25 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ
→प्रार्थना
इतनी शक्ती हमें देना दाता....
→ श्लोक
नको रे मना बाद हा खेदकारी । नको रे मना भेद नानाविकारी । नको रे मना शीकवू पूढिलांसी । अहंभाव जो राहिला तूजपाशी ।।.
हे मना, कलह हा दुःखदायक असतो, तो मुळीच नको. मतभेदांनी नाना विकार उत्पन्न होतात, ते मतभेदही नकोत. जोवर तुझ्यात अ तोवर इतर लोकांना मुळीच उपदेश करू नकोस.
→ चिंतन
आपले शरीर, रंग, रूप, कल्पकता, बुध्दी इत्यादी अनेक गोष्टी निसर्गतःच आपल्याला मिळत असतात. आपल्याल → श्लोक नको रे मना बाद हा खेदकारी । नको रे मना भेद नानाविकारी । नको रे मना शीकवू पूढिलांसी । अहंभाव जो राहिला तूजपाशी ।। २५ ऑगर प्रार्थना इतनी शक्ती हमें देना दाता... हे दानच आहे. अशा दानाचा इतरांच्या कल्याणासाठी उपयोग करीत राहिल्यास त्या दानाचे सार्थक झाले असे वाटते.
कथाकथन '
'सावता माळी'
- एकदा काय झाले ! ज्ञानेश्वरमहाराज आणि नामदेवमहाराज यांच्याबरोबर स्वतः विठोबा यात्रेला निघा
तिथेही गरया मारत पंढरपुरातून बाहेर पडले. स्वत: विठोबाला अचानक सावता माळ्याची आठवण झाली. ते तिघेही अरणभेंडी गावाजवळ वेळ कडकडीत दुपारची होती. ऊन अगदी डोक्यावर आले हाते. विठोबाने ज्ञानेश्वर महाराजांना आणि नामदेव महाराजांना सांगितले. 'तुम्ही दो बाच्या झाडाखाली थांबा. मी जरा सावत्या माळ्यास भेटून येतो. खूप दिवसात तो पंढरपुरास आलाच नाही. काय झाले ते पाहून येतो. तुम्ही इ बांबा!' ज्ञानेश्वरमहाराज विठोबाला म्हणाले, 'देवा! आम्ही दोघेही येतो की रे! आमची पण त्याची भेट झाली नाही रे !' पांडुरंग म्हणाल, खूप थकता आहात. इथेच नदीकाठचे पाणी घ्या. स्वस्थ बसा. मी आलोच...' असे म्हणत पांडुरंग सावत्याला भेटायला शेतावर आला. साव माली खुरप्याने भाजी नीट करत होता. तोंडात पांडुरंगाचे नाव एकदम तल्लीन झालेला होता. प्रत्यक्ष पंढरपूरचा विठोबा त्याच्या पाठीमागे कमरेवर ह ठेवून उभा आहे. याचे सावत्याला भान नव्हते. शेवटी विठोबाने सावत्याच्या पाठीवर अतिशय प्रेमाने हात ठेवला. तो स्पर्श दैवी होता. सावत्या एकदम जाग आली. पाठीमागे वळून पाहतो तो प्रत्यक्ष परमात्मा. त्याला आश्चर्य वाटले. समोर तर विठोबा उभा होताच. पुन्हा हा पाठीमागे कसा उर पूणा सावत्याने त्याला साक्षात दंडवत घातले. विठोबाने त्याला हलकेच उठवले. आणि हळूवारपणे म्हटले, "सावत्या ! अरे मला वाचव. माझ्यामते | दोन दरोडेखोर लागले आहेत. ते मला मारतील. मला कुठेतरी लपव लवकर ! घाई कर.... 'सावत्याला काहीच कळेना. पांडुरंगाला कुठे लपवावडे । सगळीकडे तर तो भरून आहे, पण सावता माळ्याला एकदम एक युक्ती सुचली. त्याने विठोबाला लहान रुप घ्यायला सांगितले आणि हातात जे होते त्याने सरकन स्वतः चे पोट उभे फाडले. लगबगीने त्या पांडुरंगाच्या लहान मूर्तीला पोटात ठेवले. वरून उपरणे बांधले आणि पुन्हा "पांडुरंग पा !" करत शेतात काम करू लागला. इकडे वडाखाली ज्ञानदेव नामदेव विठोबाची वाट पहात बसले. खूप वेळ झाला. सूर्य कलायला आला; पर - पांडुरंगाचा पत्ताच नाही दोघांना काळजी वाटली. दोघे पांडुरंगाला शोधायला निघाले. गावात त्यांना शेत दिसले आणि त्या शेतात त्यांना सावता माळी एका हातात खुरपे आणि दुसऱ्या हातात मुळा घेऊन भजनात तल्लीन झालेला दिसला. तोंडात सारखा पांडुरंगाचा घोष ऐकून ते सावता माळ्याच्चा शेतात गेले. सावता माळी त्या दोघांपेक्षा मोठा. दोघांनी त्यांना वाकून नमस्कार केला. बघतात तर सावत्या माळ्याच्या पोटातून रक्ताची पा लागलेली, पण सावत्याला कसलेच भान नाही. त्यांनी सावत्याला हात धरून थांबवले. रक्ताचा सडा दाखवला, पण सावत्याचे लक्ष कुठे होते? आपला "पांडुरंग | पांडुरंग !! " करतोय. ती तल्लीनता पाहून स्वतः पांडुरंगच सावत्याच्या पोटातून बाहेर आला. पांडुरंगाला पाहून ज्ञानदेव- नामदेवांना हर्षच झाला. पण, सावत्याची विठोबाची भक्ती पाहून त्यांनी सावत्याला साष्टांग नमस्कार घातला. अशा या सावत्या माळ्याने आषाढ वा चतुर्दशी शके १२१७ म्हणजे १२९५ साली समाधी घेतली.
→ सुविचार
• सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा ।
→दिनविशेष
→ • हिंदी साहित्यकार प्रेमचंद यांचा स्मृतिदिन - १९२६ : हिंदी साहित्याचा इतिहास मुन्शी प्रेमचंदांच्या साहित्याशिवाय कध 1 पूर्ण होणार नाही. त्यांना 'उपन्यास सम्राट' असे म्हणतात. त्यांचा जन्म ३१ जुलै १८८० रोजी काशी जवळील 'लमही' या खेड्यात झाला. एम. झाल्यावर त्यांनी शिक्षणक्षेत्रात विविध व्यवसाय केले व अखेर असहकार चळवळीत पडले. सरकारी नोकरी सोडून ते केवळ लेखन करू लागल कांदबरी या लेखनक्षेत्रात त्यांनी विशेष प्रसिध्दी मिळविली. 'गबन' व 'गोदान' ह्या त्यांच्या प्रसिध्द कांदबऱ्यांवर व 'दो बैलोंकी कथा' या त्यांच्या कथेवर चित्रपटही निघाले आहेत. 'वीर दुर्गादास सेवासदन, निर्मला, कायाकल्प, प्रेमाश्रय' ह्या त्यांच्या काही गाजलेल्या कांदबऱ्या आहेत. शिवाय `प्रेमपूर्णिमा, प्रेमप्रचिती, प्रेमतीर्थ, प्रेमद्वादशी, पाच फूल, नारी जीवनकी पहेलियाँ, मानससरोवर' वगैरे त्यांचे कथासंग्रह प्रसिध्द आहेत. त्यांचा साहित्याचे जगातील विविध भाषातून अनुवाद झाले. त्यांच्या साहित्यातून जीवनाचे वास्तव चित्रण मर्मभेदीपणाने होई, म्हणूनच त्यांना भारताचे 'मॅक्झिम गॉर्की' म्हणतात.
→ मूल्ये
• श्रमनिष्ठा, बंधुता, समता, भूतदया. -
→ अन्य घटना -
• मायकेल फॅरेडे या इंग्लिशरसायनशास्त्रज्ञाचा स्मृतिदिन - १८५७
• उत्तरप्रदेशामध्ये बुंदेलखंड विद्यापीठाची स्थापना - १९७५.
→उपक्रम -
• हिंदी भाषेतील पुस्तकांची वाचन स्पर्धा आयोजित करणे.
• प्रसिध्द हिंदी लेखक व त्यांच्या साहित्यकृती यांची माहिती मिळविणे.
→ समूहगान
• जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ियाँ करती हैं बसेरा....
→ सामान्यज्ञान
• विश्वविख्यात पुस्तके आणि त्यांचे लेखक
• रामायण - महर्षी वाल्मिकी
• गोदान - मुन्शी प्रेमचंद
• इंडियन फिलॉसॉफी - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
• चरित्रहीन - शरदचंद्र
• गीतांजली - रवीद्रनाथ टागोर. (१०२)
→
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा