Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २२ जुलै, २०२६

चौथी शिष्यवृत्ती 2026 विषय मराठी

 


1 उतारा व त्यावर आधारित प्रश्न

1. उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक, समजपूर्वक वाचा.
2. उताऱ्यातील आशय समजून घ्या.
3. उताऱ्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन यांबाबतची माहिती नीट लक्षात घ्या.
4. उताऱ्यावर किमान ३ प्रश्न विचारले जातात.
5. प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून पर्यायांतून अचूक उत्तर शोधा.
6. उतारा पुन्हा वाचा. त्यामधील कठीण शब्द, वाक्प्रचार, आलंकारिक शब्द यांचे अर्थ समजून घ्या.
7. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित करून योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
8. उताऱ्यावरील प्रश्न मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही.
प्र.पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
📚 उतारा
                              उतारा
हंसापेक्षा लहान असणारा, पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करणारा पक्षी म्हणजे बदक, तळी, सरोवरे, डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच. हा पक्षी लहानथोरांचा आवडता पक्षी आहे. बदकांच्या पंखांचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो. आतील भाग मात्र करडा असतो. या पंखावर एक तेलकट थर असतो. त्यामुळे पाण्यात बुड्या मारूनसुद्धा त्यांचे पंख खराब होत नाहीत. बदकांच्या पायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बोटे कातडीच्या पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. याचा उपयोग त्याला पाण्यावर तरंगताना होतो. लांबून पाहताना बदक पाण्यावर पुढे सरकताना दिसते पण त्याचे पडदायुक्त पाय वल्ह्यासारखे हलत असतात व बदक मजेत पाण्यावर तरंगते. त्याची चोच जाड व चपटी असते. त्यामुळे मासे सहज पकडता येतात. कीटक, मासे, शेवाळे हे त्यांचे मुख्य अन्न, बदकाची अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठी असतात. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्याने थंडीपासून त्याचे संरक्षण होतेच शिवाय शरीराची उष्णता कायम राहते.

1. बदकाची चोच कशी असते ?
(1) जाड व चपटी 
( 2) निमुळती व मोठी
 (3) मोठी व चपटी 
(4) बाकदार व चपटी

उत्तर : मोठी व चपटी

2.  बदके आपणांस हमखास पुढीलपैकी कोठे दिसत नाहीत?
(1) तळ्यांवर
 (2) सरोवरांवर 
(3) शेतांवर 
( 4) डबक्याच्या ठिकाणी
 
उत्तर: सरोवरांवर

3. पाण्यात बुडूनसुद्धा बदकांचे पंख खराब होत नाहीत; कारण....
(1) पंख करडे असतात. 
(2) पंखावर खूप पिसे असतात. 
(3) पंखावर तेलकट थर असतो. 
(4) पंखाचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो.
उत्तर: पंखाचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा