Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३

26 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

26 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना 

- सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो... 

 श्लोक 

 - न चोरहार्य न राजहार्यं । न भ्रातृभाज्यं न भारकरि ।। व्यये कृते वर्धत एवं नित्यं । विद्याधन सर्वधनं - प्रधानम् ॥ 

 - विद्या हे असे धन आहे की, ते चोराला चोरून नेता येत नाही, राजाला जप्त करता येत नाही, भावाभावात त्याची वि विद्याधनाचा व्यय केला ते दुसऱ्याला कितीही दिले - तरी ते सारखे वाढतच राहते. म्हणूनच विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्

 श्रेष्ठ आहे.


 चिंतन

 - समाजावर ज्यावेळी कोणीतरी जुलूम, अन्याय करीत असतो त्यावेळी अवघा समाज त्रासून जातो. समाजातील साधु, सन्बन अशा लोकांचीही त्यातून सुटका होत नाही. अशा वेळी एखादी महान व्यक्ती जन्म घेते. समाजात क्षोभ निर्माण करणान्या, अस्थिरता निर्माण करणाऱ्या परिस्थितीला समोरे जाऊन ती महान व्यक्ती अन्यायाचे परिमार्जन करते, सर्वांचे रक्षण करते.

 

- कथाकथन 

- - 'कावळा आणि कबूतर' - एका शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एका मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची साडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा., शेतकऱ्याने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.. एके दिवशी शेतकन्याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य पसरले. कावळ्यांनी धान्य पाहिले. ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले आणि । घात अडकले. सगळे कावळे जाळ्यात अडकलेले पाहून शेतकरी खूश झाला. तो म्हणाला, 'अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगलीच शिक्षा | एक्क्यांत त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला आश्चर्य वाटले. त्याने काळजीपूर्वक पाहिले. त्यामध्ये काळ्यांबरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले. शेतकरी कबूतराला म्हणाला, 'तू कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही. तू बाईट संगत पालीस. त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल.' असे म्हणून शेतकऱ्याने आपल्या शिकारी कुत्र्यांना साद घातली. त्याबरोबर ते धावतच तिथे आले. त्यांनी एकामागून एक सगळ्या पक्ष्यांना ठार मारले.


सुविचार

• वाईट संगतीत राहू नये. • राग, द्वेष व वाईट संगत यांपासून दूर राहणारा मनुष्य आदर्श बनतो.

 • अविचाराने व निष्ठुरतेने शेवटी हानीच होते.

 • कुविचारांनी मनाची शांती, सुख आणि जीवनातले यश नष्ट होते.


दिनविशेष

• नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर स्मृतिदिन - १९४८ : यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ मध्ये झाला. ते मूळचे सांगलीचे. त्यांचे शिक्षण बी.ए.एलएल.बी. पर्यंत झाले. विद्यार्थीदशेपासून यांचा ओढा लोकमान्यांच्या केसरीकडे होता. त्यांनी लिहिलेला पहिलाच लेख केसरीचा अग्रलेख म्हणून छापला जाण्याचे भाग्य त्यांना लाभले. उत्कृष्ट राष्ट्रभक्ती आणि लेखणींचा लढाऊ आवेश यामुळे त्यांचे लेखन जहाल होई. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मुंबईत 'लोकमान्य' या दैनिकात काम केले. तेथेही अन्याय होताच ते थांबविले आणि मोठ्या धडाडीने १९२३ साली स्वतःचेच 'नवा काळ' हे दैनिक वृत्तपत्र सुरु केले. त्यांची नाट्यक्षेत्रातील कामगिरीही अशीच अपूर्व आहे. 'मी नाटककार प्रथम, पत्रकार नंतर' असे ते म्हणतात. | विद्यार्थीदशेत असतानाच शेक्सपियरच्या हॅम्लेट आणि अथेल्लो या नाटकांतील हॅम्लेट आणि आयागो या असामान्य भूमिकांचे एकत्रीकरण करून त्यांनी 'सवाई माधवरावांचा मृत्यू' हे अजोड नाटक निर्माण केले. 'कीचकवध' आणि 'भाऊबंदकी' ही नाटके लिहून त्यांनी समाजात प्रक्षोभक जागृती निर्माण केली. तसेच 'मानापमान' 'स्वयंवर' अशी अजरामर संगीताने नटलेली नाटके लिहून अवघ्या महाराष्ट्राला मोहिनी घातली. जीवनाच्या उत्तरार्धात | वेदोपनिषद वाङ्मयाकडे ते वळले. पुरुष सूक्त, रूद्र यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. निष्काम कर्मयोग त्यांनी अखेरपर्यंत आचरला. आपल्या साठीचे, पंचाहत्तरीचे सार्वजनिक सोहळे त्यांनी नाकारले. २६ ऑगस्ट १९४८ ला त्यांची जीवनज्योत मालवली. 


मूल्ये

देशप्रेम साहित्यनिष्ठा


अन्य घटना - 

• राणी पद्मिनीचा १५ हजार राजपूत स्त्रियांसह जोहार - १३०३ 

• रसायनशास्त्राचे जनक फ्रेंच शास्त्रज्ञ अंतोनी लव्हाजिरे यांचा जन्म - १७४३

 • लातूर व गडचिरोली जिल्ह्यांची निर्मिती - १९८२.

  • मुंबईमध्ये 'बाँम्बे असोसिएशन' ही संस्था स्थापन करण्यात आली - १८५२

 • चित्रपटायुगामुळे मृतवत् झालेल्या नाट्यसृष्टीला संजीवनी देणारे मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन - १९५५.


समूहगान -

. ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगालो नारा... → 


उपक्रम  

 • खाडिलकरांच्या नाटकांबद्दल माहिती मिळवा. •तुमच्या भागातील वृत्तपत्राबद्दल माहिती मिळवा


सामान्यज्ञान 

• प्रतिध्वनीचे तत्व वापरून रडारची निर्मिती केली गेली आहे. रडार म्हणजे डिटेक्शन अॅन्ड रेजिंग. • रेडिओ लहरीचा वापर करून ही यंत्रणा काम करते. युध्दात विमाने दूर असतानाच त्यांचा शोध घेण्यासाठी ही यंत्रणा मुख्यतः तयार केली गेली होती. (१०३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा