Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २३ जुलै, २०२२

आपले सण-दसरा

                                                          माझा आवडता सण

                                                             दसरा

                 विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अनेक जातीधर्माचे, विविध संस्कृतीचे लोक राहतात. लोकांच्या विविधतेप्रमाणेच भारतात विविध सण साजरे केले जातात. त्यापैकीच खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणारा सण म्हणजे दसरा.

             मला दसरा हा सण खूप आवडतो. घटस्थापनेनंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा करतात.दसऱ्यालाच विजयादशमी असेही म्हणतात.या दिवशी रामाने रावणावर विजय मिळविला होता असे म्हटले जाते. घटस्थापनेत नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा केला जातो. खूप ठिकाणी नऊ दिवस देवीची यात्रा भरते. यात्रेमुळे आमच्या गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. आम्ही यात्रेत खुप खुप मजा करतो. यात्रेत विविध वस्तू खरेदी करतो. मला फुगे खुप आवडतात. दरवर्षी मी विविध रंगांचे फुगे घेतो. अकाशपळणा खेळतो. नऊ दिवस देवीची आरती झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाचे, खेळाचे आयोजन करतो.

          दहाव्या दिवशी दसरा हा दिवस असतो.त्यादिवशी आई सकाळीच उठून दारापुढे सुंदर रांगोळी काढते. आम्ही सर्वजण सकाळपासूनच दसऱ्याचा तयारीला लागतो. माझे वडील घरातील वाहने धुतात मीही त्यांना या कामात मदत करतो.आई विविध लोखंडी वस्तू, शेतीची अवजारे धुवून घेते. ताई आणि मी झेंडूच्या फुलांचे हार व आंब्याचे तोरण तयार करून ते घराला लावतो.संध्याकाळी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. आई पूजेची तयारी करते.यात शेतीची अवजारे, शस्त्रे, दागिने,वह्या पूजा झाल्यानंतर आम्ही थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपट्याची पाने देऊन त्यांना भेटायला जातो.

 या दिवशी रात्री रावणाची प्रतिकृती तयार करून त्याच्या पुतळ्याचे दहन केले जाते.

_________________________________________

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा