Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

12 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 १२ फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 - या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे.... बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।


 श्लोक

  अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ।। श्रीमद्भगवद्गीत ज्याने स्वतःच स्वतःला जिंकले तो स्वतःचा मित्र होय, पण ज्याचा स्वतःवर ताबा नाही, तो स्वतःच स्वतःचा शत्रू होतो. • 

  

चिंतन

- उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी. उद्यम म्हणजे उद्योग, साहस म्हणजे धाडसीपणा, धैर्य म्हणजे धीर, बुध्दी, शक्ती व पराक्रम हे सहा गुण ज्या व्यक्तींच्या अथवा समाजाच्या ठिकाणी असतात, त्यांना देवदेखील मदत करीत असतात. अशा ठिकाणी लक्ष्मी वास करते; ऐश्वर्य, भरभराट असते. 

कथाकथन 

- अब्राहम लिंकन - अमेरिकच्या या १६ व्या राष्ट्राध्यक्षाचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजीधातील एका गरीब कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांनी थॉमस यांनी चर्मकाराचा व्यवसाय केला. त्याच्या आईचे नाव नान्सी होते. १८२८ मध्ये अनुभव तरुण अब्राहम आपला चुलत भाऊ याच्याबरोबर नोकरी शोधण्यासाठी न्यू ऑर्लिनाला गेला. न्यू ऑर्टिन्स येथे त्याने गुलामांची होणारी विक्री बघितली. गुलामगिरीचा प्रतिकार करण्याचे त्याने मनाशी ठरविले. तेथून तो परत आला. १८३० मध्ये हे कुटुंब इलिनॉसमध्ये राहण्यास बेली अब्राहम २१ वर्षाचा होता. त्याने पुनः शिक्षणाला सुरुवात केली. वकिलाची डिग्री मिळवली आणि वकिली सुरू केली. १८४७ पट या काळात अब्राहम अमेरिकन काँग्रेसचा प्रतिनिधी होता. १८६१ मध्ये अब्राहम राष्ट्रपतिपदासाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून आला अब्राहम जेव्हा राष्ट्राध्यक्ष बनले त्या वेळेस पूर्ण देश गुलामांच्या प्रश्नांवर दोन भागांमध्ये विभागला होता. काही गुलामगिरी विरोधी तर काही गुलामगिरी समर्थक असा वाद चालू होता. दक्षिणेकडील राज्ये ही कृषियुक्त होती. त्यांना शेतीवर काम करण्यासाठी गुलामांची गरज होती; म्हणून ही राज्ये | गुलामगिरीचे समर्थक होते. उत्तरेतील राज्यात औद्योगिकीकरण झालेले होते; त्यामुळे ते गुलामगिरीच्या विरुद्ध होते. दक्षिणेकडील व उत्तरेकडील राज्ये विभागीय संघर्ष, संस्कृतीची भित्रता, अर्थरचनेती भित्रता प्रमुख्याने या संस्थेशी संबंधित असलेल्या राजकीय घटना काही इतर १८६० ची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक इत्यादी सर्व गोष्टींचा शेवट देवी सुद्धा झाला. कथाकथन १२ एप्रिल १८६१ रोजी यादवी युद्ध सुरू झाले आणि १६ एप्रिल १८६५ रोजी संपले. युद्धाबरोबरच अब्राहमची कीर्तीही वाढली. यादवी युद्ध म्हणजे 'अब्राहमच्या यशाची एक गाथाच' होय. युद्धकाळात १ जानेवारी १८६३ रोजी लिंकनने गुलामांच्या 'मुक्ततेचा जाहीरनामा' प्रसिद्ध केला होता. संघराज्याच्या ऐक्यासाठी व गुलामांच्या मुक्ततेसाठी हे युद्ध होय, असा नवा अर्थ या यादवी युद्धास प्राप्त झाला. उत्तर सैन्य जस जसे दक्षिणेकडील अधिक प्रदेश ताब्यात घेऊ लागले तसतसे अधिक गुलाम मुक्त होऊ लागले. युद्धकाळातच १,८६,००० गुलाम मुक्त झाले होते. युद्धाच्या शेवटी ४० लाख मांची मुक्तता झाली होती. अतिशय योग्य अर्थाने यादवी युद्धास 'गुलामांच्या मुक्ततेचे' (War of Liberation) म्हणता येईल. किंवा 'दुसरी अमेरिकन राज्यक्रांतीच' (Second American Revolution) होय. अँलान नेव्हिस या सुप्रसिद्ध इतिहासकाराच्या मते, राजकारणातील मुत्सद्देगिरीसाठी बुद्धिवैभव, नीतिधैर्य, काळाची गरज ओळखण्याची स्वाभाविक प्रवृत्ती, जनमत जाणून घेऊन ते स्वसामर्थ्याने बदलण्यासाठी आवश्यक असणारी शालीन वृत्ती या पाच गुणांची आवश्यकता असते. लिंकनच्या ठिकाणी हे पाचही गुण अस्तित्वात होते. युद्धाची सर्व सूत्रे लिंकनच्या हातात होती. युद्धधोरण म्हणजे लिंकनच्या राजनीतीचा कळस होता. त्याने अर्थव्यवस्था सुधारली, कायम सैन्यात वाढ केली. दक्षिणेची नाकेबंदी केली, सक्तीच्या सैन्यभरतीचा कायदा केला. राष्ट्रीय बँक योजना, महसूल व्यवस्था व कर योजना निर्माण केल्या. त्यामुळे या बंडास सर्वकष युद्धाचे स्वरूप आले. राज्यातून फुटून निघालेल्या शत्रुपक्षापेक्षाही जास्तच उत्साह व क्रांतिकारी धोरण लिंकनने आखले व ते कार्यवाहीत आणले. लिंकनने 'मुक्ततेचा जाहीरनामा (Proclamation of Emancipation) प्रसिद्ध केला व मानवतेच्या इतिहासात आपले नाव अजरामर करून ठेवले. सामान्य माणसाच्या दुःखाची त्याला पूर्ण जाणीव होती. पश्चिमेकडे तर तो 'लोकांचा देव' (Flok God) म्हणून प्रसिद्ध आहे. १४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टनमधील फोर्डच्या नाट्यगृहात दक्षिणेतील जॉन विलिस बूथ या माथेफिरूने लिंकनच्या डोक्यावर गोळ्या झाडल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लिंकनचे प्राणोत्क्रमण झाले. एका महान जीवनाची इतिश्री झाली व यादवी युद्ध संपलेच, यादवी युद्धाने लिंकनला अमर केले; किंबहुना लोकशाहीसाठी व राष्ट्रीय ऐक्यासाठीच या हुतात्म्याने प्राणार्पण केले होते. लिंकनच्या मृत्यूने दक्षिणेकडील जनतेलाही धक्का बसला. 


सुविचार -

• माणसाची योग्यता त्याच्या जातीवर, वयावर, हाताच्या हस्तरेषेवर अवलंबून नसून त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. 

दिनविशेष 

• महादजी शिंदे स्मृतिदिन १७९४ अत्यंत शूर, मुत्सद्दी, लढवय्या सेनापती म्हणून महादजी शिंदे यांचे स्थान

आहे. हे राणोजी शिंदे यांचे सुपुत्र, ते लहानपणापासून लढाईवर जात असत. तळेगाव उंबरीच्या निजामावरील चढाईपासून हे साऱ्यांच्या नजरेत भरले. पानिपतावर ते सदाशिवराव भाऊ पेशव्यांसोबत होते. पेशव्यांनी त्यांना हुजूरपागेचा सेनापती करून जहागीर दिली. पानिपतचे अपयश त्यांनी अजमल पराक्रमाने व मुत्सद्देगिरीने धुऊन काढले. दिल्लीचा बादशाहा शहाआलम याला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवून गादीवर बसविले. पण खरा अंमल पाटीलबाबांचाच होता. घोडदळ, तोफा, कवायती पलटणी यांचे महत्व त्यांच्या चांगले लक्षात आले. फ्रेंच कारागिरांना पदरी ठेऊन आपली फौज ते नेहमी तयार ठेवत. महादजींनी बादशहाकडून पेशव्यांना वकील-इ-मुतलक हे पद व स्वतःस त्या पदाची नायबगिरी मिळवून घेतली. साऱ्या हिंदुस्थानभर हिंदुपदपातशाही त्यांच्यामुळे सुरू झाली. त्यांच्या सैन्यात मराठ्यांसोबत राजपूत, मुसलमान व युरोपियन देखील असत. त्यांच्याकडे हजार कवायती पायदळ व दशलक्ष घोडदळ व ५०० तोफा होत्या. नानाचे डोके व महादजींच्या शौर्यामुळे सतलजपासून तुंगभद्रेपर्यंत मराठी साम्राज्याचा दरारा होता. महादजी शिंदे कधीही न डगमगणारे, परधर्मसहिष्णू, राष्ट्रभिमानी, लढाऊ सेनापती होते. 

मूल्ये

- • निर्भयता, राष्ट्रप्रेम, कर्तव्यदक्षता.'

 अन्य घटना -

  नाना फडणवीस यांचा जन्म - १७४२.

   • महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या मुलांच्या शाळेची तपासणी लोकसमुदायासमोर झाली - १८५३. 

   • बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचा जन्म - १८८२

    • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन जन्मदिन - १८०९. 

 उपक्रम •- 

 • पराक्रमी ऐतिहासिक पुरूषांची चित्रे दाखविणे. 

 • त्यांच्या कथा सांगणे 

 • ऐतिहासिक घटनांवर लिखाण करावयास सांगणे. 

 

-समूहगान -

-• देश हमारा, निर्मल सुंदर उज्जल गगन का तारा... 

सामान्यज्ञान 

• भारतातील सर्वात मोठे वाळवंट, 'थरचे वाळवंट! तर जगातील सर्वात मोठे वाळवंट 'सहारा' होय. 

'• भारतातील सर्वात लांब नदी ब्रह्मपुत्रा आहे. ती तिबेट, भारत व बांगलादेश या तीन देशातून वाहते. तिची लांबी २९०० किलोमीटर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा