Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १० मार्च, २०२४

11 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 11 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ




👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

 

प्रार्थना -

 ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम... 


 

→ श्लोक

 (दोहे) - सत्त संतोष अरू सदाचार, जीवन को आधार 'रविदास' भरे नर देवते, जिन तिआगे पंच विकार ।। । जय-सावित्री नेहमी खरे बोलणे, आयुष्यात उपलब्ध साधनात संतुष्ट राहणे आणि सदाचाराचे जीवन जगणे, हे सर्व जीवनाचे खरे आधार आहेत. जर - रविदास दर्शन 

 जीवनात प्रामाणिकपणा, संतोष आणि सदाचार नसेल तर जीवन बनूच शकत नाही. जे मनुष्य सत्य, संतोष व सदाचाराने वागतो आणि काम, क्रोध, लोभ, मोह व अहंकार ह्या पाच मानसिक विकारांना सोडून पुरूष न राहता (देव या शब्दाचा अर्थ सभ्य आणि सुयोग्य पुरूष असा आहे) देव बनतात. अशा पुरूषांचे जीवन नेहमी सुखी, समृध्द व आनंदी होते. 

 


→ चिंतन -

 शिक्षणाचे उद्दिष्ट्य संवादी व्यक्तित्वाचे निर्भय स्त्रीपुरूष निर्माण करणे हे आहे. अशी माणसे जेथे आहेत तेथेच चिरशांती नांदू शकेल. आत्मज्ञानातून निर्भयता निर्माण होते. निर्भय व्यक्ती कुठल्याही अर्थाने आक्रमक नसते. कुठल्याही वैचारिक साच्याची वा संघटनेची गुलाम नसते. - जे. कृष्णमूर्ती..



कथाकथन 

- - जे. कृष्णमूर्ती. 'सत्पुरूषाच्या संगतीचा परिणाम :' फार वर्षापूर्वीची गोष्ट. एक श्रध्दावान साधू वाराणसीत रहात होता. एकदा तो काही कामानितित्त जहाजातून परदेशी जाण्यास निघाला. त्याच जहाजातून एक न्हावीही प्रवासाला जाणार होता. त्याच्या बायकोची साधूवर श्रध्दा होती. ती साधूला म्हणाली, 'महाराज, माझा पतीही आपल्याच जहाजातून येत आहे. आपण त्याची काळजी घ्या. साधूनं तिला तिच्या नवऱ्याला मदत करण्याचं वचन दिलं. दोघे जहाजावर चढले. पुढे सात दिवस त्यांचा प्रवास व्यवस्थित झाला. पण आठव्या दिवशी भयंकर वादळ होऊन जहाजाचे तुकडे झाले. साधू आणि न्हावी एका फळीच्या आधारानं तरंगत एका लहानशा बेटाच्या किनाऱ्याला लागले. त्या बेटावर जास्त फळंमुळं नव्हती. साधू जी थोडी फार कंदमुळे, फळं मिळत होती, ती खाऊन आपला निर्वाह करत होता. पण न्हाव्याला असल्या जेवणाचा कंटाळा आला. तो पक्षांना मारून खाऊ लागला. त्यानं साधूलाही पक्षी मारून खाण्याचा आग्रह केला. पण साधूनं कधीही ते खाल्ले नाही. फळे मिळत आहेत तेवढी भरपूर आहेत असा विचार करून तो ते खाणं नाकारत होता.' साधूची अचल श्रध्दा पाहून त्या बेटावर रहाणारा एक नागराज प्रसन्न झाला. तो त्याच्या जवळ येऊन म्हणाला, 'हे साधू तुझी श्रध्दा पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुझ्यासाठी मी माझ्या देहाची होडी करून तुला ज्या स्थळी जावयाचे आहे त्या स्थळी सोडतो. साधूनं नागराजाला नमस्कार केला. त्याने तयार केलेल्या होडीत बसून तो न्हाव्याला म्हणाला, बाबारे, तुला जर माझ्या सोबत यावयाचे असेल तर चलं. तेंव्हा नागराज म्हणाला, या न्हाव्याला होडीत घेता येणार नाही. तो खूप दुष्ट आहे. त्याच्यासाठी ही होडी मी निर्माण केली नाही. साधूनं नागराजाला विनंती केली की, तो जरी पापी असला तरी तो माझ्यासोबत आलेला आहे. मी जे पुण्य केलं असेल त्याचा वाटा मी त्याला देत आहे. न्हावी साधूला नमस्कार करून म्हणाला. 'तुझ्या या देणगीचं मी अभिनंदन करतो. आजपर्यंत मी पापच केलं आहे. पण तुझा सहवास हेच पुण्य माझ्या पदरी आहे. आणि तुझ्या पुण्याचा वाटेकरी करून तू मला फार ऋणी केल आहेस. मग नागराजानं न्हाव्याला होडीत येऊ दिलं. तेंव्हा समुद्राचे रक्षण करणाऱ्या देवतेने होडी चालवण्याचे काम आपल्या हाती घेतले. त्या बेटावर सापडणारी अमूल्य रत्ने साधूने त्यांच्याबरोबर आणली होती. त्या दोघांना इच्छित स्थळी आणून सोडल्यावर देवता म्हणाली, “श्रध्दा आणि शील या गुणाचं हे फळ आहे. या साधूच्या अंगी हे गुण असल्यानं नागराज स्वतः त्याच्यासाठी होडी घेऊन पोहोचवायला आला. माणसानं अशा सत्पुरूषाचाच सहवास करावा. या न्हाव्याने जर साधूची संगत धरली नसती तर समुद्रातच त्याचा नाश झाला असता ! असं बोलून देवता आणि नागराज दोघेही निघून गेले. साधूनं आपण आणलेल्या धनाचे दोन भाग करून त्यातला एक न्हाव्याला दिला. साधूच्या संगतीमुळे मिळालेली संपत्ती न्हाव्याला जन्मभर पुरली.



 सुविचार 

 • एक चांगला विचार अनेक वाईट गोष्टींना नाहीसा करतो. 


→ दिनविशेष

 • पहिली भारतीय महिला आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर पदवी प्राप्त १८८६ उच्चशिक्षण आणि परकीय विद्यापीठातून पदवी घेणाऱ्या आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला होत. अत्यंत बाळबोध व सनातनी घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचा विवाह मोपाळराव जोशी या विक्षिप्त गृहस्थांबरोबर झाला. तथापि गोपाळरावांनी शिक्षण घेण्यात दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्या उच्चशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाऊ शकल्या. आनंदीबाई करारी आणि दृढनिश्चयी होत्या. शिक्षणाची त्यांना विलक्षण ओढ होती. आपला धर्म, चालीरीती, संस्कृती, परंपरा सांभाळून परदेशी शिक्षण घेताना त्यांना अनेक दिव्यांना सामोरे जावे लागले. जिद्दीने, शर्थीने आल्या प्रसंगांना तोंड देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठात ११ मार्च १८८६ रोजी झालेल्या पदवीदान समारंभात एम.डी. ही उच्च पदवी मिळवून त्यांनी सर्वांची प्रशंसा मिळविली. उच्च शिक्षण घेऊन त्या भारतात परतल्या. पण, क्षयाचा विकार बळावून कर्तृत्ववान आनंदीबाईनी २७ फेब्रुवारी १८८७ रोजी या जगाचा निरोप घेतला. त्या भारतात परतताना त्यांच्याबरोबर अमेरिकेतील त्यांच्या परदेशी मैत्रिणींनी तुकड्यातुकड्यांची गोधडी शिवून मैत्रीची | आठवण पांघरण्यासाठी म्हणून दिली. ही गोधडी पुण्यातील केळकर संग्रहालयाच्या व्यक्तिगत संग्रहात आहे

 

. → मूल्ये 

• समता, आदरभाव, स्वाधीनता, शुचिता, निर्भयता. -


 → अन्य घटना

  • छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन १६८९

   • खडर्याच्या लढाईत मराठ्यांचा निजामावर नेत्रदीपक विजय १७९५ - - 

   • पेनिसिलीनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ अॅलेक्झांडर फ्लोमिंगो यांचे निधन १९५५ अमेरिकेच्या नासा केंद्राने पायोनियर ५ उपग्रह शुक्र - ग्रहाच्या दिशेने सोडला १९६० अतिशय हुशार व धाडसी वृत्तीची महिला गोल्डा मायर यांची इस्त्राईल पंतप्रधानपदावर नियुक्ती १९६९. -

   

 → उपक्रम

  • आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवा.

   • मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे अनुभव संकलित करा. 

   


→ समूहगान

 - • मंगल देशा ! पवित्र देशा !! महाराष्ट्र देशा !!!

 

→ सामान्यज्ञान

  • जगात आज सुमारे सातशे ज्वालामुखी अस्तित्वात आहेत. त्यांचे मधून मधून धुमसणे, क्वचित आग ओतणे, क्वचित महाप्रचंड विध्वंस घडविणे हे नेहमीच चालू असते.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा