Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ९ जुलै, २०२३

9 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ


 → प्रार्थना

 : खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे... 

श्लोक 

- गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवेनमः ॥ 

- गुरू हेच ब्रह्मा, विष्णू महेश्वर (शंकर) आहेत. उत्पत्ती (ब्रह्मा), स्थिती (विष्णु) व लय (शंकर) अशी तिन्ही सामर्थ्य असलेले ते परब्रह्म आहे. अशा सर्व सामर्थ्यशाली गुरुला मी नमस्कार करतो. 

चिंतन 

कार्यात यश मिळो वा न मिळो, प्रयत्न करण्यात आपण कधीही माघार घेता कामा नये. 

- माणसाने कुठलेही काम करताना, मला त्यात यश मिळेल की नाही, याचा विचार न करता, ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सतत प्रयत्न करीत राहिल्यास कोणतीच गोष्ट अवघड, असाध्य नाही. म्हणूनच तर म्हणतात, 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. 


कथाकथन 'वचनं शीलमाख्याति' : 

एक राजा दण्डकारण्यात परिवारासहित शिकारीसाठी गेला. वन्य प्राण्यांच्या मागोमाग जाणारा तो राजा, त्याचे सोबती आणि अमात्य इत्यादिपासून दूर गेला. तेव्हा ते सर्वजण राजाला शोधण्यसाठी इकडेतिकडे फिरू लागले. अरण्यामध्ये एका झोपडीत कोणी एक आंधळा साधू रहात होता. राजाला शोधण्यासाठी प्रधान अमात्याने पाठविलेला कोणी एक सैनिक तेथे आला. झाडाखाली बसलेल्या त्या अंध साधूला पाहून गर्वाने म्हणाला, “अरे आंधळ्या, आमचे महाराज येथे आले होते का?" ते एकून साधू म्हणाला, "मी आंधळा (आहे). मी पाहू शकत नाही, ""मला माहिती | आहे तू आंधळा आहेस; परंतु बहिरा नाहीस. तू घोड्याच्या पायांचा आवाजसुद्धा ऐकला नाहीस का?" अशी त्याने त्याची टिंगल केली. साधूने 'नाही' असे दिलेले उत्तर ऐकून वाईट बोलणारा तो त्या ठिकाणाहून निघून गेला. नंतर सेनापती तेथे आला 'अरे साधू, आमचे महाराज येथे आले होते काय?' असे | विचारल्यानंतर "राजा आला नाही; परंतु एक सैनिक राजाला शोधत उत्तर दिशेला गेला." असे तो म्हणाला. तेव्हा सेनापतीसुद्धा शोधण्यासाठी दुसरीकडे गेला. नंतर स्वतः प्रधान अमात्यांनी तेथे येऊन रथातून उतरून विनयाने साधूला विचारले, “अहो, साधुवर, आम्ही राजाबरोबर दुर्गम अशा वनात शिकारीसाठी आलो होतो; परंतु दुर्भाग्याने आमचे महाराज (आमच्यापासून) वेगळे झाले आहेत. आपण याविषयी थोडेफार काही जाणता का?" “भल्या माणसा, मला काहीही माहीत नाही." हे ऐकून प्रधान अमात्यही दुसरीकडे गेले.. नंतर थोड्या वेळाने थकलेला राजा तेथे आला, जिथे तो साधू बसलेला होता. हात जोडून तो राजा म्हणाला "भगवान, मी तहानेने व्याकुळ झालो आहे. मला थोडेसे पाणी पिण्याची इच्छा आहे.” तेव्हा तो साधू म्हणाला, “हे राजा! तुझे स्वागत असो. थकलेला दिसतोस. म्हणून अचानक (एकदम) पाणी पिऊ नये. कंदमुळे, फळे यांचे सेवन करा आणि नंतर पाणी घ्यावे." तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाने विचारले," खरोखरच नेत्रहीन असलेल्या आपण, मी राजा आहे हे कसे जाणले? मला शोधण्यासाठी येथे कोणी आले होते काय?" ते ऐकून हसून तो म्हणाला, "पहिल्यांदा सैनिक आपल्याला शोधण्यासाठी | आला होता. त्यानंतर सेनापती, त्यानंतर प्रधान आमात्य आणि आता आपण आलात.” तेव्हा राजाने विचारले, “त्यांची अधिकारपदेसुद्धा आपण कशी | काय जाणलीत. ते एकून तो म्हणाला, “त्यांनी वापरलेल्या विशिष्ट शब्दांनी." सैनिकाने मला 'अरे आंधळ्या' असे संबोधले. सेनापतीने 'अहो साधू' असे म्हटले. प्रधान अमात्यांनी आदराने 'साधुश्रेष्ठ' असे म्हटले, आपण प्रणाम करून 'भगवान' असे गौरवपद वापरले. राजा, आदरयुक्त असे बोलणे हे चारित्र्याच्या श्रेष्ठत्वाचे द्योतक असते.” ते ऐकून संतुष्ट झालेला राजा, 'आपण खरोखरच धन्य आहात. कारण केवळ शब्दांनी आपण शीलाची परीक्षा करता.' असे बोलून त्या श्रेष्ठ साधूला प्रणाम करून स्वतःच्या नगरात परत गेला.



सुविचार 

• माणसाची परीक्षा त्याच्या विव्दत्तेवरून, शीलावरून, कुलावरून आणि त्याच्या कर्तृत्वावरून होते.

• उत्तम सौंदर्य म्हणजे मनाचे पावित्र्य 

• जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे बेचकरी संत तुकाराम

•  जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास प्राप्त होतो. 

दिनविशेष 

• शं. वा. दांडेकर यांचा स्मृतिदिन - १९६८ : 

-हे महाराष्ट्रातील संत वाङ्मयाचे एक गाडे अभ्यासक होते. पुण्यातील सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये ते अनेक वर्षे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, नंतर प्राचार्य होते. भारतीय तत्त्वज्ञानाचे ते आग्रही पुरस्कर्ते होते. वारकरी पंथाला ज्ञान जिज्ञासेचे | साहचर्य लाभावे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरी आज सर्वसामान्य झालेली आहे. त्यांना महाराष्ट्रात सोनोपंत, सोनूमामा, मामासाहेब दांडेकर अशा नावांनी ओळखले जाते. आळंदी येथे त्यांची समाधी आहे. 


मूल्ये 

-संशोधनवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, चिकाटी. 


अन्य घटना 

• संत चैतन्य महाप्रभु यांचे महानिर्वाण - १५३३

 • ॲमेडेओ अॅव्होगँड्रो या शास्त्रज्ञाचा जन्म १७७६ 

 • दुहेरी टाक्याच्या शिवणयंत्राचा संशोधक इलियास होब यांचा जन्म १८१९ 

 • वन्यजीवन संघटनेमार्फत वाघ हा राष्ट्रीय प्राणी घोषित केला. 

 • आधुनिक 'भीम' म्हणून गाजलेले शक्तिसम्राट युजेन सँडो स्मृतीदिन.

  (नाव फेड्रिक म्युलर) - १९२६

   • डॉ. ना. भा. खरे यांच्या नेतृत्वाखाली पहिले कॉंग्रेस मंत्रिमंडळ स्थापन झाले. १९३७ 

   

उपक्रम

• मुलांना प्राणिसंग्रहालयाला भेट द्यायला सांगा व वन्यप्राणिजीवन सप्ताहाबद्दल माहिती सांगायला लावावी. • सोनोपंत दांडेकरांबद्दल अधिक माहिती मिळवावी. 

समूहगान 

- हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाव.... 


सामान्यज्ञान -

 • वारकरी संप्रदायातील प्रमुख संत

 •  संत ज्ञानेश्वर संत तुकाराम 

 • संत एकनाथ संत चोखामेळा 

 •  संत नामदेव 

 •  संत गोराकुंभार 

 •  संत सावतामाळी

 • संत सेना न्हावी 

 •संत दामाजीपंत 

 •संत नरहरी सोनार

 • संत बहिणाबाई 

 •  संत जनाबाई

 •   संत मुक्ताबाई 

 •   संत सखूबाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा