Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

9 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

           9 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना

 खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे..

 

 → श्लोक 

 - उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः । न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः । 

 -  खरोखर, उद्योगानेच कार्ये सिद्धीला जातात, नुसत्या मनोरथ रचण्याने नाही! झोपलेल्या सिंहाच्या तोंडात प्राणी आपणहून प्रवेश करीत नाहीत. 

 

→ चिंतन आली जरी कष्टदशा अपार, न टाकिती धैर्य तथापि थोर केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळी - वामन पंडित.


कथाकथन 

आई वात्सल्य "आई" किती अर्थ सामावलेला आहे या दोन शब्दात, 'आ' म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर आणि ईश्वर या दोन शब्दांचा मेळ म्हणजे आई. खरंच आईसारखे जगात कोणतेच देवत नाही. प्रेम, वात्सल्य, दया, माया, या गुणांनी ती परिपूर्ण अ ती स्वतः दुःख सहन करून आपल्या मुलांवर संस्कार करीत असते. आपल्या देशात जे जे महापुरुष, धोर विभूती होऊन गेल्यात त्यांना पवि खरी शिल्पकार त्यांची आईच आहे. आपल्या संगोपनाचे कर्तव्य पार पाडत असतांना आई मनात कोणतीच अपेक्षा बाळगत नाही. मुलांचे प्रत्येक | करीत असताना तिला वेगळाच आनंद होत असतो. आईची वृत्ती ही नेहमी देण्याची व सहनशीलतेची असते. पृथ्वीला धरती माता म्हटले आहे. धरतीमध्ये एक बी पेरले तर असंख्य दाणे ती परत देते. कितीही ऊन पडो, पाऊस पडो, थंडी असो सारे सहन करत राहते व आपल्याला जीवन सर्व काही देत राहते. आई जर देवाचरणी काही मागत असेल तर आपल्या मुलाबाळांचे सुखच. आई खरंच काय असते? घरातील लहान मुलांची माय असते, सर्वस्व असते, घरातील सर्व सत्व त्या आईत सामावलेले असते दीन-दुबळ्यांच्या आजारी, वृद्धांचा सान्यांचा ती आधार असते. ती जणू लंगड्याचा पाय असते, म्हणूनच कवी म्हणतात की, आई म्हणजे आई खरंच काय असते? - लेकराची माय असते । वासराची गाय असते ।। दुधावरची साय असते । लंगड्याचा पाय असते । खरंच आईसारखं श्रेष्ठ दैवत नाही, ईश्वराच्या अपार प्रेमाची कल्पना आईच्या प्रेमावरून येते. ईश्वराला आई म्हणून हाक मरणं किंवा आईलाई समजण या सारखी दुसरी गोष्ट नाही. आईचे उपकार कधीच फिटत नसतात. या उपकाराचं स्मरण म्हणजे ईश्वराचे स्मरण होय. सर्व श्रेष्ठ आई ही फ एक नारी नसून ती साक्षात देवतां आहे त्या संदर्भात एक कथा आई मुलगा व मुलाची पत्नी असे तीन व्यक्ती एका कुटुंबात राहत होते एके दिवशी मुलाने व मुलाच्या पत्नीचे भांडण झाले मुलाची पत्नी रागाच्या भरात आपल्या माहेरी गेली. काही दिवस लोटले मुलाच्या आईला काळजी वाटू लागली. | दिवशी आईने मुलाला म्हटले, 'मी देवाघरी गेल्यावर तुला सांभाळणारे कोण आहे?" जा आपल्या पत्नीला घेऊन ये. आईने मुलाला खूप समजाय अखेर मुलाला म्हणणे पटले मुलगा आपल्या पत्नीच्या माहेरी गेला. त्याने आपल्या पत्नीला परत चलण्यास सांगितले; परंतु पत्नीने नकार दिला. दिला | वाटले आता आपण आपल्या पतीची परीक्षा घ्यावी पत्नीने पतीला म्हटले मी परत येते; परंतु एक अट आहे. मी जर परत यावेसे वाटत असेल तर मला तुझ्या आईचे काळीज आणून दे. मुलगा विचारात पडला. त्याने काय करावे बरे?' तो न बोलता आपल्या गावी परतला. आपल्या घरी गेल्या त्याने ती सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. आईच्या सर्व काही लक्षात आले. तिने विचार केला की, आता मी वृद्ध झाले आहे, लवकरच देवाघरी जायचे आहे. तेव्हा आपल्या मुलाच्या सुखासाठी आपण हे करायला हवे. तेव्हा आई आपल्या मुलाला म्हणाली, तू माझे काळीज घेऊन | आपल्या पत्नीला आणायला जा. मुलाने कसलाही विचार न करता आईच्या सांगण्याप्रमाणे तसेच केले. तो आईचे काळीज घेऊन वाटेने निघाल | वाटेवरून चालता चालता त्याच्या पायाला दगडाची ठेच लागली व त्याच्या हातातून आईचे काळीज खाली पडले तेव्हा ते काळीज मुलाला म्हणाले | बेटा तुला काही लागले तर नाही ना । यावरून असे लक्षात येते की, आईचे काळीजही आपल्या मुलाची काळजी घेते तर मग आई किती श्रेष्ठ असेल?



→ सुविचार. -

 • गुरुपेक्षा श्रेष्ठ, आकाशापेक्षा उंच, सागरापेक्षा अथांग आईचे वात्सल्य असते.

  • आई व मुलांचा सहवास अधिक असल्याने मुलांच्या जडणघडणीत आईचा महत्त्वपूर्ण वाटा जास्त असतो. 


→ दिनविशेष •

• वामन पंडित स्मृतिदिन - १६९५ - - पंडितकवी म्हणून प्रसिद्ध वामन पंडित विजापूरचे राहणारे. काही कारणाने त्यांनी विजापूर सोडले व काशी येथे जाऊन संस्कृत भाषेचा व तत्कालीन शास्त्रांचा अभ्यास केला. विद्वत्ता प्राप्त झाली. तरी त्यांच्या चित्तास समाधान प्राप्त झाले नाही म्हणून त्यांनी 'मलयाचला' वर तपश्चर्या केली. तेथे ध्यानमग्न असता कोणा यतीने जो उपदेश केला तो वामन पंडितांनी 'निगमसार' या ग्रंथात | साठविला आहे. यानंतरही 'कर्मतत्त्व, 'समश्लोकी,' 'सिद्धांतविजय', 'अनुभूतिलेश' इत्यादी लहान-लहान अध्यात्म प्रकरणे पंडितांनी लिहिली. परंतु त्यांचे खरे बौद्धिक सामर्थ्य दिसून येते ते त्यांनी लिहिलेल्या 'यथार्थदीपिके' त त्यांच्या आख्यानक कविता अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या आहेत. | श्लोक वाचावा तर वामन पंडितांचा असे आजही मानले जाते. 'सुश्लोक वामनाचा' हे वचन तर सर्वपरिचित आहे. 'गजेंद्रमोक्ष, सीतास्वयंवर, कात्यायनी व्रत, वनसुधा, वेणुसुधा' आदी ग्रंथरचनाही त्यांनी केल्या आहेत. गंगालहरी (जगन्नाथ पंडित), नीतिशतके (भर्तृहरी) यांचा सुरेख अनुवाद वामन पंडितांनी केलेला आहे. कृष्णा नदीच्या काठाकाठाने तीर्थक्षेत्र पाहत पाहत ते महाबळेश्वराकडे निघाले असता वाटेतच गुन्हेघर येथे ९ एप्रिल १६९५ रोजी ते समाधिस्थ झाले. वामन पंडितांनी मराठी भाषेवर व लोकांच्या आपल्या साहित्यनिर्मितीने अपार उपकार करून ठेवले आहेत. 


→ मूल्ये - 

• परिश्रम, सर्जनशीलता 


→ अन्य घटना 

• राहुल सांस्कृत्यायन या जागतिक कीर्तीच्या भारतीय महापंडिताचा व लेखकाचा जन्म. - १८९३ 


→ उपक्रम -

 • वामन पंडितांच्या काही प्रसिद्ध श्लोकांचे वाचन करून त्यांचा अर्थ थोडक्यात सांगणे, शक्य झाल्यास काही ग्रंथांचे दर्शन घडविणे. 


→ समूहगान - 

• जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता... 


→ सामान्यज्ञान 

प्राचीन संस्कृत लेखक व त्यांच्या साहित्यकृती :

 • बाणभट्ट - हर्षचरित, कादंबरी 

 • कालिदास कुमारसंभव, मेघदूत, शाकुंतल 

 • भवभूती मालतीमाधव, उत्तररामचरित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा