Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

Article - उपपदे

 Articles - उपपदे


उपपदे इंग्रजी भाषेचे खास वैशिष्ट्य आहे. उपपदाना विशेषणे म्हणणे योग्य ठरते. तसेच उपपदाना Closed word clause मध्ये Determiners असे म्हणतात.

a / an चा उपयोग

1) Ex. ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरूवात व्यंजनाने होते. अशा एववचनी सामान्य नामापूर्वी 'a' हे उपपद वापरतात. a book, a pen, a pencil, a fan, a notebook etc.


2)ज्या एकवचनी सामान्यनामाची सुरुवात व उच्चार स्वराने होत असते, अशा एकवचनी


सामान्य नामापूर्वी 'an' हे उपपद वापरतात.

Ex. an ant, an orange, an inkpot, an eye, an umbrella, an ear, an animal, etc.

3) ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात स्वराने होते परंतु त्याचा उच्चार मात्र व्यंजनासारखा होतो अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी 'an' न वापरता 'a' हे

उपपद वापरतात. a unity, a university, a uniform, a union, etc.


Ex. 4) काही सामन्यनामाची सुरुवात व्यंजनाने होत असते परंतु त्यांचा उच्चार मात्र स्वराने होत असतो. तेव्हा अशा प्रकारच्या सामान्यनामापूर्वी a' न वापरता an वापरतात. an hour, an honest, etc.An, ma an,mp dedfinite Ex.


The चा उपयोग

1) जगामध्ये एकमेव असणाऱ्या अथवा अद्वितीय म्हणून उल्लेख केलेल्या नामाच्या अगोदर The हे उपपद वापरतात.

Ex.

Ex.The sun, The Moon, The Sky, The Earth, etc.


विशिष्ट ग्रंथाच्या नावाच्या अगोदर the हे उपपद वापरतात. The Ramayana, The Mahabharata, The Kuran, The Bible etc.वाद्यांच्या नावाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.


The Drum, The Harmonium, The Fluet, etc. महासागर, पर्वत, बेटांचा समुह, वाळवंट, संघराज्य, यांच्या नावाच्या अगोदर the

Ex.The Himalaya, The Arabian Ocean, The Sahara, The U.S.A.g

5) नद्यांच्या नावाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.

Ex. The Ganga, The Yamuna, The Godawari, etc.


6)

एकवचनी सामान्य नामाचा प्रथम उल्लेख आल्यास a किंवा an वापरतात. परंतु भुएकदा त्याच नामाचा उच्चार आल्यास तिथे the हे उपपद वापरतात.

Ex. I saw a cat. The cat is black.


7) Ex. Superlative degree मध्ये the वापरतात. 

8 She is the best singer.


8) राष्ट्राचे लोक तसेच बँकाची नावे यांच्या अगोदर the वापरतात.

Ex. The Indians. The Americans, The State Bank of India, The Bank of Maharashtra, etc.


9)Ex.रेल्वेच्य किंवा जहाजांच्या नामापूर्वी तसेच वर्तमानपत्राच्या नापूर्वी the हे उपपद वाप i) The Times of India.

ii) The Ratarani Express.

iii) The Gangotri.

उपपद केंव्हा वापरत नाहीत.


1) मोजता न येणाऱ्या नामापूर्वी उपपद वापरत नसतात.

Ex. Water, Advise, Milk, Oil, etc.

2) वारांच्या, महिण्याच्या, ऋतूच्या, नामापूर्वी उपपद वापरता येत नाही. Sunday, January, March, December, etc.

Ex.3) विशेषनाम तसेच पदार्थवाचक्नाम, भाव वाचक नाम यांच्यापूर्वी सहसा उपपद वापत नाह

Ex. Mohan, Kindness, etc. खेळ, कला, शास्त्रे यांच्या नामाच्या अगोदर उपपद वापरता येत नाही.

4) Ex. Cricket, Painting, Science, etc.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा