Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ५ जुलै, २०२३

6 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

 → प्रार्थना :

-अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता..... 
श्लोक 

-मना सज्जना भक्तिपंथेचि जावे। तरी श्रीहरि पाविजे तो स्वभावे ॥ जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे । जनी वंद्य ते सर्व भावे करावे ॥ 


हे सज्जन मना, तू भक्तीच्या मार्गाने जा. परमेश्वराची भक्ती कर. त्यायोगे तुला परमेश्वराची कृपा प्राप्त हाईल. समाजात जे निंद्य (निंदा करण्यास योग्य म्हणजे वाईट) असेल ते सारे सोडून दे. समाजात जे वंद्य ( वंदन करण्यास योग्य म्हणजे चांगले) असेल त्याचे मनापासून आचरण करावेस. → चिंतन

-  आपण जर कर्तव्यावर जोर देत गेलो, तर आपले हक्क आणि अधिकार आपल्याकडे आपोआप चालत येतात - स्वामी रामानंद तीर्थ

  

- माणूस स्वतःच्या हक्कांबद्दल आणि अधिकारांबद्दल खूप जागरूक असतो; पण स्वतःच्या कर्तव्याकडे मात्र तो सोयिस्करपणे डोळे झाक करतो. पण असे करणे चुकीचे आहे. आपण आपले कर्तव्य पार पाडले की हक्क आणि अधिकार आपोआपच प्राप्त होतात. त्यांच्यासाठी भांडायची वेळ येत नाही. तेव्हा आपण कर्तव्यदक्ष बनण्याचा प्रयत्न करू या.  


कथाकथन आंतरिक आवाज' 

-ज्या लोकांना तुमच्याबद्दल असूया वाटते अशांना आपल्या जीवनात स्थान देऊ नका. शांतपणे पण जाणीवपूर्वक त्यांना आपल्या जीवनातून वजा करा. त्यांचे अस्तित्व विसरुन जा. तुम्हाला ज्यात आनंद मिळतो, त्या पद्धतीने हवे ती उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी स्वतःच्या प्रश्नांना महत्त्व द्या. लोक कळत नकळत आपल्याला अस्वस्थ करीत आपली ऊर्जा कमी करतात; अशांसाठी वेळ देऊ नका. अशा | लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका किंवा परिस्थिती काय होती त्यामागचे कारण काय होते सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका. तो विषय आणि विचार सोडून द्या. ज्या शब्दांनी किंवा वागण्याने आपल्या जीवाची घालमेल होते अशांना महत्त्व देऊ नका. त्यांच्याशिवाय सभोवती चांगले लोक आहेत, त्यांच्या सहवासात आपला वेळ खर्च करा. मनाचा मोकळेपणा कायम ठेवा. जगातील नवनवीन गोष्टी समजावून घेण्याला, स्वतःच्या ज्ञानकक्षा रुंदावण्याला | महत्त्व द्या. जीवनाचा अर्थ अधिक चांगला खोलवर समजेल अशा रीतीने काही गोष्टी अंगीकारण्यास शिका. अभ्यास करा, चर्चा करा, समजावून घ्या आणि अनुभव घ्या. यापुढे तुमची कार्यक्षमता आणि सहनशीलता घरी आणि कामाच्या ठिकाणी दोन्हीकडे वाढेल. भविष्यातील जीवन अधिक समरसून निकोपपणे जगता येईल, असे बदल स्वतःमध्ये घडवा, आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे याचा शांतपणे विचार करा. पैसा, समाज, कुटुंब या पैकी सर्वात महत्त्वाचे काय आहे ते तपासा. त्याचप्रमाणे दिनक्रमामध्ये बदल करा. अनेक गोष्टी राहून गेल्या हे लक्षात आल्यावर आतातरी त्या पैकी काही गोष्टी करण्यास सुरुवात करा. आपण मोठे झाल्यावर काय व्हायचे होते? आपण कोठे आहोत...? आपली ओळख काय? आपली आवड काय? स्वतःबद्दलची खरी ओळख काय? आता आपण जसे आहोत तसे आपल्याला व्हायचे होते काय? सुविचार 

•'सत्शील चारित्र्य व कर्तबगारी हेच खरे चिरंतन सौंदर्य' 


• 'संधीची वाट पाहू नका; स्वतःच संधी शोधा व कामी लावा.' 

 

• माणसाचे जीवन संमृद्ध करायला एखादाही प्रभावी विचार उपयोगी पडतो. म्हणून चांगल्या विचारांचा सतत प्रसार करीत असावे. 


•'तुमच्या कामावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटतो. म्हणून आपली कृती श्रेष्ठ दर्जाची, बिनचूक, परिपूर्ण, सुंदर राहील अशी करा 


दिनविशेष • बाबु जगजीवन राम यांचा स्मृतीदिन १९८६: 

स्वतंत्रता संग्रामातील अजेय योध्दा, शोषणाच्या विरुध्द जनसंघटनेच्या प्रेरणास्त्रोत, | ओजस्वी वक्ता, विरळ संसद पटु, नेतृत्व आणि प्रशासनमान्य अव्दितीय क्षमतेचे धनी जगजीवन राम जाती, संप्रदाय, धर्म तसेच क्षेत्राच्या भेदभावातून मुक्त होऊन समतेचा संदेश देत. बिहार राज्यातील भोजपुर जिल्ह्यातील चांदवा गावात त्यांचा जन्म संत शोभीराम आणि वासंतीदेवीच्या पोटी ५ एप्रिल | १९०८ रोजी झाला. ते बाल्यावस्थेमध्ये असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. ते प्रथम श्रेणीमध्ये मॅट्रिकची परीक्षा | पास झाले. उच्च शिक्षणासाठी बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी आई.एस.सी.ची पदवी घेतली. हरिजन सेवक संघाच्या माध्यमाने त्यांनी शोषितांसाठी संघर्ष केला. बिहारमधल्या भूकम्प पीडित लोकांच्या मदतीसाठी ते धावून गेले. १९३५ मध्ये भारतीय दलित वर्ग संघाची स्थापना केली आणि दलितांना राष्ट्रीय मुक्ती संग्रामात जोडले. १९३६ ला बिहार विधान परिषदेचे सदस्य बनले. दक्षिण शाहाबाद ग्रामीण विकास मंत्रालयात सांसदीय सचिव बनले. १९४६ च्या अंतरिम सरकारमध्ये ते श्रममंत्री झाले. त्यांनी सामाजिक न्यायाला महत्व दिले. श्रममंत्री असताना श्रमिकांसाठी नवीन श्रमनीती आणि कायदे तयार केलेत. १९५२ - ५६ मध्ये संचार मंत्रालयात हवाई वाहतुकीचे राष्ट्रीयकरण, इंडियन एअर लाइन्स कॉपोरेशन आणि एअर इंडियाची स्थापना आणि डाक सुविधा गावो गावी पोहचविली. १९५६-५७ मध्ये परिवहन आणि रेल्वेमंत्री असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या १९६७-७० खाद्य आणि कृषी मंत्री बनलेत आणि भारताला अन्नाच्या दुष्काळातून बाहेर काढले आणि हरितक्रांतीचे अग्रदूत बनून देशाला आत्मनिर्भर केले. १९६९ मध्ये ते कॉंग्रसचे अध्यक्ष बनले आणि पार्टीला सशक्त केले. १९७०-७४ मध्ये ते संरक्षण मंत्री होते त्या काळात त्यांनी पूर्व | पाकिस्तान जिंकून बांगला देश निर्माण केला आणि राष्ट्राला गौरव मिळवून दिला. पूर्व पाकिस्तानच्या एक लाख सशस्त्र सैनिकांचे आत्मसमर्पण करवून घेऊन जगातील अभूतपूर्व घटना घडविली १९७४-७७ कृषी आणि पाटबंधारे मंत्र्याचा कार्यभार सांभाळला. जनता पार्टीच्या सरकारमध्ये उपप्रधानमंत्री | बनलेत. १९३६ ते १९८६ पर्यतचा त्यांचा सांसदिक काळ हा विश्वात किर्तीमान आहे. ते ६ जुलै १९८६ ला त्यांनी आपली जीवनयात्रा पूर्ण केली. मूल्ये 

-कर्तव्यनिष्ठा, चिकाटी, साहित्यप्रेम. → अन्य घटना 

 • संत गुलाबराव महाराज जन्मदिन - १८८१ 

 • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म १९०१

  • अर्थशास्त्रज्ञ प्रा. विनायक महादेव दांडेकर यांचा जन्म - १९२०

  • व्यंकटेश मांडगूळकर यांचा जन्मदिन - १९२७ •

  •  आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांचा मृत्यू - १९४४ 

  


उपक्रम 

• व्यंकटेश माडगूळकरांच्या साहित्याची ओळख करून द्यावी. 

• गुलाबराव महाराजांचे अभंग मिळवून सांगावेत. 


समूहगान 

• इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके.....


•  सामान्यज्ञान-

 भारतातील लोक हात जोडून नमस्कार करतात.

• कांगो लोक स्वागत करताना एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालतात. आफ्रिकन लोक स्वागत करताना कमरेत वाकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा