Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ६ मार्च, २०२४

7 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 ७ मार्चप्रार्थना निसर्गा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो....


→ श्लोक

 (दोहे)- मन चंगा तो कठौती मे गंगा । - संत रविदास

 माणसाचे मन पवित्र असेल, त्याला जातीयवाद स्पर्श झाला नसेल तर कुंडातही (कठौती) त्याला गंगाजलाचे पावित्र्य दिसून येईल. गंगास्नानाला मी महत्व देत नाही. मन शुध्द नसेल तर कुठेही समाधान मिळत नाही, पाप धुतले जात नाही.


. → चिंतन-

 माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते.सुसंस्कार करावे लागतात. संस्काराशिवाय माणूस म्हणजे पशूच, खाणीतून निघालेल्या सोन्याला शुध्द करून घ्यावे लागते. हिन्दालाही पैलू पाडावे लागतात. ओल्या मातीलाही आकार द्यावा लागतो. त्याचप्रमाणे संस्कारक्षम वयात साहित्य, क्रिडा, नीतिशिक्षण अशा विविध मार्गांनी | माणुसकी निर्माण करून माणसाची माणूस म्हणून जडणघडण करावी लागते.कथाकथन 

- 'नीचाला आश्रय देऊ नये :' एकदा बोधिसत्व काशीराष्ट्रात एका खेडेगावात जन्मला होता. अध्ययन पूर्ण झाल्यावर त्याने विवाह केला, त्याला एक मुलगा झाला. पण थोड्याच दिवसांनी त्याची बायको मरण पावली. बोधिसत्वाला काही करमेना. मुलगा चालू बोलू लागल्यावर बोधिसत्व त्याला घेऊन हिमालयात जाऊन राहिला. तेथे त्यानं एक सुंदर पर्णकुटी बांधली, तेथे अग्निहोत्राची उपासना करून तो कालक्रमणा करू लागला. एक दिवस हिमालयावर गारांचा खूप पाऊस पडला. त्यामुळे एक वानर थंडीने गारठून गेला. तो कोठेतरी विस्तव सापडतो काय याचा शोध घेऊ लागला. फिरता फिरता तो बोधिसत्वाच्या पर्णकुटीसमोर आला. पर्णकुटीत होमकुंड पेटलेलं पाहून त्याला आनंद झाला. पण दारातच बोधिसत्वाचा मुलगा बसलेला होता. त्यामुळे होमकुंडाजवळ जायला तो घाबरला. मग त्यानं एक युक्ती केली. तिथून जवळच असणाऱ्या पर्णकुटीत एक तपस्वी राहात होता. तो काही दिवसांपूर्वीच मरण पावला होता. त्यामुळे त्याची वल्कलं, कमंडलू वगैरे वस्तू तिथेच पडून होत्या. माकडानं ती वल्कलं अंगावर घातली. हातात कमंडलू घेतला नि बोधिसत्वाच्या पर्णकुटीत दारात येऊन उभा राहिला. त्याला पाहून बोधिसत्वाचा मुलगा धावत जाऊन म्हणाला, 'बाबा, अहो एक बुटके तपस्वी आपल्या दारात आले आहेत. चला, आपण आदरसत्कार करून त्यांना आश्रमात घेऊन येऊ. नाहीतरी तुम्ही फळं आणण्यासाठी अरण्यात गेलात की मी इथे एकटाच असतो. मलाही त्यांची सोबत होईल नि आम्ही दोघेही बरोबर अध्ययन करू.' बोधीसत्व बाहेर येऊन पहातो तो तपस्व्याचा वेष घेतलेला एक माकड ऐटीत उभा असलेला दिसला. तो मुलाला म्हणाला, 'बाळा, हाच तो तापस का?' 'मुलगा म्हणाला, 'होय बाबा, हाच तो तापसकुमार याची नि माझी ओळख झाली तर मला फार आनंद होईल. बोधिसत्व म्हणाला, 'बाबा रे, घाई करू नकोस, हा तापसकुमार नसून तापसाचा वेष घातलेला दृष्ट माकड आहे. ज्ञानी माणसाचं तोंड याच्यासारखं विचित्र कधीच नसतं. याला जर आपण आश्रमात घेतला तर हा सर्व आश्रमाची नासधूस करील. त्याला घालवून देणचं चांगल !' बोधिसत्वांने होमकुंडातलं एक जळकं कोलीत घेऊन त्या माकडावर | फेकलं. तेव्हा मात्र माकड घाबरलं. वल्कलं नि कमंडलू तिथेच टाकून पळून गेलं.


सुविचार -

 • पापाचे समर्थन करणाऱ्याला क्षमा करू नये

 • . • माणसाने आपले कर्म करावे, फळाची लालसा बाळगू नये. निष्काम कर्म हाच खरा धर्म, ● चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनाचा सहवास अधिक शीतल व सुंगधित असतो. • 

 

दिनविशेष 

- हिंदू धर्मसंस्कृतीचे गाढे अभ्यासक व १८७५ मध्ये आर्य समाज या संस्थेची स्थापना करणारे संस्थापकस्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म १८२४.


मूल्ये

कर्तव्यनिष्ठा, स्वामीनिष्ठा, स्वदेशप्रेम, धर्मनिष्ठा, सचोटी..


 → अन्य घटना

  • दादोजी कोंडदेव यांचा स्मृतिदिन - १६४७

  . • मोतीतलावाच्या लढाईत मराठ्यांकडून हैदरचा पराभव १७७१ -

  8 • गोविंद वल्लभपंत स्मृतिदिन १९६९. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म १८२४.उपक्रम

 • विद्यार्थ्यांना मराठेशाहीतील शस्त्रांची माहिती द्या.

   • आदर्श गुरु-शिष्यांची चरित्रे संकलित करा. 


→ समूहगान

 धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं... 

 

→ सामान्यज्ञान

 हैद्राबाद येथील संरक्षणविषयक संशोधन संस्थेने संपूर्ण भारतीय बनावटीचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे पृथ्वी क्षेपणास्त्र बनविले आहे. हे क्षेपणास्त्र ३२० कि.मी. च्या टप्प्यातील लक्ष्य अचूक टिपते.

  • अण्वस्त्रांची ताकद मेगॅटनमध्ये सांगतात. एक मेगॅटन म्हणजे ९,०७,००० मेटीक टन टीएनटी, याचा एकदम स्फोट झाल्यास जी हानी पडेल ती यातून व्यक्त होते. हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब वीस मेगॅटनचा होता.


आंततराष्ट्रीय दिनविशेष

 आंतरराष्ट्रीय महिला दिन : ८ मार्च

 , जागतिक जल दिन : २२ मार्च

 , जागतिक वारसा दिन १८ एप्रिल,

 कामगार दिन : १ मे,

 जागतिक दूरसंचार दिन १७ मे,

  | जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलै,

 जागतिक वन दिन : २१ मार्च, 

 जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल,

  जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन: २३ एप्रिल,

   आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन : १५ मे, 

   हिरोशिमा दिन: ६ ऑगस्ट,

    जागतिक पर्यटन दिन: २७ सप्टेंबर

    , मानव अधिकार दिन : १० डिसेंबर.. (2919) जागतिक ग्राहक अधिकार दिन १५ मार्च,

     जागतिक हवामान दिन: २३ मार्च

     , वसुंधरा दिन: २२ एपिल, 

     जागतिक रेडक्रॉस दिन ८ मे, 

     जागतिक पर्यावरण दिन: ५ जून,

      आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ३ ऑगस्ट,

       जागतिक साक्षरता दिन ८ सप्टेंबर, 

       जागतिक प्राणी कल्याण दिन ४ ऑक्टोबर,

        जागतिक टपाल कचेरी दिन : ९ ऑक्टोबर,

         : संयुक्त राष्ट्र संघटना दिन: २४ ऑक्टोबर,

          मादकद्रव्य वापर विरोध दिन : २६ जून,

           आंतरराष्ट्रीय आय निवासी लोक दिन १८ ऑगस्ट, ज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा