Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

24 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

      24 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना 

ए मातृभूमी तेरे चरणो में सिर नवाऊँ...

श्लोक 

- विद्या ददाति विनयं, विनयात् याति पात्रताम् । पात्रत्वात् धनमाप्नोति, धनाद्धर्म तथा सुखम् ।। 

विद्या माणसाला विनयशील बनवते; विनयामुळे त्याला योग्यता प्राप्त होते; योग्यतेमुळे संपत्ती प्राप्त होते; संपत्तीचा योग्य विनियोग केल्याने धर्माचरण घडते आणि धर्माचरणाने सुखाची प्राप्ती होती. 


चिंतन 

आपल्याला एखादी गोष्ट करावयाची आहे, हे मनाशी निश्चित केल्यावर, त्या दृष्टीने आपण कामाला सुरुवात करतो. अशा वेळी आपल्या कामात कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला, तरी आपण त्याचे काही वाटून घेत नाही. आपले सारे लक्ष, ती आपली गोष्ट पुरी करण्याकडेच असते.


 → कथाकथन 

 - 'मानवतावादी राष्ट्रभिमान' - आपल्या राष्ट्राचा अभिमान सर्व देशवासियांना वाटायलाच हवा. विद्यार्थी मित्रांनो शाळाशाळांतून

 "भारत माझा देश आहे... ही प्रतिज्ञा म्हटली जाते. केवळ अशी प्रतिज्ञा म्हणून राष्ट्राभिमान, राष्ट्र भक्ती निर्माण होत नाही. त्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवले पाहिजे. राष्ट्रभक्ती म्हणजे केवळ अभिमान बाळगून मनुष्य राष्ट्राभिमानी राष्ट्रभक्त बनत नाही. आपल्या देशाची संस्कृती, इतिहास, वाङ्मय, साहित्य महापुरुषांची परंपरा, नैसर्गिक संपत्ती, विविध प्रकारचे सौंदर्य अफाट व अभिमानास्पद आहे. पण या गोष्टीचे केवळ वर्णन करून अभिमान बाळगण्यात फारसा अर्थ नाही. आपली राष्ट्राबद्दलची जबाबदारी; कर्तव्याची भावना जागृत ठेवून प्रत्यक्ष कृती प्रत्येक क्षेत्रात केली पाहिजे. आपल्यातील सामुदायिक दुर्गुण आळस, कामचुकारपणा, ढोंग, लबाडी, भ्रष्टाचार, कर्तव्यपराइ मुख्यता सहानुभूतिशून्य वागणूक, अज्ञान, दारिद्र्य हे घालविले पाहिजेत. स्वदेशी, स्वभाषा, ऐक्य ही व्रतं पाळायला हवीत. उत्पादनवृध्दी, निर्यात व्यापार, देशरक्षणाची सुसज्जता, संपत्तीचं समान वितरण, सामाजिक न्याय, सर्वांना काम (व्यवसाय) या सर्व बाबतीत आपण अग्रेसर राहायला हवं. ही कार्य केली तरच राष्ट्र अग्रेसर, बलवान, स्वयंपूर्ण, संपन्न होईल म्हणून ही कार्य नेकीने करणं म्हणजे राष्ट्रप्रेमी बनणं होय. त्यामुळेच राष्ट्राभिमान सार्थ होऊ शकेल. आत्यंतिक एककल्ली राष्ट्राभिमान बाळगून इतर राष्ट्रांचा द्वेष करपा, त्यांना गुलाम करणं, त्यांच अकल्याण इच्छिणं म्हणजे खरा राष्ट्रभिमान नव्हे. जग आता अगदी लहान झालं आहे. ते एक कुटुंब बनलं आहे. इतर राष्ट्रेही सुखी, संपन्न होण्यातच आपल्या राष्ट्राची भलाई सामावलेली आहे. म्हणून 'जय जगत् सर्व जगाच्या कल्याणाची कल्पना, भावना व कृती आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे. मानवता, सर्व मानवांची भलाई हे आपलं मुख्य ब्रीद झालं पाहिजे. अर्थात प्रथम आपण आपल्या राष्ट्राच्या भलाईसाठी कसून काम करणं म्हणजे मानवतावादी राष्ट्रप्रेम व राष्ट्राभिमान होय. हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे.

सुविचार 

• राष्ट्रबद्दल योग्य अभिमान बाळगून इतर राष्ट्रांचा द्वेष मुळीच करता कामा नये. कारण सर्व राष्ट्रातील मानव हे ईश्वराची लेकर आहेत. म्हणून आपण मानवतावादी बनलं पाहिजे.ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. - 

दिनविशेष 

 • सर रामकृष्ण गोपाळ स्मृतिदिन - १९२५ : जन्म ६ जुलै

•  १८३७ जगप्रसिध्द महाराष्ट्रीय संस्कृत पंडित, प्राचीन ग्रंथ आणि 1 संप्रदाय यांचे संशोधक, सामाजिक सुधारणांचे अग्रणी व धर्मनिष्ठ म्हणून भारताच्या थोर विभूतीत डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे नाव घेतले जाते. मालवण, राजापूर, रत्नागिरी येथे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण झाल्यावर ते मुंबई विद्यापीठाचे एम. ए. झाले. पुढे ते मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक झाले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील साडेपाच वर्षाच्या काळात संस्कृत भाषेचा अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास करून ते संस्कृत पंडित झाले. सरकारच्या हस्तलिखित खात्यामध्ये संपादन करीत असताना त्यांनी महत्वाचे संशोधन केले. प्राचीन वैष्णव पंथ, काश्मीरमधील शैव सांप्रदाय आणि रामानुजांचे तत्वज्ञान यावर त्यांनी खूप संशोधन केले. यावरील त्यांच्या मौलिक ग्रंथरचनेमुळे त्यांना जागतिक कीर्ती मिळाली. पुण्याची भांडारकर संशोधन संस्था ही त्यांची स्मृती जागृत ठेवणारी संस्था होय. भारतासंबंधी परदेशात जे अनेक गैरसमज पसरले होते ते दूर होण्यास डॉ. भांडारकरांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरले. शैव आणि वैष्णव पंथांच्या सुसंगतवार इतिहासाची मांडणी त्यांनी केली. यामुळेच या पंथांचा इतिहास आपणास समजू शकतो. 

•  कालबाह्य रूढींचा त्याग, जातिभेद निर्मूलन 'स्त्री शिक्षण' दलितांचा उध्दार, विधवा विवाह, पुनविर्वाह इत्यादी सामाजिक

•  सामाजिक प्रश्नांना त्यांनी वाच फोडली. प्रार्थना समाजाचे ते आधारस्तंभ होते. 


> मूल्ये - • शुचिता, संशोधक वृत्ती.

अन्य घटना -

 • मराठी साहित्यिक न. चिं. केळकर यांचा जन्मदिन - १८७२.

उपक्रम

 • भांडारकर तो झाँकी है. शनिवारवाडा .' हे पुस्तक मिळवा व वाचन करा. 

समूहगान

  • ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का.... 

सामान्यज्ञान 

• चंद्रावरील एका दिवसाबरोबर पृथ्वीवरील सुमारे १४ दिवस होतात

. • चंद्रावर जीवसृष्टी नाही. तेथे हवा नाही आणि पाणी नाही. चंद्रावर वारा नसल्याने जमिनीवर उमटलेले चांद्रवीरांच्या पा उसे पुढील लाखो वर्षे तसेच राहणार आहेत.'

भारतातील प्रथम 

• टपाल कचेरी - कोलकता (१७२७)

• वर्तमान पत्र - द बेंगाल गेझेट 

• रेल्वे मुंबई-ठाणे. 

• मुकपट राजा हरिश्चंद्र (१९१३)

 • उपग्रह आर्यभट्ट (१९७५) 

 • क्षेपणास - पृथ्वी (१९८८) -

 • रेडिओ केंद्र - मुंबई (१९२७) 

 • पंचतारांकित हॉटेल ताज (१९०३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा