Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २३ जुलै, २०२२

आपले सण-दसरा

                                                              दसरा

           हिंदू संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा सण दसरा. संपूर्ण भारतात अतिशय उत्साहात साजरा केला जाणारा दसरा हा सण आहे. ज्ञानाने अज्ञानावर, सत्याने असत्यावर, प्रकाशाने अंध:कारावर मिळवलेला विजय म्हणजे दसरा.दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा दसरा हा सण अश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जातो. नवरात्र संपल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा किंवा विजयादशमी हा दिवस साजरा करतात. या दिवसाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. रामाने याच दिवशी रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळविला होता. याच दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा युद्ध करून त्याला ठार मारले, शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानीदेवीच्या उत्साहाला दसरा या दिवसापासून सुरुवात केली. पांडव अज्ञातवासात निघाले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती व अज्ञातवास पूर्ण केल्यानंतर आपली शस्त्रे परत घेऊन त्यांनी शमीची पूजा केली तो हाच दिवस मानला जातो.

भारतात आजही मोठ्या उत्साहात व आनंदात दसरा हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक नवीन वस्तू, घर, गाडी खरेदी करतात. तसेच दसऱ्याच्या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केली जातात. काही लोक या दिवसापासून नवीन व्यवसाय सुरु करतात. प्राचीन काळी राजे लोक या दिवशी युद्धास निघत असत. 

          दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण घर सजविले जाते. घरातील वाहने, शस्त्रे धुवून स्वच्छ करतात.घराला झेंडूचे फुले,आंब्याच्या पानांचे तोरण लावतात.संध्याकाळी घरामध्ये पूजा मांडली जाते. पूजेमध्ये वह्या-पुस्तके, शस्त्रे, दागिने इत्यादी वस्तूंची पूजा केली जाते. महिला गोडाचा स्वयंपाक करतात. पूजा आटोपल्यानंतर थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक एकमेकांना भेटतात एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. आपट्याची पाने एकमेकांना भेट स्वरूपात देण्यासाठी ही दंतकथा आहे. फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होते. त्यांच्या आश्रमात खूप विद्यार्थी विद्याभ्यासासाठी येत असत. त्यापैकी एक कौत्स हा एक विद्यार्थी वरतंतू या ऋषीकडे अभ्यास करत असे. त्या काळी विद्याज्ञानाच्या मोबदल्यात शिष्य गुरूंना गुरुदक्षिणा देत असत. कौत्सलाही गुरूंना गुरु दक्षिणा द्यायची होती परंतु वरतंतूना कोणतीच गुरुदक्षिणा नको होती. परंतु कौत्स काही ऐकेना तेव्हा वरतंतूनी कौत्सची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यासाठी एका विद्येसाठी एककोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे त्यांनी कौत्सला चौदा विद्या शिकविल्या त्याप्रमाणे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या.

                      चौदा कोटी सुवर्ण मुद्रा कौत्साला जमवणे शक्य झाले नाही मग तो रघुराजांकडे गेला पण रघुराजानी आपली सर्व संपत्ती दान केली होती. याचक रिकाम्या हाती परत जावू नये म्हणून त्यांनी कौत्सास तीन दिवसांनी परत येण्यास सांगितले आणि कुबेराकडे धनाची मागणी केली परंतु कुबेर काही धन पाठवेना म्हणून त्यांनी आक्रमणाची तयारी केली. ही बातमी इंद्राला समजली, आक्रमण टाळण्यासाठी त्याने कुबेराला रघुराजाच्या राज्यातील आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पडण्यास सांगितले. सुवर्णमुद्रांचा पाऊस पाहून राजाने कौत्सास बोलाविले आणि पाहिजे तेवढं धन घेण्यास सांगितले.मात्र कौत्साने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सुवर्ण मुद्रा रघुराजाने लोकांना वाटून दिल्या. लोकांना धन मिळाले तो दिवस दसऱ्याचा होता त्या दिवसाचे स्मरण म्हणून दसऱ्याला लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा