Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ९ जुलै, २०२३

10 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

 


प्रार्थना

- तूही राम हैं, तू रहीम हैं, तू करीम कृष्ण, ख़ुदा हुवा....... 


श्लोक 

- आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति ॥ 

- ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी सागराकडे जाते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार परमेश्वराकडे जातो.


 → चिंतन 

 -निरोगी शरीरात निरोगी मन असते. म्हणून व्यायामाने शरीर बळकट करा. 

 

-आपले शरीर निरोगी, स्वस्थ असेल तर शरीराप्रमाणे आपले मनही निरोगी राहते. निरोगी मनामुळे हेवेदावे, असंतुष्टता, चिडचिड या गोष्टी आपोआपच नाहीशा होतात. मन प्रसन्न राहते, अशा प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची माणसे सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. अर्थातच निरोगी मनासाठी निरोगी शरीर हवे आणि निरोगी राहायचे असेल, तर नियमितपणे व्यायाम करायला हवा. व्यायामाने शरीर बळकट होते, सुदृढ होते.

कथाकथन 'आईची महती'

: मुलांनो, तुम्हाला हे ठाऊक आहे की आई आपल्याला अतिशय प्रेमाने वाढविते, मोठे करते. भोवतीच्या ह्या विश्वाची आपल्याला ओळख करून देते आणि ह्या विश्वातल्या चराचराशी आपले संबंध जुळवून देते. ह्या जगाचा ती स्वतः बरा वाईट अनुभव घेते आणि आपल्या - अनुभवाच्या आधारे आपल्या चिमुकल्या पावलांना प्रकाशदायी शाश्वत वाट दाखविते. आपल्या पावलांत ताकद येईपर्यंत ती आपल्या आयुष्याची काठी होते आणि आपल्याला आधार देते. कसे ते जरा समजावून सांगते. वेल नाजूक असते. ती वेल वाढत असताना तिला काठीचा आधार घ्यावा लागतो. देस फोफावून बळकट झाल्यावर मग काठीच्या आधाराची गरज लागत नाही. आपले बालपण त्या वेलीसारखे नाजूक असते. म्हणून आईच्या आधाराने आपण मोठे होत असतो. आपण एकदा का पुरेसे मोठे झालो, की आईच्या आधाराची गरज वाटेनाशी होते. कारण आपल्या पायांत ती बळ होऊन प्रवेश करते वेल आणि काठी ह्या प्रतीकांचा वापर करून मी तुम्हाला आई आपल्या आयुष्याचा आधार कशी होते. एवढेच सांगितले. एक लक्षात घ्या की, वेल बळकट झाल्यावर काठी निरुपयोगी होते. परंतु आई कधी निरुपयोगी होत नाही, हे मात्र आपण पक्के लक्षात ठेवायला हवे. आपण जसे मोठे होत जातो, तशी आपली आईसुध्दा मोठी होत त्याकडे लागलेली असते. ती जशी वृद्ध होत जाते तसे तिचे प्रेमसुध्दा अधिक परिपक्व होऊ लागते. त्यातला गोडवा अमृतगोडव्याला मागे सारतो. हे फक्त आपल्याला नीट समजायला हवे आणि त्यासाठी आपल्या समजुतीचा विवेकी साठा मात्र अधिक हवा. मुलांनो, आपल्या आयुष्याच्या अवतीभोवती सावलीसारखी फक्त आईच असते, हे सत्य कधी विसरू नका. आपण जेव्हा प्रौढ होतो तेव्हा हीच आपले प्राणप्रिय आई खूप वेळेला अतिशय प्रिय अशा मैत्रिणीची भूमिका घेऊन आपल्याला वैचारिक प्रेमभारले आश्वासक पाठबळ देते. आपल्या आयुष्यात आधारवड शेवटी आपली आईच असते आणि त्यामुळे तिच्या प्रेमाच्या घनदाट सावलीत बसून प्रौढपणी पुन्हा एकदा आपण शैशवात प्रवेश करतो. ति पुन्हा खेळतो. त्यामुळे तिचे आईपण पुन्हा एकदा तितक्याच जोमाने उफाळून येते. आपण लहान असताना आपल्या आईने रंगविलेली आपल्या भविष्याचे स्वप्ने आपण साकार केलेली असतील तर तिच्या चेहयावरचा कृतकृत्येतचा समाधानी आनंद आपण तिच्या वृध्दपणामुळे सुरकुतलेल्या चेहयावर  शकतो. मुलांनो, तुम्हाला अंतःकरणपूर्वक सांगते, की आपण आपल्या मनाशी ही खूणगाठ पक्की करावी, की “आईची सर्व स्वप्ने मी पूर्ण करीन आणि तिसा केवळ, सुख, शांती आणि समाधान देईन." एक विचार या निमित्ताने देते की, आईच्या महतीची स्तोत्रे आपण नित्य ऐकतो. पाठ करतो; परंतु त्या मोती अक्षरे मी होईन असे मनाशी निश्चित करून, आपण आपली भविष्यकालीन पावले टाकायला नकोत का?.... 


सुविचार

 • 'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' 

दिनविशेष 

 • डॉ. अवधेश नारायण सिंह यांचा स्मृतिदिन - १९५४ :

 - त्यांचा जन्म १९०१ मध्ये बनारस येथे झाला. लखनौ विश्वविद्यालयात त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. १९२६ मध्ये 'गणितामधील शून्याचे महत्त्व' या विषयावरील लेखाबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले. १९५० मध्ये | अॅम्स्टरॅडम येथील जागतिक विज्ञान काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. नंतर त्यांनी बनारस येथील वेधशाळेचे संचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वेधशाळेत काम करीत असतानाच त्यांचे निधन झाले.

 

 → मूल्ये 

 संशोधनवृत्ती, खिलाडू वृत्ती, कर्तव्यनिष्ठा. 

 

 → अन्य घटना

  • क्रिकेटवीर सुनील गावसकर यांचा जन्मदिन - १९५४ 

  • बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले आदर्श शिक्षक थोर विचारवंत आचार्य श्रीकृष्णराव चंद्रभान ढाकरे यांचा जन्मदिन १९५७. 

 •बंगलोर विद्यापीठाची स्थापना - १९६४.

 


 → उपक्रम

  • प्रसिद्ध क्रिकेटपटूंची माहिती सांगावी. 

  • आकड्यांची मनोरंजक कोडी सोडवून घ्यावीत.

 

  •  -> समूहगान 

• हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.... 


 सामान्यज्ञान

  • क्रिकेट संबंधात भारतातील प्रमुख क्रीडांगणे. 

  • फिरोजशहा कोटला मैदान दिल्ली

   • वानखेडे स्टेडियम मुंबई ईडन गार्डन कलकत्ता 

   • ग्रीन पार्क - कानपूर • चेपॉक मद्रास 

   • बिल्यझ या खेळात विल्सन जोन्स या भारतीय खेळाडूने १९५८ व १९६४ मध्ये हौशी खेळाडूंचे दोन वेळा जागतिक अजिंक्यपद मिळविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा