३२. शब्दांच्या शक्ती रस व गुण
:: सराव प्रश्न :
१) 'व्यंग्यार्थ' सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला म्हणतात. (सप्टें-११)
१) अभिधा
२) लक्षणा
३) व्यंजना
४) यापैकी नाही
उत्तर-३) व्यंजना
२) 'समाजात वावरणारे साप ठेचून काढले पाहिजेत' 'साप' या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो.
(ऑगस्ट-१०)
१) वाच्यार्थ
२) व्यंग्यार्थ
३) लक्ष्यार्थ
४) सरलार्थ
उत्तर-२) व्यंग्यार्थ
३) शब्दाचा अर्थ व्यक्त करण्याच्या शक्ती असतात. या वाक्यातील गाळलेला शब्द कोणता.
(डिसें. -९८)
१) तीन
२) अनेक
३) दोन
४) चार
उत्तर-१) तीन
४)शक्तीच्या साहाय्याने प्रगट होणारा जो अर्थ असतो त्यास वाच्यार्थ म्हणतात.
१) लक्षणा
२) व्यंजना
३) शब्द
४) अभिधा
उत्तर-३) शब्द
५) रस या शब्दाचा अर्थ काय ?
१) पर्याय २ व ३
२) रूची
३) चव
४) शक्ती
उत्तर-१) पर्याय २ व ३
६)लता मंगेशकरांची जुनी गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात. या वाक्यातील ध्वनार्थ ओळखा.
१) वेदमंत्रांचा अनुभव येणे
२) मनाचा तोल जाणे
३) मनावर जादू होणे
४) मांत्रिकाने जादू करणे.
उत्तर-३) मनावर जादू होणे
७) रागावणे, हसणे, दुःख या प्रकारच्या भावनांना म्हणतात.
१) रस
२) लक्षणा
३) विभाव
४) स्थायीभाव
उत्तर-४) स्थायीभाव
८) रस हे किती प्रकारचे आहेत
१) दहा
२) नऊ
३) दोन
४) चार
उत्तर-२) नऊ
९) 'मुख्यार्थबाध' हे कशाचे निमित्त आहे? (डिसें-११)
१) अभिधा
२) लक्षणा
३) व्यंजना
४) यापैकी नाही
उत्तर-२) लक्षणा
१०) 'माझ्या डोक्यावरुन विमान गेले' या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीची
मदत होते?
१) लक्षणाशक्ती
२) अभिधाशक्ती
३) व्यंजनाशक्ती
४) स्थायीभाव
उत्तर-१) लक्षणाशक्ती
११) 'मी केशवसूत वाचला' या विधानातील ध्वन्यर्थ कोणता ते खालील पर्यायातून निवडा.
(नोव्हें.-११)
१) मी समग्र केशवसूत वाचला
२) मी केशवसुतांच्या कविता वाचल्या
३) मी केशवसुतांविषयी साहित्य वाचले
४) मी केशवसुतांचे व्यक्तिमत्व वाचले.
उत्तर-१) मी समग्र केशवसूत वाचला
१२) काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत?
१) चार
२) तीन
३) पाच
४) दोन
उत्तर-२) तीन
१३) शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला समांतर असा दूसरा अर्थ घ्यावा लागतो या शब्दाच्या शक्तीस
१) अभिधा
२) व्यंजना
३) शृंगार
४) लक्षणा
उत्तर-४) लक्षणा
१४) 'चीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तिळपापड होतो' या वाक्यातील ध्वनार्थ ओळखा.
(सप्टें- ११)
१) दु:ख होणे
२) रागाने बेफान होणे
३) पापड खाणे
४) निराश होणे
उत्तर-४) निराश होणे
१५) प्रतिस्पर्ध्याला टक्कर देताना त्याचे पाणी ओळखूनच डावपेच आखावेत. या वाक्यातील अधोरेखित
शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा. (डिसें-११)
१) मन
२) लायकी
३) अनुभव
४) शूरत्व
उत्तर-२) लायकी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा