Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३१ मार्च, २०२४

1 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

1 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ





प्रार्थना गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे...


→ श्लोक

 - क्षणश: कणश्चैव विद्यामर्थ च साधयेत् । क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम् ।। क्षणाक्षणाने विद्या व कणाकणाने पैसा मिळवावा. क्षण (वेळ) फुकट घालविल्यास विद्या कशी मिळणार? कणाचा (अल्प धनाचा त्याग केला (पुष्कळ) धन कसे 

 

→ चिंतन

- पुन्हा पुन्हा वाचणे, वाचलेले स्मरणात ठेवणे व स्मरणात ठेवलेले पुन्हा कागदावर लिहिता येणे याला खरा अभ्यास म्हणतात, पु नुसती वाचून काम भागत नाही. ती पुन्हा पुन्हा वाचून स्मरणात ठेवून त्यातील उपयुक्त भाग कागदावर लिहिता येणे महत्त्वाचे व आवश्यक आहे 


→ कथाकथन 

- 'भारतीय विमानदल दिन' भारतीय विमान दलाची स्थापना इंग्रज काळात १ एप्रिल १९३३ रोजी कराची येथेनाही ती पुन्हा पुन्हा स्मरणात ठेवून त्यातील उपयुक्त भाग कागदावर लिहिता येणे महत्वाचे व आवश्यक आहे • भारतीय विमानदल दिन' भारतीय विमान दलाची स्थापना इंग्रज काळात १ एप्रिल १९३३ रोजी करावी येथे फक्त भारतीय होते. रॉयल एअर फोर्स (शाही विमानदल) असे नाव या विमान दलाचे होते. १५ ऑगस्ट १९४० भारत स्वतंत्र झाल्या त्यातील रॉयल (शाही) हा इंग्रजांच्या निशाणीचा शब्द गाळून टाकून 'इंडियन एअर फोर्स (भारतीय विमा असे मालाला देण्यात आले. सध्या आपल्या या विमानदलाचे भौगोलिकदृष्ट्या पाच विभाग आहेत. १. पश्चिम हवाई कमांड, २. म ३. मध्य हवाई कमांड, ४. पूर्व हवाई कमांड, ५. उत्तर हवाई कमांड. हैदराबाद, बंगलोर, बिदर, हकीमपेट, सिंकदराबाद, आदी ठिकाणी हवाई प्रशिक्षण केंद्रे आहेत. विमान निर्मिती व विमान दुरुस्तीचे १२ कारखाने आहेत. विमान दलाच्या ४५ स्क्वाइन्स त्यात लढाऊ व बॉम्बफेकी विमानांची मोठी संख्या आहे. हंटर, नॅट, मिग २१, मिग २३, मिग २७, मिग २९, जग्वार, मिराज २००० आदी प्रका विमाने आपल्या विमानदलात असून इतरही अनेक प्रकारची विमाने आपले वैमानिक हाताळीत आहेत. मिग-सी, एचएस ७४८ चेतक आणि ही पूर्णत: भारतीय बनावटीची विमाने आपल्या विमानदलात आहेत. भारत-पाक युद्धात आपल्या विमानदलाने फार मोठे यश संपादन केले असून आपल्या शक्तीची व युद्ध कौशल्याची ओळख साऱ्या जगाल करून दिलेली आहे. महापूर, चक्रीवादळ वगैरे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी आपल्या विमानदलाचे फार मोठे साहाय्य आपद्ग्रस्तांना होत असते र एप्रिल १९८२ रोजी आपल्या विमानदलाने सुवर्णमहोत्सव साजरा केला होता. दर वर्षी १ एप्रिल रोजी विमानदलाचा वाढदिवस दिल्ली येथे साका केला जातो. त्या वेळी आपले वैमानिक निरनिराळ्या प्रकारच्या विमानांच्या रोमांचकारी कसरती करून दाखवितात. त्या पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक जमा होतात. या दिवशी विद्यार्थ्यांना आपल्या विमानदलाचा परिचय करून दिल्यास त्यांनाही तो प्रेरणादायक ठरेल, यात शंका नाही. 

→ सुविचार

 • मनुष्य जन्माला आला तो त्याच्याकरिता इतरांनी कष्टावे यासाठी नव्हे, तर सपने इतरांसाठी कष्टावे म्हणून.


→दिनविशेष -

 • श्रीधर महादेव जोशी स्मृतिदिन १९८९ (जन्म १२ नोव्हेंबर १९०४) - एक निष्ठावंत समाजवादी नेते व कामगार या नावाने सर्वपरिचित. विद्यार्थीदशेतच म. गांधीच्या चळवळीकडे ते आकवंत झाले. हरिजनांना पुण्यातील पर्वतीवरील मंदिरात मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. (१९२९) ते मिठाच्या सत्याग्रहात सामील झाले. मार्क्सच्या विचारांच्या अभ्यासानंतर ते समाजवादी सहकान्याच्या मदतीने त्यांनी काँग्रेस सोशलिस्ट पक्ष स्थापन केला. 'छोडो भारत' आंदोलनाच्या वेळी (१९४२) ते भूमिगत झाले. १९४३ त्यांना अटक झाली. १९४६ मध्ये ते मुक्त झाले. राष्ट्र सेवा दलाच्या संस्थापकांपैकी ते एक होत. १९४८ मध्ये ते महाराष्ट्राच्या समाजवादी पा अध्यक्ष झाले. साने गुरुजी सेवा पथकात त्यांनी भाग घेतला. १९५३ साली ते मुंबई विधानसभेवर निवडून गेले. स्वातंत्र्योत्तर काळात कामगाराच संघटना व त्यांचे प्रश्न यात त्यांनी प्रामुख्याने लक्ष घातले, गोवा विमोचन समिती व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यात ते आघाडीवर होते. १९६३ मा ते प्रका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. पुढे संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली. १९६७ साली लोकसभेवर ते निवडू गेले. पुणे महानगरपालिकेचे ते अनेक वर्षे सदस्य होते. विविध नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केले. ऊर्मी, आस्पेक्टस ऑफ सोशॅलिस्ट पॉलिसी, मी एसेम आदी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. एक साधे, प्रामाणिक व तळमळीचे कार्यकर्ते म्हणून तसेच अन्यायाविरुद्ध परखडपणे लढा देणारे अग्रणी म्हणून ते सर्व लोकांच्या आदरास प्राप्त झाले १ एप्रिल १९८९ रोजी त्यांची जीवनज्योत अनंतात विलीन झाली.


 मूल्ये 

 • देशप्रेम, समाजसेवा 


→ अन्य घटना 

• संशोधक विल्यम हार्वे यांचा जन्म. १५७८ शहाजी उर्फ शिवाजीराजे (सातारा) स्मृतीदिन १८४८

 • पुणे येथे वेधशाळा सुरू. १९२८. 

 • रिझर्व बँकेची स्थापना - १९३५ 

 • भारतीय विमानदलाची स्थापना - १९३३ 

 • भारतात दशमान नाण्याची सुरुवात. १९०

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार. - १९९० 

  • वसंत मून स्मृती दिवस - २००२. 


→ उपक्रम 

• एस.एम.जोशी यांच्या जीवनातील त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडविणारे प्रसंग कथन करावे. 


→ समूहगान 

• बहु असोत सुंदर संपन्न की महा....


सामान्यज्ञान 

- • कृषीतर विद्यापीठे : (१) मुंबई विद्यापीठ (१८५७) (२) नागपूर विद्यापीठ (१९२३) (३) पुणे विद्यापीठ (१९४८) (४) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ (महिलांसाठी) (१९१६) (मुंबई) (५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाह विद्यापीठ (१९५८) (औरंगाबाद) (६) शिवाजी विद्यापीठ (१९६३)(कोल्हापूर) (७) अमरावती विद्यापीठ (१९८३) (८) उत्तर महाराष्ट्र विद्यपीठ | (१९९०) (जळगाव) (९) डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (१९९०) (लोणारे, महाडजवळ ) (१०) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) (नांदेड) (११) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) (नाशिक) (१२) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) (नाशिक) (१३) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (१९२१) (पुणे) (१४) भारती विद्यापीठ (समकक्ष) (पुणे) (१५) महिला मुक्त विद्यापीठ (मुंबई) (१६) श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ (१९९६) (पुणे) (१७) महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) (नागपूर).

.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा