले नाही. पुढे आयुष्यभर राजाच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावले. त्या चकमकीत त्यांना अपंगत्व आले. वतन गमवावे लागते मंगलाकडून अनन्वित छळ, अत्याचार सोसावे लागले पण स्वामीनिष्य त्यांनी सोडली नाही. त्यांची स्वामीनिष्ठा इतकी प्रखर होती की राजाचे चुकत असेल त्या वेळेस परखडपणे त्यांची कानउघाडणी करण्यासही करत नसत. संभाजीराजे, राजाराम महाराज, शाहू महाराज या सर्वांची या स्वामीनिष्ठ सेवकाने सेवा केली आणि १९ सप्टेंबर १७२६ रोजी आपला देह ठेवला. आपले नाव मराठेशाहीच्या इतिहासात अजरामर केले.
→ मूल्ये
निष्ठा, शौर्य, देशप्रेम.
→ अन्य घटना • मराठे व इंग्रज यांच्या मधील पहिले नाविक मुद्ध १६७२ प्रसिद्ध कथाकार विल सीमाराम गुर्जर यांच्या मृत्यू १९६२
→ उपक्रम
• खंडोजी बल्लाळांबद्दल अधिक माहिती मिळवा. • बाळांच्या जीवनातील प्रसंगावर आधारीत सादर
समूहगान
चला जाऊ या दर्शन करू या, अपुल्या भारतमातेचे... करा
→ सामान्यज्ञान
• दक्षिण आफ्रिकेत काही वृक्ष असे आढळतात की ज्यातून १५ से भी सख्या निघतात. त्या मेणबत्तीप्रमाणे जळतात लाकूड ओले असताना वापरले तर जसजसे वाढत जाईल तसतसा त्याचा आकार बदलू शकतो. व दिसतातही.
• उत्तम लाकडाची दुर्लभता, वृक्षांचे संवर्धन करण्याची जाणीव आणि लाकडी फर्निचरच्या बाबतीत असणारा आगीचा धोका यामुळे अलीकडील काळात पोलादी फर्निचर लोकप्रिय झाले. यामध्ये पोलादी सळ्या वापरतात कारण त्या वजनाने हलक्या सर्वाधिक आणि आकार देण्यास सुलभ असतात. शिवाय त्यावर गंगविरोधी लेप देता येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा