Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

14.महाराष्ट्र राज्याची निर्मिती

 14


महाराष्ट्र राज्याची निर्मिती


स्वाध्याय


पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :



1. 1 मे 1960 रोजी -----राज्याची निर्मिती झाली.


(1) गोवा


(2) कर्नाटक


(3) आंध्र प्रदेश


(4) महाराष्ट्र


उत्तर-महाराष्ट्र

___________



2. बेळगाव येथील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात केव्हा ठराव मंजूर करण्यात आला ?


(1) 17 जून 1947


(2) 12 मे 1946


(3) 10 डिसेंबर 1948


(4) 28 जुलै 1946


उत्तर-12 मे 1946

_______________




3. 1915 मध्ये ----. यांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली. होती


(1) लोकमान्य टिळक


(2) न. चिं. केळकर


(3) कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे


(4) एस. के. दार


उत्तर-लोकमान्य टिळक

_______________




4. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


(1) शंकरराव देव - महाराष्ट्र एकीकरण परिषद


(2) एस. फाजल अली - राज्य पुनर्रचना आयोग


(3) एस. एम. जोशी - काँग्रेस वर्किंग कमिटी


(4) एस. के दार - दार कमिशन


उत्तर-एस. एम. जोशी - काँग्रेस वर्किंग कमिटी

________________




5. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?


(1) डॉ. राजेंद्रप्रसाद


(2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर


(3) पं. जवाहरलाल नेहरू


(4) सरोजिनी नायडू


उत्तर-डॉ. राजेंद्रप्रसाद

_______________




6. भाषावार प्रांतरचनेसाठी----- स्थापना करण्यात आली. रोजी दार कमिशनची


(1) 16 जून 1947


(2) 17 जून 1947


(3) 12 मे 1946


(4) 17 जून 19461124


उत्तर-17 जून 1947

_______________



7. जे. व्ही. पी. समितीच्या अहवालाविरुद्ध जनजागृतीसाठी---- यांनी प्रभातफेऱ्या काढल्या.


(1) साने गुरुजी


(2) प्र. के. अत्रे


(3) सेनापती बापट


(4) प्रबोधनकार ठाकरे


उत्तर-सेनापती बापट

_____________





8. त्रिसदस्य समितीस---- या तीन सदस्यांच्या आद्याक्षरांवरून जे. व्ही. पी. समिती म्हणून ओळखले जाते.


- (1) जवाहरलाल - वल्लभभाई - पट्टाभिसीतारामय्या


(2) जवाहरलाल - विलासराव देशमुख - प्रबोधनकार ठाकरे


(3) वल्लभभाई प्र. के. अत्रे - जवाहरलाल


(4) पट्टाभिसीतारामय्या - वल्लभभाई पटेल - प्र. के. अत्रे


उत्तर-जवाहरलाल - वल्लभभाई - पट्टाभिसीतारामय्या

____________________




9. मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव----- यांनी मांडला.


(1) ग. त्र्यं. माडखोलकर


(2) आचार्य अत्रे


(3) द. वा. पोतदार


(4) शंकरराव देव


उत्तर-आचार्य अत्रे

______________





10. काँग्रेसने भाषावर प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता ----नेमली.


(1) त्रिस्तरीय समिती


(2) त्रिसदस्य समिती


(3) दार कमिशन


(4) राज्य पुनर्रचना आयोग


उत्तर-त्रिसदस्य समिती

______________




11. पुढीलपैकी बरोबर विधान ओळखा :


(1) 10 डिसेंबर 1948 रोजी त्रिसदस्य समिती नेमली.


(2) 17 जून 1947 रोजी दार कमिशनची स्थापना केली.


(3) 29 डिसेंबर 1948 रोजी 'राज्य पुनर्रचना आयोग' स्थापन केला.


(4) 29 डिसेंबर 1953 रोजी काँग्रेसने भाषावार प्रांतरचना करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली.


उत्तर-17 जून 1947 रोजी दार कमिशनची स्थापना केली.

_________________




12. मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस कोणी केली ?


(1) दार कमिशन


(2) राज्य पुनर्रचना आयोग


(3) जे. व्ही. पी. समिती


(4) नागपूर करार


उत्तर-राज्य पुनर्रचना आयोग

_________________




13. 28 सप्टेंबर 1953 मध्ये मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापण्याकरिता ,-----करण्यात आला.


(1) नागपूर करार


(2) दार कमिशन


(3) राज्य पुनर्रचना आयोग


(4) त्रिसदस्य समिती


उत्तर-नागपूर करार

_____________




14. 28 सप्टेंबर 1953 च्या कराराप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेचे वर्षातील एक अधिवेशन-----  येथे घेण्याचे निश्चित. करण्यात आले.


(1) पुणे


(2) मुंबई


- (3) नागपूर


(4) औरंगाबाद


उत्तर-नागपूर

_________




15. नागपूर करारामध्ये 1956 च्या संविधानातील दुरुस्तीप्रमाणे कलम 371 (2) नुसार पुढीलपैकी कोणत्या अटीचा समावेश नाही?


(1) विकास कार्यासाठी अतिरिक्त निधी


(2) तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी


(3) लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यशासनाच्या सेवेत नोकऱ्यांची संधी


(4) महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक अधिवेशन नागपूरला घेणे


उत्तर-लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यशासनाच्या सेवेत नोकऱ्यांची संधी

_________________




16. कामगार मैदानावर झालेल्या सभेत "महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याच्या प्रयत्नाला आपण प्राणपणाने विरोध करू." असे कोण म्हणाले ?


(1) सुमतीबाई गोरे


(2) कमलाताई मोरे


(3) शंकरराव देव


(4) कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे


उत्तर-शंकरराव देव

___________




17. 21 नोव्हेंबर 1955 रोजी----- यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर काढलेल्या मोर्चावर लाठीमार झाला.


(1) भाई माधवराव बागल


(2) कॉ. श्रीपाद अमृत डांगे


(3) एस. एम. जोशी


(4) सेनापती बापट


उत्तर-सेनापती बापट

_____________




18. काँग्रेस वर्किंग कमिटीने संमत केलेल्या त्रिराज्याच्या प्रस्तावाला विरोध म्हणून करण्यात आलेले आंदोलन गतिमान करण्याकरिता -----रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पाळण्यात आला.


(1) 8 नोव्हेंबर 1955


(2) 21 नोव्हेंबर 1955


(3) 18 नोव्हेंबर 1955


(4) 7 नोव्हेंबर 1955


उत्तर-21 नोव्हेंबर 1955

_________________





19. 16 जानेवारी 1956 रोजी मुंबई केंद्रशासित ठेवण्याचे कोणी जाहीर केले?


(1) मोरारजी देसाई


(2) वल्लभभाई पटेल


(3) पंडित जवाहरलाल नेहरू


(4) पट्टाभिसीतारामय्या


उत्तर-पंडित जवाहरलाल नेहरू

__________________




20. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केव्हा करण्यात आली?


(1) 6 फेब्रुवारी 1956


(3) 6 फेब्रुवारी 1957


(2) 7 ऑगस्ट 1956


(4) 7 फेब्रुवारी 1956


उत्तर-6 फेब्रुवारी 1956

______________




21. संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते ?


(1) एस. एम. जोशी


(2) डॉ. त्र्यं. रा. नरवणे


(3) कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे


(4) प्र. के. अत्रे


उत्तर-कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे

__________________





22. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा :


(1) पंडित जवाहरलाल नेहरू - भारताचे पंतप्रधान


(2) मोरारजी देसाई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री


(3) कॉ. श्रीपाद अमृत डांगे - संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष


(4) एस. एम. जोशी - संयुक्त महाराष्ट्र समितीचे उपाध्यक्ष


उत्तर-एस. एम. जोशी - संयुक्त महाराष्ट्र समितीचे उपाध्यक्ष

____________________





23. पुढीलपैकी संयुक्त महाराष्ट्र समितीसंबंधी चुकीचे विधान ओळखा :


(1) 27 जुलै 1956 रोजी दिल्ली येथे मोर्चा काढला.


(2) लोकसभा, विधानसभा व महानगरपालिकांच्या निवडणुका जिंकल्या.


(3) संयुक्त महाराष्ट्राच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली.


(4) संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे आंदोलन महाराष्ट्रातील खेडोपाड्यांपर्यंत पोहोचवले. 


उत्तर-संयुक्त महाराष्ट्राच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली.

___________________





24. 30 नोव्हेंबर 1957 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीने ----यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर प्रचंड मोर्चा काढला.


(1) भाई माधवराव बागल


(3) प्रबोधनकार ठाकरे


(2) सेनापती बापट


(4) उद्धवराव पाटील


उत्तर-भाई माधवराव बागल

____________________





25. मराठी भाषकांच्या भावनांची जाणीव पंडित जवाहरलाल नेहरू यांना केव्हा झाली?


(1) 27 जुलै 1956 रोजी दिल्ली येथे मोठा मोर्चा काढल्यावर


(2) भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर प्रचंड मोर्चा काढल्यावर


(3) 28 जुलै 1946 रोजी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र एकीकरण परिषद' भरल्यावर


(4) सेनापती बापट यांनी जनजागृतीकरिता प्रभात फेऱ्या

काढल्यावर


उत्तर-भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर प्रचंड मोर्चा काढल्यावर

_______________________




26. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा कोणी केली ?


(1) पं. जवाहरलाल नेहरू


(2) इंदिरा गांधी


(3) यशवंतराव चव्हाण


(4) शंकरराव चव्हाण


उत्तर-पं. जवाहरलाल नेहरू

__________________




27. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून -----. यांनी जबाबदारी -स्वीकारली


(1) यशवंतराव चव्हाण


(2) पृथ्वीराज चव्हाण


(3) शंकरराव चव्हाण


(4) विलासराव देशमुख


उत्तर-यशवंतराव चव्हाण

__________________




28. महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक प्रांतांच्या रचनेस संसदेने---- मध्ये मान्यता दिली.


(1) एप्रिल 1960


(2) एप्रिल 1959


(3) मे 1960


(4) मे 1956


उत्तर-एप्रिल 1960

_____________




29. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रे यांच्या---- वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली.


(1) नवयुग


(2) प्रबोधन


(3) मराठा


(4) नवाकाळ


उत्तर-मराठा

_________




30. 'मावळा' या टोपणनावाने यांनी व्यंगचित्रे काढून संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन व्यापक बनवले.


(1) प्रबोधनकार ठाकरे


(2) बाळासाहेब ठाकरे


(3) राज ठाकरे


(4) उद्धव ठाकरे


उत्तर-बाळासाहेब ठाकरे

______________





31. 106 हुतात्म्यांचे स्मारक कोठे उभारण्यात आले ?


(1) पुणे


(2) दिल्ली


(3) मुंबई


(4) नागपूर


उत्तर-मुंबई

_________




32. चित्रातील व्यक्तीचे नाव ओळखा.


(1) प्र. के. अत्रे


(2) उद्धवराव पाटील


(3) एस. एम. जोशी


(4) यशवंतराव चव्हाण


उत्तर-एस. एम. जोशी

_______________





33. चित्रातील शाहिराचे नाव ओळखा.


(1) द. ना. गवाणकर


(2) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे


(3) विठ्ठल उमप


(4) शाहीर अमर शेख


उत्तर-शाहीर अमर शेख

_______________




34. 29 डिसेंबर 1953 रोजी भारत सरकारने ----अध्यक्षतेखाली 'राज्य पुनर्रचना आयोग' स्थापन केला. यांच्या


(1) न्यायमूर्ती एस. फाजल अली


(2) न्यायमूर्ती एस. के. दार


(3) डॉ. राजेंद्रप्रसाद


(4) पंडित जवाहरलाल नेहरू


उत्तर-न्यायमूर्ती एस. फाजल अली

__________________




35. 6 फेब्रुवारी 1956 रोजी---- यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय सभा होऊन 'संयुक्त महाराष्ट्र समिती 'ची स्थापना झाली.


(1) प्र. के अत्रे


(2) केशवराव जेथे


(3) श्रीपाद अमृत डांगे


(4) मधु दंडवते


उत्तर-श्रीपाद अमृत डांगे

_________________





36. 'मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अमलाखाली असावी,' असा विचार कोणी मांडला ?


(1) लोकनायक अणे


(2) न. चिं. केळकर


(3) आचार्य अत्रे


(4) सेनापती बापट


उत्तर-न. चिं. केळकर

______________




37. दार कमिशनची स्थापना कोणी केली ?


(1) पंडित जवाहरलाल नेहरू


(2) सरदार वल्लभभाई पटेल


(3) डॉ. राजेंद्रप्रसाद


(4) महात्मा गांधी


उत्तर-डॉ. राजेंद्रप्रसाद

________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा