Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

29 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

      29 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 मंगलमय चरणि तुझ्या विनंति हीच देवा...

 

 → श्लोक

  (ग्रामगीता)- वाईट चिंतिता वाईट होतें । जे जे साधू ते साधते । -जिजाऊ मंग का न घ्यावे थोरपण येथे । सद्गुण सारे शिकोनि ? ।। (संत तुकडोजी) बाईटाचे चिंतन केल्याने आपले वाईटच होते. आपण जे जे साधण्याचा प्रयत्न करू ते ते साध्य होते मग सद्गुण शिकून मोठेपणाच का मिळवू नये? 

  

→ चिंतन-

 कोणत्याही गोष्टीला स्वतःच्या मनाची, सद्सद्विवेकबुध्दीची संमती आवश्यक आहे. स्वतःशिवाय कोणतीही व्यक्ती संमती देण्यासाठी मोठी नसते. स्वतःला पटत नसताना केवळ दडपणाखाली, भिडेखातर, स्वतःवर लादून घेतलेली पोष्ट अपयशी ठरते.


+ कथाकथन 

+ - श्रेष्ठ कोण? देव की कर्तृत्व 'श्रेष्ठ कोण? दैव की कर्तृत्व?' असा प्रश्न एकदा अकबर बादशहानं दरबारात विचारला असता, एक बिरबल वगळता बाकी सर्वांनी 'दैव' असं उत्तर दिलं, परंतु बिरबल म्हणाला, "खाविंद, कर्तृत्व हे बऱ्याच वेळा दैवाला बदलू शकत असल्याने, तेच दैवापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. बिरबलाचं हे उत्तर ऐकून बादशहा त्यावेळी गप्प बसला. पण, त्याने या बाबतीत बिरबलाची पक्षा घ्यायचं ठरविलं. बिरबलानं हे उत्तर दिलं, त्याच्या दुसऱ्याच दिवशीची गोष्ट. तो नित्याप्रमाणे यमुनेवर स्नानाला जाण्याचा जवळचा मार्ग मणून एका चिंचोळ्या गल्लीतून जात होता. तो त्या गल्लीच्या मध्याला गेला आणि बादशहाच्या सूचनेनुसार एका माहुतानं एका पिसाळलेल्या हनीला जोरानं अंकुश मारून, त्याच गल्लीच्या समोरच्या बाजूने आत पिटाळले. एक मदोन्मत व पिसाळलेला हत्ती समोरून धावत येत असून आपल्याला तर निसटून जायला मार्गच राहिलेला नाही ही गोष्ट लक्षात येताच, बिरबलाने जवळून जात असलेल्या एका कुत्र्याला पटकन उचलून, त्य तीच्या मस्तकावर फेकून दिलं. हत्तीच्या गंडस्थळावर पडताच, तिथून खाली पडू नये म्हणून त्या कुत्र्यानं त्याच्या गंडस्थळावर आपल्या नख रोवून त्याला घट्ट पकडून ठेवले. त्या नख्या खूप लागताच. तो हत्ती भयभीत होऊन मागे फिरला व धावत चित्कारत आल्या वाटेनं परत राजवाड्या गेला. दुर्देवानं पाठवून दिलेल्या मृत्यूला बिरबलानं केवळ आपली बुध्दी व कर्तृत्व यांच्या जोरावर परत फिरविल्याचं पाहून अकबरानं 'दैवाप कर्तृत्वच श्रेष्ठ.' हे बिरबलाचं म्हणणं मान्य केलं. 


 → सुविचार 

(- • मानवाचे कर्तृत्व हे ईश्वरकृत नसून, ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने, दीर्घदर्शी प्रयत्नाने आणि तीव्र बुध्दिमत्तेने केले सुधारणुकीचे फलित होय. • मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचेही असो, ब्रम्हदेवाचे का असेना 'बुध्दीरेव बलीयसी' हे प्र माना. शास्त्रास एकीकडे ठेवा. आपली बुध्दी चालवा. -लोकहितवादी.


कथाकथन 

- श्रेष्ठ कोण? दैव की कर्तृत्व - 'श्रेष्ठ कोण? देव की कर्तृत्व?' असा प्रश्न एकदा अकबर बादशहानंदभारला असता, एक बिरबल वगळता बाकी सर्वांनी 'देव' असं उत्तर दिलं, परंतु बिरबल म्हणाला, "खाविंद, कर्तृत्व हे बन्याच वेळा बदलू शकत असल्याने, तेच दैवापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. बिरबलाचं हे उत्तर ऐकून बादशहा त्यावेळी गप्प बसला. पण, त्याने या बाबतीत बिरबलाची काँक्षा घ्यायचं ठरविलं. बिरबलानं हे उत्तर दिलं, त्याच्या दुसऱ्याच दिवशीची गोष्ट. तो नित्याप्रमाणे यमुनेवर स्नानाला जाण्याचा जवळचा मार्ग | म्हणून एका चिंचोळ्या गल्लीतून जात होता. तो त्या गल्लीच्या मध्याला गेला आणि बादशहाच्या सूचनेनुसार एका माहुतानं एका पिसाळलेल्या हनीला जोरान अंकुश मारून, त्याच गल्लीच्या समोरच्या बाजूने आत पिटाळले. एक मदोन्मत व पिसाळलेला हत्ती समोरून धावत येत असून, आपल्याला तर निसटून जायला मार्गच राहिलेला नाही ही गोष्ट लक्षात येताच, बिरबलाने जवळून जात असलेल्या एका कुत्र्याला पटकन उचलून त्या हनीच्या मस्तकावर फेकून दिलं. हत्तीच्या गंडस्थळावर पडताच, तिथून खाली पडू नये म्हणून त्या कुत्र्यानं त्याच्या गंडस्थळावर आपल्या नख्या रोवून त्याला घट्ट पकडून ठेवले. त्या नख्या खूप लागताच. तो हत्ती भयभीत होऊन मागे फिरला व धावत चित्कारत आल्या वाटेने परत जाव गेला. दुर्दैवानं पाठवून दिलेल्या मृत्यूला बिरबलानं केवळ आपली बुध्दी व कर्तृत्व यांच्या जोरावर परत फिरविल्याचं पाहून अकबराने 'देवापेक्षा कर्तृत्वच श्रेष्ठ.' हे बिरबलाचं म्हणणं मान्य केलं. - 


सुविचार-

 • मानवाचे कर्तृत्व हे ईश्वरकृत नसून, ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने, दीर्घदर्शी प्रयत्नाने आणि तीव्र बुध्दिमत्तेने केलेल्या सुधारणुकीचे फलित होय.

  • मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचेही असो, ब्रम्हदेवाचे का असेना 'बुध्दीरेव बलीयसी' हे प्रमाण माना. शास्त्रास एकीकडे ठेवा. आपली बुध्दी चालवा. -लोकहितवादी..



दिनविशेष -

 • राणी क्षेत्रमा (इ.स.१६०१-१६९६) वेत्रमा ही केजी वा पुरातन राज्याची राणी वि असलेल्या शत्रूंशी तिने ध्येयाने लढा दिला व अनेक संकटांपासून आपल्या प्रजेचे रक्षण केले. औरंगजेबाचे लक्ष दक्षिण काबीज करण्याकडे लागले. त्याचे बलाढ्य व प्रचंड सैन्य कर्नाटकातील लहानशा केळदी राज्यावर चालून आले. परंतु राणीने धीर सोडला नाही किंवा ती भ्यालीही नाही. टी वीरांगनेप्रमाणे लढली. 


मूल्ये

 • शौर्य, धैर्य, स्वदेशप्रेम.


→ अन्य घटना -

 • स्टेरिओस्कोपिक एक्स-रे फोटोग्राफी जनक थॉम्प्सन यांचा जन्म. १८५३. राष्ट्रीय नौकादिन

  • क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली. १८५७ 

  • पणजी येथे तिसऱ्या अंटार्क्टिका मोहिमेवरून भारताचे पथक परतले. १९८४. - 

  

→ उपक्रम 

• राणी चेत्रमाचा इतिहास सांगणे.

 • अंटार्क्टिका मोहिमेची माहिती सांगावी • शूर स्त्रियांच्या चरित्रातील महत्वाच्या घटना विद्यार्थ्यांना सांगणे. 

 

→ समूहगान 

• पेड़ों को काटते हो, दो पेड लगाके देखो ना... 


→ सामान्यज्ञान 

नैसर्गिक साधनसंपत्तीत माती ही मूलभूत साधनसंपत्ती आहे. मासे वगळता मानवाला बहुतेक अत्र प्रत्यक्षाप्रत्यक्षरित्या मातीतूनच उपलब्ध होते. संपूर्ण सजीव सृष्टी ही मातीवरच अवलंबून असते. माती निर्माण व्हायला कोट्यावधी वर्षे लागतात... •

 आपल्या शरीरातील काही ग्रंथींना त्यात तयार होणारा द्रव वाहून नेण्यासाठी नलिकाच नसतात. अशा ग्रंथींना 'नलिकाविरहित ग्रंथी' असे भगतात. त्यात निर्माण होणाऱ्या द्रावांना 'हार्मोन्स' असे म्हणतात. हे द्राव प्रथम रक्तात मिसळतात. त्यानंतर शरीरभर पसरतात आणि त्यांचे कार्य सुरु होते. या ग्रंथी शरीरभर विखुरल्या आहेत. त्यांच्या रचना भित्र असून त्यांच्यात निर्माण होणारे हार्मोन्स सुध्दा वेगवेगळे आहेत.




■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

**************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा