Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

9 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 ९ मार्च



→ प्रार्थनाl

 खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.... 

 → श्लोक (दोहे) - राग द्वेष कूं छांडि कर, निहकरम करहु रे मीत । सुख दुख सम रहिं थिर रंहि, 'रविदास' सदा मन जीत ।। 

  रविदास दर्शन अरे मित्रा, तू राग, द्वेष सोडून निष्काम भावाने कर्म करशील तर सुख व दुःखात तुझे मन नेहमी स्थिर राहील. खरा धर्म राग आणि द्वेष यापासून दूर राहण्याची शिकवण देतो. राग आणि द्वेष युक्त कोणतीही व्यक्ती शून्य अवस्था प्राप्त करू शकत नाही. 

  

→ चिंतन

- भगवान बुध्दांचा उपदेश - हत्या करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका, निंदा करू नका, कठोर बचने, बोलू नका वृथा बोलण्यात वेळ घालवू नका, दुसऱ्याच्या संपत्तीची अभिलाषा धरू नका, ईर्षा किंवा द्वेष बालगू नका, न्याय नीतीने


कथाकथन

 - 'संत तुकाराम'- संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे बालपण आई-वडिलांच्या प्रेमळ छत्राखाली अतिशय मजेत गेले. रंगाने असलेला तुका दिसायला अतिशय देखणा होता. तेज:पुंज होता. आईचा अतिशय लाडका होता. इंद्रायणीच्या डोहात डुंबायला त्याला खूप आवडायचे. मुलांबरोबर तो खूप खेळायचा. तुकारामाच्या बोलण्यात एका प्रकारचे लाघवीपण होते. दिवसभर हुंदडणारा तुका उन्हें उतरायला लागली की, मग मात्र आईच्या भोवतीभोवती फिरत राहायचा. आई छोट्या तुक्याला संत ज्ञानेश्वरांची आणि संत नामदेवांची गोष्ट सांगायची, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचून दाखवायची, नामदेव महाराजांचे सहज सोपे अभंग पाठ करून घ्यायची. रात्र कोंदाटू लागली की तुका आईच्या कुशीत झोपायचा. झोपताना मात्र आई खूप वेळेला नामदेवासंबंधी सांगायची. म्हणायची, "बरे का तुका' आपला हा नामदेव तुझ्यासारखा छोटा असताना, पंढरपुरातल्या आपल्या घरासमोरच्या विठ्ठल मंदिरात नैवेद्याचे ताट घेऊन जायचा आणि साक्षात श्रीविठ्ठलाला घास भरवायचा. श्रीविठ्ठला बरोबर संवाद करायचा. त्याने खूप सुंदर अभंग लिहिले. तुकारामा, माझी इच्छा आहे की तू सुद्धा नामदेवासारखा विठ्ठलभक्त हो... अभंग लिही. नामदेवाने ठरविले होते की, शतकोटी अभंग लिहिन म्हणून. त्याने विठ्ठलासमोर तशी प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा आता तू पूर्ण कर....' कनकाई म्हणजे तुकारामाची आई छोट्या तुकोबावर संत नामदेवांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचे संस्कार करायची. छोट्या तुकारामाला रोज अभंग पाठ करायला लावायची. त्याचा परिणाम असा झाला की, छोटा तुका पहाटे उठून, इंद्रायणीच्या डोहात स्वच्छ आंघोळ करुन, विठ्ठल मंदिरात जाऊ लागला आणि नामदेव महाराजांचे अभंग अतिशय गोड आवाजात म्हणू लागला. कनकाई रोज पहाटे छोट्या तुकाबरोबर देवळात जायची. तुकारामावर त्यांच्या आईने अप्रतिम संस्कार केले. हळूहळू तुकाराम तरुण होऊ लागला. स्वत:च अभंग रचू लागला. तेव्हा कनकाईला खूप आनंद व्हायचा. तुकाराम महाराजांचे अभंग लोकांच्या जिभेवर आहेत. हे संत तुकोबाराय छत्रपती शिवरायांचे गुरु होत. मुलांनो या गोष्टीवरुन ध्यानात घ्यायची गोष्ट काय तर तुकाराम महाराजांसारखी आपण सुद्धा आईची इच्छा पूर्ण करावी. आपल्या प्रिय आईला आपल्या कर्तृत्वाचा आनंद उपभोगायला द्यावा.

 

 • सुविचार

  • सत्य आणि न्याय याहून कोणताही धर्म मोठा नसतो. म. 

  गांधी. 

  • जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वतःला स्वांतत्र्यात राहण्याचा अधिकार नाही - अब्रहम लिंकन 

  • कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्मे सर्वेश्वर पूजनाचे संत तुकाराम. 

 


दिनविशेष

 स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही - अब्रहम लिंकन• कोणाही जिवाचा न घडो मत्सर । बमें सर्वेश्वर पूजनाचे - संत तुकाराम.. वली असती आलेला | - • संत तुकाराम निर्वाण दिन १६५० : वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतांपैकी संत तुकाराम अखेरचे संतकवी. मोऱ्यांच्या कुळातील सघन व धर्मनिष्ठ अशा अंबिले घराण्यात सन १६०८ मध्ये देहू येथे तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकोबांचा वंशपरंपरागत व्यवसाय॒ जाण्याचा होता. शिवाय त्यांच्या घराण्यामध्ये महाजनकीचा अधिकार होता. इनामाची शेती व सावकारीही होती. सुखवस्तू व प्रतिष्ठित असे हे घराणे होते. मालकीचे पांडुरंग मंदिर असल्याने तेथे होणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच त्यांना बहुश्रुतपणा आलेला होता. त्यांचे वडीलबंधु स्वतःची पत्नी वारल्यानंतर तीर्थाटन करण्यास निघून गेले ते परतलेच नाहीत. त्यामुळे वयाच्या केवळ सतराव्या वर्षी व्यवसायासाह सर्व प्रपंचाचा भार हुकारामांवर येऊन पडला. मराठी साहित्यात तुकारामांच्या अभंगगाथेने अढळ स्थान मिळविले आहे. मराठी काव्याचे ते एक शाश्वत भूषण आहे. तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील मन, मेंदु व मनगटे घडविणारे महान शिल्पकार होते. सामाजिक विषमतेच्या दन्य, अंधश्रध्देची निष्फळ झाडे नष्ट करणारे ते जगतगुरू होते. शिवछत्रपती यांचे ते गुरु होते. अंधश्रद्धा, बुवाबाजी, भुतखेत, शकुन-अपशकुन यावर टीकास्त्र केले. अभंगातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।


→ मूल्ये -

 • शुचिता, बंधुता, आदरभाव, भूतदया, समता, मानवता, प्रेम, क्षमाशीलता. 


→ अन्य घटना 

• कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्मदिन १८९९ पुण्यातील पहिले प्राणीसंग्रहालय 'पेशवे उद्यान' यांचे बाळासाहेब र यांच्या हस्ते उद्घाटन १९५२

 • सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला आलेले असण्याचा अपूर्व योग १९८२. 


→ उपक्रम• तुकारामांच्या जीवनातील घटना गोष्टीरूपात सांगा. • तुकाराम 'अभंग गाथा' नियमित वाचन करा.  तुकारामांच्या सोप्या दृष्टिकोन जोपासला असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ 


→ सामान्यज्ञान

 ऑस्ट्रेलियामध्ये हंस काळ्या रंगाचे असतात. • काही मोजके काजवे इतका प्रकाश देतात की त्यांच्या उजेडात पुस्तक - वाचणे शक्य असते. जगातील काही राष्ट्रीय खेळ


जगातील काही राष्ट्रीय खेळ

अमेरिका-बेसबॉल

 ऑस्ट्रेलिया -क्रिकेट

 इंग्लंड -क्रिकेट व रग्बी फुटबॉल 

 कॅनडा -आइस हॉकी

  जपान-जू-जित्सू


भारत-हॉकी

मलेशिया -सेपक ताक्राव

न्यूझीलंड - रग्बी फुटबॉल

रशिया -बुद्धिबळ

 स्पेन -बैलांशी झुंज




👍150 वाक्य वाचन सराव व्हिडिओ

https://youtu.be/rR0IeS_qjEs

अ चे शब्द*
https://youtu.be/KtgyD7dlxwY
आ चे शब्द*
https://youtu.be/xGNp-v68PaM
इ चे शब्द*
https://youtu.be/cuQFZ4IXtJQ
ई चे शब्द*
https://youtu.be/-xUhcTehWAM
उ चे शब्द*
https://youtu.be/ibuAOh-G0P0
ऊ चे शब्द*
https://youtu.be/hS51WGDb2uo
ए चे शब्द*
https://youtu.be/EmSyKG-4_S4
 अॅ चे शब्द*
https://youtu.be/lu42cTwNAJI
*ऐ चे शब्द*
https://youtu.be/0HZ5XdOyWy4
*ओ चे शब्द*
https://youtu.be/CwK_yxbDo2c
 *ऑ चे शब्द*
https://youtu.be/Riehkj-OUqQ
 *औ चे शब्द*
https://youtu.be/W5OlaWVvIcI

*अं चे शब्द*
https://youtu.be/AVdd7Y8xJbE
 *क चे शब्द*
https://youtu.be/XN8o_Sbi8ys
 *ख चे शब्द*
https://youtu.be/qIUfuxB5Iv4
 *ग चे शब्द*
https://youtu.be/ppstFPkw9EY
 *घ चे शब्द*
https://youtu.be/1Nc18JPdKLw
 *च चे शब्द*
https://youtu.be/7t9LKsORgiw
 *छ चे शब्द*
https://youtu.be/M7-_J7SQJo0
 *ज चे शब्द*
https://youtu.be/G_WOb_VbPJ0
 *झ चे शब्द*
https://youtu.be/ioqUxR4e58M
 *ट चे शब्द*
https://youtu.be/oQGAee2BpCM
 *ठ चे शब्द*
https://youtu.be/PkFk2fr_UnY
*ड चे शब्द*
https://youtu.be/ANgPYUcJc44
 *ढ चे शब्द*
https://youtu.be/whtb2Veqzvo
 *ण चे शब्द*
https://youtu.be/lA23bWS_Kiw
 *त चे शब्द*
https://youtu.be/dFgzhuaWf2Q
 *थ चे शब्द*
https://youtu.be/SwzUU2y_alY
 *द चे शब्द*
https://youtu.be/3aP9VVUucx0
*ध चे शब्द*
https://youtu.be/koysyr3QiwM
 *न चे शब्द*
https://youtu.be/wF9kgOSJaa4
 *प चे शब्द*
https://youtu.be/zRilILlOBVU
 *फ चे शब्द*
https://youtu.be/dRJpjphqB_A
*ब चे शब्द*
https://youtu.be/yNysGYvyqtw
 *भ चे शब्द*
https://youtu.be/FdLZ4RDhK4A
*म चे शब्द*
https://youtu.be/SJUQ0Ryia_A
 *य चे शब्द*
https://youtu.be/dk1FYKtTE28
*र चे शब्द*
https://youtu.be/ZdlOOZOR2uQ
 *ल चे शब्द*
https://youtu.be/b4wTTNfMoPw
 *व चे शब्द*
https://youtu.be/X4hxj4tK5ks
 *श चे शब्द*
https://youtu.be/0Ecc6LP1z7Y
 *ष चे शब्द*
https://youtu.be/96_TiWl6lm8
 *स चे शब्द*
https://youtu.be/96_TiWl6lm8
 *ह चे शब्द*
https://youtu.be/djKs5fVt9FQ
 *ळ चे शब्द*
https://youtu.be/AIqN_erbpDQ
*क्ष चे शब्द*
https://youtu.be/__hHZ53n0_
 *ज्ञ चे शब्द*
https://youtu.be/pz76cHRcfyo

Like, Share and Subscribe my youtube channal
http://youtube.com/c/GodavariTambekar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा