→प्रार्थना
असो तुला देवा, माझा सदा नमस्कार...
→ श्लोक
- जगी पाहता सत्य ते काय आहे । अती आदरे सत्य शोधून पाहे । पुढे पाहता पाहता देव जोडे । भ्रम, भ्रांति, अज्ञान हे सर्व मोड़े ।।
- हे मना, जगात सत्य काय आहे, ते अगत्याने नीट शोधून बघ. तेव्हाच देव म्हणजे काय हे तुला समजेल. आणि भ्रम, भ्रांति व अज्ञान स् नाहीसे होईल.
→ चिंतन
संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. प्रत्येक माणसाच्या जीवनात संकटे ही येणारच; पण संकट आले म्हणून एवढे घाबरून जाण्याचे कारण नाही. त्या संकटावर मात करण्याचा करा. यातूनच आपल्या अंगी धैर्य, चिकाटी, धाडस, निर्भयता इ. अनेक गुण वाढीस लागतील. त्यांचा पुढील जीवनात फार उपयोग होती संकटांना संधी द्या. त्यातून काहीतरी शिकता येते
→ कथाकथन
- 'बाबासाहेब आंबेडकर' - स्वतंत्र हिंदुस्थानची राज्यघटना लिहिणारे मा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तुंग होते. अस्पृश्यता नष्ट करणारे बाबासाहेब हे खरे तर महामानव होते. ते फार मोठे अर्थतज्ज्ञ होते. सामान्य जनतेचे तारणहार होते. बाबासाहेब एक मोलाचा संदेश देत की, जाती, पंथ, पक्ष यापेक्षा आपला देश आणि आपली देशनिष्ठा मोलाची आहे. देशहितापुढे आयुष्यात कशालाही देऊ नका. स्वतंत्र हिंदुस्थानचे ते पहिले कायदामंत्री होते. त्यांनी आपल्या उत्तुंग प्रज्ञेने हिंदू कोड बील तयार केले आणि त्यातून स्त्रीस्वातंत्र्याचा स्त्रीहक्काचा, स्त्रीच्या प्रतिष्ठेचा पुरस्कार होता. अत्यंत उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आईचे स्वप्न पूर्व बाबासाहेबांची आई ही एक कर्तृत्ववान आणि स्वाभिमानी माता होती. या आपल्या लहानग्या प्रज्ञावान लेकराला ती नेहमी सांगायची की, खूप शिक्षण घे. खऱ्या अर्थाने मोठा हो आपला समाज दारिद्र्यात आणि अज्ञानात पिंचत पडला आहे. त्या आपल्या समाजाची दुःखे पूर्णपणे लोक आपल्याला अस्पृश्य समजतात. आपली सावली पडली तर आंघोळ करतात. प्राण्यांना पाणी प्यायला देतात व आपल्याला पाणीसुध्दा भ नाहीत. मंदिरात प्रवेश करू देत नाहीत. भीमा समाजातील ही विषमतेची दरी तू बुजव. तू ज्ञानसंपन्न झाल्याशिवाय आपला समाज सुधारणार ना आईची वेदना लहानग्या भीमरावाला समजली. त्याने आईला वचन दिले की, आई, मी शिक्षण घेईन. समाजाला शिक्षणाची वाट खुली करून देईन। दुःख भी दूर करेन. भीमराव सहा वर्षाचे झाले आणि त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारी, त्यांच्या मनात शिक्षणाचा दिवा तेवत ठेवणारी त्यांची देवाघरी निघून गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे उत्तुंग कर्तृत्व पहायला ती नव्हती. समाजातील गुलामगिरी नष्ट करण्याचे आश्वासन आपल्या आईला दिले होते, ते त्यांनी पूर्ण केले. आपल्या पोटी युगपुरुष जन्माला आला हे पाहण्याचे भाग्य त्या मातेला पाहायला मिळाले नाही दलित कुटुंबात जन्माला आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रज्ञावान आणि अत्यंत हुशार व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आईने त्यांच्यावर जे अप्रतिम संस्कार केले आणि ज्ञानाची ज्योत त्यांच्या अंतःकरणात तेवत ठेवली; त्या ज्योतीचा सूर्यप्रकाश झाला हे कधी विसरू नक महामानवाचे चरित्र आवर्जून वाचा. ते तुमचे स्फूर्तीस्थान ठरेल. मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे उत्तम चारित्र्य.
सुविचार
• जात म्हणजे अराष्ट्रीयता, जातीने समाज शतखंड होतोच, पण जातीजातीत वैमनस्य निर्माण होऊन राष्ट्राच्या एकाविषमतेमुळे समाजाचे खरे सत्यच मारले जाते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर •
• समता म्हणजे अमृत, विषमता म्हणजे विष
• • पोलादी उसा, अन्यायाच्या छातीवरचा, पवित्र मजला आणिक गहिवर, माणुसकीच्या माणुसकीचा - विंदा करंदीकर • कोणतेही मानवता. सहिष्णुता, तर्कशास्त्र, प्रगती, साहसी कल्पना व सत्याचा शोध यांच प्रतीक असावं प. नेहरू
→ दिनविशेष
1- • मराठवाडा विद्यापीठाचा प्रारंभ- १९५८ : इ.स. १९५६ मध्ये भाषावर प्रांतरचनेत औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, आणि बीड हे हैद्राबाद राज्यातील मराठवाड्याचे पाच जिल्हे मुंबई राज्यास जोडले गेले. अनेक वर्षे निजामी राजवटीत गेल्याने हा भाग शैक्षणिक फार मागास होता. तो प्रगतीपथावर आणण्यासाठी त्या भागासाठीच स्वतंत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय, उच्च शिक्षणाची आवश्यक होते. त्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची निवड लक्षात घेऊन त्यावेळच्या मुंबई राज्याने औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापनेव घेतला. २३ ऑगस्ट १९५८ रोजी पं. नेहरूंच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. प्रारंभी शिक्षणात मागास समजल्या जाणाऱ्या या भागात आन | महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद कॉलेज स्थापन करून मागासवर्गीयांच्या प्राध्यान्याने सर्वप्रथम दखल घेणारे डॉ. आंबेडकर यांच्या नावाने हे विद्यापीठ ओळखले जावे म्हणून मागासवर्गीयांनी मोठी चळवळ केली मध्ये महाराष्ट्र शासनाने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे या विद्यापीठाचे नामांतर केले.
मूल्ये
• साहित्याभिरूची, अभ्यासूवृत्ती → अन्य घटना
• कवी विंदा करंदीकर यांचा जन्मदिन - १९१८. - →
उपक्रम
• तुम्ही राहात असलेल्या परिसरातील विद्यापीठासंबंधी माहिती सांगा. -
समूहगान
• राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम्....
→ सामान्यज्ञान
• नारायण मेघाजी लोखंडे हे मुंबईतील आद्य कामगार पुढारी, सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते व देशभक्त. कामगारांना सर्वांनाच १८९० पासून रविवारची हक्काची पगारी सुटी संघटित प्रयत्नांमुळे मिळू लागली. (१००)
• जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी जास्त वर्ष जगणारा प्राणी - मगर (आग्रेय आशियात आढळते)
• मोठा उपसागर- हडसन बे (कॅनडा) - कासव (१५० ते १७०)
• मोठा पक्षी - शहामृग (वजन ३५० पौंड, आफ्रिकेत आढळतो)
• उंच वृक्ष संव (उंची १२० मीटर)
• जगातील सर्वात लहान पक्षी - हमिंग बर्ड (वेस्ट इनडिज मध्ये
• मोठे मत्स्यालय लांब साप - अजगर (लांबी १० मीटर)
• जगातील सर्वात उंच धबधबा किग्रॅ.)
• मोठे सरोवर- कॅस्पीयन समुद्र (इराण-रशिया दरम्यान) - सिडनी (ऑस्ट्रेलिया)
• जगातील
• एन्जल धबधबा (व्हेनेझुएला)
• वजनदार साप - अॅनाकोंडा (वजन
• उंच प्राणी जिराफ (उंची ६ मीटर)
• मोठा व वजनदार प्राणी-अं - (वजन : ४० टन लांबी ३० मीटर)
• वेगवान प्राणी - चित्ता (तासी १०० ते १२० मीटर)
• मोठा प्राणी अफ्रिकन हत्ती (वजन ६ ते ७ टन).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा