Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ११ मार्च, २०२४

12 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 १२ मार्च


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

→ प्रार्थना 

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे....


 → श्लोक

  (दोहे) हे) - पंच दोष तजि जो रहई, संत चरण लव लीन । 'रविदास' ते ही नर जानई, ऊंचह अरू कुलीन।। : तीच व्यक्ती कुलीन म्हणता येईल जी 'मी' पणाला नष्ट करून विकारांवर लक्ष ठेवते तसेच उच्च संतांच्या सहवासात राहते, कोणत्याही मनुष्याची श्रेष्ठता पंच विकारांचा त्याग केल्यानंतरच मान्य केली जाऊ शकते. अर्थात जो मनुष्य सदाचारी आहे. पंच विकारांपासून दूर आहे, केवळ त्यालाच श्रेष्ठ समजण्यात येईल. - रविदास दर्शन - 

  

→ चिंतन

 यश निश्चये करून, तू हे पाऊल चढ़ते ठेव, मग शिखराला पोहचून तू दिसशील जगाला देव.. यश मिळविण्यासाठी आपल्याजवळ दृढनिश्चय असावा. कोणतेही काम करताना निर्धार अभंग राहिला पाहिजे. 'शेंडी तुटो की पारंबी तुटो' या म्हणीप्रमाणे निश्चय कायम राहिला तर तो आपल्याला यशाची खात्री देतो. पावले ध्येयाच्या दिशेने चालू लागतात. निर्धारपूर्वक केलेला संकल्प सिध्दीस जातो. म्हणून शर्थीचे प्रयत्न केल्यास यशाचे शिखर सहज गाठता येते→ कथाकथन

'सफलतेचा मंत्र ज्या व्यक्तीला चांगल्या सवयी असतात त्या व्यक्तीचे जीवन सफल बनते. त्यालाच सुखशांती व समाधान | चांगल्या सवयीच्या व्यक्तीचे चारित्र्य श्रेष्ठ असते. ती व्यक्ती सुशील स्वभावाचा आरसा असते. त्यासाठी चांगल्या सवयीचे बीजारोपण बाल्यावस्थेत केल

 || कारण लहानपणची सवय कायम टिकते. बालपणीच वाईट सवयीच्या आहारी गेल्यास यश मिळत नाही. माणसाचे मन चंचल असते. चांगल्या गोष्टीपेक्षा | मनाला चटकन भुरळ पाडतात. म्हणूनच बहिणाबाई म्हणतात, 'मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाल हाकाल फिर येती पिकावर चांगल्या सव येणे गरजेचे असते. चांगल्या सवयीमुळे माणसाची यावी होत असते. चांगल्या सवयी जडवून घेण्यासाठ लागते. चांगले आहे. त्यापासून स्वत:ला दर ठेवता आले पाहिजे | ठेवले पाहिजे. जगात वावरताना योग्य-अयोग्य ओळखायला शिकले पाहिजे. व्यवहार व कौशल्याची जोड घालून काम करणे इष्ट असते. कामापेक्षा जास्त बडबड | टाळणे हितावह असते. मनात समृध्दीचा विचार ठेवा पण त्याबरोबर आपले सुप्त सामर्थ्य ओळखा. आपल्या ध्येयाकडे व यशोमंदिराकडे घोडदौड करताना संक न डगमगता सामना करण्याचे शिका. संकटावर मात करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. मनात निराशेला जागा देऊ नका. इच्छाशक्ती प्रबळ बनवली पाहिजे. आळस मोहनबह मागनि कार्य करा. यशासाठी आत्मविश्वास ठेवा. आत्मविश्वासामुळे अंतरंगातील दारे उघडी होतात, नशिबावर विश्वास ठेवणे म्हणजे भेकडपणाचे लक्षण हो | ठरलेल्या माणसाचे अनुकरण करा. यश मिळावे यासाठी इच्छारूपी बियाणाला परिश्रमाचे खतपाणी घाला. मनात सदैव शुभ विचारांचे चिंतन करा. शुभ विचारांना श्रम याची जोड द्या. श्रमाशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही. यशासाठी केवळ परमेश्वरावर विसंबून राहणे अयोग्य आहे. आपले हातच आपणाला यश मिळवून देत अ म्हणूनच ग. दि. माडगुळकर म्हणतात, 'नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी । आपले मन नेहमी प्रसन्न ठेवा, कारण मनाचा शरीरावर प्रभाव पडतो. हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात. 'मन करारे प्रसन्न, सर्व सिध्दीचे कारण, कोण | गोष्टीमुळे रागावू नका. मनाच्या रोगामुळे शरीर रोगी होते. मनात चांगल्या गोष्टींचे मनन करा. कारण विचारामुळेच तुमचे भाग्य घडते. श्रम व चिकाटी यातून यश मिळते. व सत्य बोलण्याची सवय लावा. व्यसनापासून स्वतःला दूर ठेवा. स्वतःच्या गुणदोषांची यादी करा. तोंडाने उत्साहाचे व धैर्याचेच शब्द उच्चारा संभाषणात गोड बोल | प्रामाणिकपणा जपा. कोणाला दिलेला शब्द काटोकोरपणे पाळा. दुसऱ्याच्या वेळेची किंमत ओळखा. इतरांन मदत करा व स्वतःला सहकार्य मिळवा. इतरांबद्दल तिरस्का | बाळगू नका. त्यामुळे आपल्याला कालांतराने दुःख होऊ शकते. सुखी समाधानी जीवनासाठी इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. आपली पात्रता आपण ओळ पाहिजे. ईश्वर सर्वांना समान संधी देत असतो. त्यासंधीचा योग्य फायदा घ्या. यश हे तुमचेच असते. पण ताबडतोब अपेक्षा करू नका. यश मिळायला बर वेळ लागत | हाती घेतलेले कार्य सोडू नका. यशासाठी हातावर विश्वास व ईश्वरावर श्रध्दा ठेवली पाहिजे.' मानव जन्म हा दुर्मिळ आहे. तो अनेक जन्ममरणाच्या फेऱ्यानंतर मिळाल असतो असे आपण नेहमीच ऐकत असतो. मग अशा दुर्मिळ जीवनात कसे जगायचे ते तुम्ही ठरवा. जीवन सर्वच जगत असतात. पण जगण्याला अर्थ असला पाहिजे मानसन्मानाने जगायचे असेल तर चांगल्या सवयी लावून घेण्याचा प्रयत्न आज आणि आतापासूनच सुरू करा. जगण्याचा अर्थ तुम्हाला आपोआप कळू लागेल. 

 

→ सुविचार

 • सुधारणा ही मनातून झाली पाहिजे. नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही.

  • समाजसुधारणा होण्यासाठी समाजप्रबोधनातून समाजमत परिवर्तन होणे अत्यावश्यक आहे.

 


दिनविशेष - 

• यशवंतराव चव्हाण जन्मदिन - १९१४: यशंवतराव गरीब घराण्यात देवराष्ट्रे या सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावात जन्मले • समाजसुधारणा होण्यासाठी समाजप्रबोधनातून समाजमत परिवर्तन होणे अत्यावश्यक आहे. • | चव्हाण हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते. वाणी, लेखणी आणि विचारसरणी या तिन्हीमुळे जनमानसात त्यांनी स्वतःचे एक स्वतंत्र स्व | केले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या राजकीय जीवनावर यशवंतरावांचा लक्षणीय प्रभाव दिसून येतो. धडाडी, दीर्घोद्योग, संतुलीत वृत्ती, | आणि अलौकिक कर्तृत्व यांच्यामुळे त्यांनी राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात आपले स्वतंत्र असे स्थान निर्माण केले. १ मे १९६० रोजी मुंबईसह स्व राज्य स्थापन झाले. त्यांचे पहिले मुख्यमंत्रीपद यशवंतरावांनी भूषविले. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रात अनेक नव्या उपक्रमांना चालना या उपक्रमात सहकारी साखर कारखान्यांबरोबरच, जिल्हा परिषदा, भाषा संचलनालय, साहित्य संस्कृती मंडळ अशा उपक्रमाचा समावेश आहे. ते उत्तम वक्ते व लेखन परचक्र आल्यावर देशाच्या संरक्षणमंत्रीपदाची धुरा त्यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली, 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला.' हे वचन १९६२ च्या भारत-चीन हा त्यांनी सार्थ ठरविले. महाराष्ट्रात सहकारी चळवळ रुजविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी यशवंतरावांचे निधन झाले. 


→ मूल्ये -

 • राष्ट्रप्रेम, कर्तव्यदक्षता, साहित्यप्रेम, निर्भयता. 

 

→ अन्य घटना 

• मानापमान नाटकाचा पहिला प्रयोग - १९११० गोवा स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन १९११ 

• मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी ७२ सत्याग्रहींसह म. गांधींची साबरमती-दांडी यात्रा सुरू. १९३० 

• मुंबईमध्ये स्टॉक - एक्सचेंज, पेट्रोल वगैरे महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी बाँबस्फोट झाल्यामुळे शेकडो निरपराध लोक जखमी - १९९३. 


→ उपक्रम - 

• यशवंतराव मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकीर्दीमधील महत्वाच्या योजनांची माहिती मिळवून मुलांना सांगा. - 


→ समूहगीत

देश हमारा, निर्मल सुंदर उज्ज्वल गगन का तारा... 


→ सामान्यज्ञान

 मुंगूस आणि सापाचे वैर प्रसिध्द आहे. या लढाईत मुंगुसाला जर सापाचा दंश झाला तर मुंगूस जंगलातून एक कंद वनस उकरून खातो आणि त्याचे विष नंतर उतरते. या वनस्पतीचे नाव सर्पगंधा.

.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा