Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, ६ जुलै, २०२३

1 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

 


प्रार्थना

- गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे .... 

श्लोक

- उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवगोसादयेत । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ 


→ स्वतःचा उद्धार करावा. चित्त अन्य किरकोळ गोष्टीमध्ये न गुंतवता आपले मन हेच आपला मित्रही आहे आणि शत्रूही आहे याची जाणीव ठेवावी. - श्रीमद्भगवतगीता

 चिंतन 

 -हातांनी जे पेरावे, तेच उगवून हाती पडते, पाप-पुण्य भलेबुरे, हातांनीच सदैव घडते, हात म्हणजे हात, त्यांना जातपात मुळी नसते, श्रमणाऱ्या हातांनीच जीवनाला वैभव चढते साने गुरुजी

 माणसाला आयुष्यात वैभव प्राप्त करायचे असेल, काही कर्तृत्व गाजवायचे असेल तर माणसाने प्रथम कष्ट करायला, श्रम करायला शिकले पाहिजे. स्वतः श्रम करण्याचे अनेक फायदे आहेत. माणसाला एकदा श्रमाचे महत्त्व कळले, पटले की त्याच्या मनातील उच्च-नीच, जात-पात हे सारे भेदभाव नष्ट होतील. प्रत्येक भारतीयांच्या श्रमातूनच उद्याचा वैभवशाली भारत निर्माण होणार आहे. 

कथाकथन

अध्यापक मित्रांनो

आपण आपल्या शिष्यांना या शाश्वत सत्याची जाणीव करून द्या की, जरी जगात लोक न्यायनिष्ठ किंवा सत्यप्रिय नसतात, तरीसुद्धा या सृष्टीत जसे केवळ स्वार्थपरायण दुष्ट पुरुष आहेत तसेच सत्पुरुषही, चारित्र्यसंपन्न, परोपकारी सत्पुरुषही आहेत. ज्याप्रमाणे दुसऱ्यांच्या उणिवा शोधणारे शत्रू आहेत. त्याचप्रमाणे हिताची इच्छा करणारे (हितचिंतक) असे मित्रही आहेत. आपल्या शिष्यांनी हे ज्ञान करून घ्यावे की, 'सृष्टी हेच श्रेष्ठ तत्त्व आहे आणि सगळे प्राणीमात्र म्हणजे तिचेच अंश आहेत. सृष्टीच्या सत्य, शिव आणि सुंदर या तत्त्वांचा अनुभव घेणारे आपले विद्यार्थी सृष्टीत खुशाल रममाण व्हावेत. त्यांना अनंत अशा आकाशात स्वैरपणे विहार करणारे पक्षी, हिरवे वृक्ष, सुंदर रंगाची फुले आणि फुलातील मध प्राशन करणारे भुंगे आनंदित करोत.' आपणच आपल्या शिष्यांना हे समजू द्या की ग्रंथ म्हणजे आपले शाश्वत वैभव आहे. आपणच विविध ग्रंथाचा परिचय - | (त्यांना) करून द्या. कारण आपल्याशिवाय दुसरा कोण विद्यार्थ्यामध्ये ग्रंथाबद्दल आवड निर्माण करण्यास समर्थ असू शकेल? अध्यापक मित्रांनो, आपल्या शिष्यांनी मनात हे निश्चित करावे की, त्यांनी स्वतःच्या सामथ्र्याने आणि बुद्धिचातुर्याने पुष्कळ धन प्राप्त करावे. परंतु स्वतःच्या अंतःकरणात राहणाऱ्या ईश्वराला साक्षी ठेवून आपल्या शिष्यांनी मनात हे पक्के धारण करावे की, घामाच्या थेंबांनी मिळालेले थोडेसे सुद्धा धन मौल्यवान असते. श्रमाच्या शिवाय जे पुष्कळ धन मिळते त्याच्या तुलनेत त्यांनी मनात हे योग्य धारण करावे की, अपराजित मनाने पराजयाचा सुद्धा स्वीकार करावा आणि शांत मनाने विजयाचा सुद्धा स्वीकार करावा. अध्यापक मित्रांनो, आपल्या विद्यार्थ्यांनी सज्जनांशी सज्जनांसारखे वागावे आणि लबाडाशी लबाडासारखे वागावे. त्यांनी दुर्जनांना कधीही भिऊ नये. कारण खरोखर दुर्जनच भित्रे असतात. अध्यापक मित्रांनो, विद्यार्थ्यांवर अवश्य प्रेम करावे. परंतु कधीही अति लाड करू नयेत, आपण हे जाणताच की अग्नीत शेकडो वेळा टाकलेले सोनेच सोन्याच्या गुणाच्या अतिरेकाने प्रकाशते विद्यार्थ्यांना जगात चांगले-वाईट लोक असतात हे ज्ञात करवून द्यावे, त्यांनी सृष्टिसौंदर्याची ओळख करवून द्यावी, ग्रंथवाचनाची आवड निर्माण करावी, आचार-विचारांच्या बाबतीत त्यांच्यावर योग्य ते संस्कार करावेत, परंतु हे सर्व करत असता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की, विद्यार्थ्यावर प्रेम अवश्य करावे परंतु प्रमाणाबाहेर त्यांना डांबून न ठेवता त्यांना प्राप्तपरिस्थितीचा सामना करायला शिकवावे. 


सुविचार:

 जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे परिश्रम, चिकाटी, जिद्द

• योग्य दिशेने इष्ट होणारे परिवर्तन म्हणजे शिक्षण होय. जे थोर तत्त्वज्ञ होते ते शिक्षक होते.

केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठविणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे विद्या. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णान्

 • शिक्षणाला शुद्ध चारित्र्याची बैठक नसेल तर त्या शिक्षणाची किंमत शून्य आहे. त्या शिक्षणाला सत्यनिष्ठेचा व शुद्धतेचा भरभक्कम आधार नसेल तर ते कुचकामी ठरेल. आपल्या जीवनातील व्यक्तिगत शुद्धता, पवित्रता याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमचा नाश होईल. केवळ तुमच्या पांडित्याला काही किंमत नाही. महात्मा गांधी

 → दिनविशेष 

• गणेश कृष्ण खापर्डे यांचा स्मृतिदिन - १९३८ :

  गणेश खापर्डे हे विदर्भातील प्रसिद्ध सार्वजनिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय सभेचे ते मोठे | कार्यकर्ते होते. विद्वान वकील आणि सुप्रसिद्ध वक्ते म्हणून ते ओळखले जात. खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. १९०८ साली लोकमान्य टिळक | यांना कारावासाची शिक्षा झाल्यावर अपील करण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतला होता. इ. स. १८९२ मध्ये नागपूर येथे भरलेल्या सामाजिक परिषदेचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तसेच १८९७ मध्ये अमरावती येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेचे ते स्वागताध्यक्ष होते. त्यांचे मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, संस्कृत, गुजराथी या भाषांवर प्रभुत्व होते. कौन्सिल ऑफ स्टेट' मध्ये ते निवडून आले होते. त्यांची भाषा भारदस्त होती. उपरोध, खुमासदारपणा व विनोद यामुळे त्यांची भाषणे रंगत असत. वक्तृत्त्वगुणांमुळे त्यांना 'हिंदी मार्कट्वेन' म्हणत. तसेच त्यांच्या औदार्यपूर्ण वागणुकीमुळे व भारदस्त व्यक्तिमत्वामुळे त्यांना 'वऱ्हाडचे नबाब' असे म्हणत.

  

 → मूल्ये 

राष्ट्रप्रेम, आदरभावना, श्रमप्रतिष्ठा. 

अन्य घटना

 मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन याची हत्या केली - १९०९.

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना १९६१. 

 यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापना - १९८९ • बालगीते लिहिणारे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ ग. ह. पाटील स्मृतीदिन १९८९

 → उपक्रम -

   'कराग्रे वसते लक्ष्मी' या श्लोकाचा अर्थ मुलांना समजावून सांगा.  'अनंतहस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने' याचा कल्पनाविस्तार करायला सांगा. 

समूहगान 

बहू असोत सुंदर संपन्न की महा .... 

सामान्यज्ञान 

 भारतातील लोक हात जोडून नमस्कार करतात. • कांगो लोक स्वागत करताना एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालतात

 आफ्रिकन लोक स्वागत करताना कमरेत वाकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा