Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

8 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

          8 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना 

सवयते दानात् न तु वित्तस्य संचयात् । स्थितिरूच्चैः पयोदाना पयोधीनामथः स्थितीः ।। 

घनाचे दान केल्यामुळे मोठेपणा प्राप्त होतो, धनाचा साठा केल्याने नाही. पाणी देणाऱ्या ढगांची जागा उंच आकाशात असते पण पाणी साठवून ठेवणाऱ्या सागराची जागा खाली असते. 


→ चिंतन

- सर्जनशील कलावंताची वाट नेहमी स्वतंत्र असते. मळलेल्या वाटेचं तो अनुकरण करणार नाही. शोधाच्या मार्गी सातजण जाऊ शकत नाहीत. तो एकट्यापुरताच असतो. त्याशिवाय अन्य उपाय नाही. स्वतःच्या नावेत, स्वतःचे पीक आणि स्वतःचे बंदर हाच प्रवास ही एकच मुक्ती. याशिवाय दुसरं चांगलं नाही. अवनींद्रनाथ ठाकूर


कथाकथन

 ही एक मुली 'वन्दे मातरम्' चे जनक बंकिमचंद्र : स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्याच्या गगनभेदी घोषणांनी सारे भारतीय इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठले हसत हसत फासावर गेले, त्या वेदमंत्राहन प्रिय असलेल्या 'बन्दे मातरम्' या राष्ट्रगीताचे जनक राज्यातनाम बंगाल का किमचंद्र चटर्जी जन्म २६ जून १८३८ रोजी कोलकात्याजवळ कांतलपारा या गावी झाला. १८५८ मध्ये बी.ए.ची परीक्षा दिल्यावर बकिमचंद्रांनी कायद्याचा अभ्यास केला व ते डेप्युटी मॅजिस्ट्रेट झाले आणि १८२१ मध्ये निवृत्त झाले. बंकिमचंद्रांचे संस्कृत भाषेवर मोठे प्रभुत्व होते. १८७२ नंतर त्यानी, कादंबरीलेखनाला सुरुवात केली. त्यांच्या कादंबऱ्या सामाजिक, ऐतिहासिक व संमिश्र अशा तीन प्रकारच्या आहेत. दुर्गेश नंदिनी, कापालकुंडला, मृणालिनी, रजनी, चंद्रशेखर, विषवृक्ष, आनंदमठ इ. त्यांच्या कादंबऱ्या फार प्रसिद्ध आहेत. याशिवाय बंकिमचंद्रांनी ऐतिहासिक, धार्मिक व सात्विक, चर्चात्मक निबंध लिहून बंगाली भाषेचे वैभव वाढविले. 'आनंदमठ' ही बंकिमचंद्रांची अत्यंत गाजलेली कादंबरी. ही त्यानी १८८२ साली लिहिली. बंगालमधील दुष्काळ व संन्यासी लोकांचे बंड यावर ही कादंबरी आहे. याच कादंबरीत 'वन्दे मातरम्' हे गीत आले आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रगीत झाले. हे गीत संस्कृत व बंगाली भाषेत असून | दात मातृभूमिचे मंगल, प्रसन्न रूप अति उग्र, भेसूर रूप ही दोन्ही रूपे चांगल्याप्रकारे वर्णिली आहेत. या कादंबरीचा नायक 'भावानंद' हा जंगलातून फिरताना त्याच्या मुखी हे गीत आहे. या गीताचा जनमानसावरील खरा प्रभाव १९०५ मध्ये दिसून आला. त्या साली कर्झनने बंगालची फाळणी केली. त्याविरुद्ध सारा देश पेटून उठला. प्रत्येकाच्या तोंडी 'वन्दे मातरम्' ही घोषणा झाली. या गीताचे ध्वनी सान्या भारतभर उमटले. प्रत्येक जण भारतमातेच्या मुक्तीसाठी पेटून उठला. छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलू लागला. बंकिमचंद्रांच्या या कार्याचा गौरव म्हणून कोलकात्ता विद्यापीठाने त्यांचा पुतळा उभारला आहे. असा हा श्रेष्ठ साहित्यिक ८ एप्रिल १८९४ रोजी मरण पावला. परंतु 'वन्दे मातरम्' या गीताने त्यांची स्मृती भारतीयांच्या मनात कायम आहे

 

. सुविचार 

'वन्दे मातरम्' चा अर्थ हे भारतमाते, तुला आम्ही वंदन करतो. तू उत्तम संपन्न असलेली उत्तमोत - बनलेली, मलयगिरीवरील चंदनाच्या बनातून वाहात येणाऱ्या सुगंधित वाज्यांनी शांत शीतल झालेली आणि सर्व प्रकारांनी हिरवीगार दिसणारी आहेस. हे मातृभूमि, तुला आम्ही वंदन करतो. हे भारतमाते, रात्रीच्या शुभ्रधवल चांदण्याने तू रोमांचित होत असतेस. फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीमुळे तू शोभायमान दिसतेस. तू नेहमीच प्रसन्न राहतेस. तू मधुर भाषण करणारी आहेस. तू आम्हाला सदैव सुख देत असतेस, आमच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करतेस. हे माते तुला आम्ही वंदन करतो.सुविचार 'वन्दे मातरम्' चा अर्थ हे भारतमाते, तुला आम्ही वंदन करतो. तू उत्तम संपन्न असलेली उत्तमोत - बनलेली, मलयगिरीवरील चंदनाच्या बनातून वाहात येणाऱ्या सुगंधित वाज्यांनी शांत शीतल झालेली आणि सर्व प्रकारांनी हिरवीगार दिसणारी आहेस. हे मातृभूमि, तुला आम्ही वंदन करतो. 


हे भारतमाते, रात्रीच्या शुभ्रधवल चांदण्याने तू रोमांचित होत असतेस. फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीमुळे तू शोभायमान दिसतेस. तू नेहमीच प्रसन्न राहतेस. तू मधुर भाषण करणारी आहेस. तू आम्हाला सदैव सुख देत असतेस, आमच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करतेस. हे माते तुला आम्ही वंदन करतो.दिनविशेष - 

• वालचंद हिराचंद दोशी स्मृतिदिन - १९५३ - वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८८२ रोजी झाला. कौटुंबिक अडचणींमुळे महाविद्यालयाचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. ठेकेदारीचा व्यवसाय सुरू केला. धाडसी वृत्ती, प्रखंड कामे मुदतीच्या आत चोख करण्याची वृत्ती यामुळे व्यवसाय लवकरच भरभराटीस आला. देश स्वतंत्र होऊन समृद्ध व्हावा ही तळमळ. तूच प्रतिकूल परिस्थितीतूनही हिंदी तरुणांना वाव देण्यासाठी इंडियन ह्यूम पाईप कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, दिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी, विशाखापट्टणमुचा जहाज बांधणी कारखाना, बंगलोर येथील हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी हे उद्योग सुरू करून भरभराटीस आणले. रावळगाव व कळंब येथील निकृष्ट, बरड जमीन घेऊन येथे उत्कृष्ट शेती करून दाखविली व साखर कारखाने सुरू केले. कळंब या शाला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वालचंदनगर असे नाव दिले गेले. एका दीर्घोद्योगी कर्मयोग्याला हा मानाचा मुजराच होय.


 • मूल्ये 

 • स्वातंत्र्यप्रेम, राष्ट्राभिमान, सर्जनशीलता. 


→ अन्य घटना

 • क्रांतिकारक मंगल पांडे यांना फाशी - १८५७.

  • डॉ. वि.मि. कोलते स्मृतीदिन - १९९८ 


→ उपक्रम -

 • बंकिमचंद्रांच्या 'आनंदमठ' या कादंबरीतील हकीकत सांगणे, बंकिमचंद्रांचे चित्र प्रदर्शित करणे. • महाराष्ट्रातील उद्योजकांची माहिती मिळविणे. 


→ समूहगान 

• हम युवकों काऽऽऽनारा है, हैऽहैऽ.... → सामान्यज्ञान -

 • बंकिमचंद्रांचे साहित्य : रॉय मोहन्स वाईफ (इंग्रजी). दुर्गेशनंदिनी, कपाल कुंडला, मृणालिनी, विषवृक्ष, चंद्रशेखर, कृष्णकांतेर विल, आनंदमठ, देवी चौधुराणी, सीताराम इत्यादी. 


प्रबंध ग्रंथ 

• कमलाकांतेर दप्तर, विज्ञान रहस्य, लोकरहस्य, साम्य, विविध प्रबंध, कृष्णचरित्र, धर्मतत्त्व इ. • संपादन - वंगदर्शन (नियतकालिक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा