Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

27-जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 27-जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

- सुखी ठेवी सर्वांस देवराया


→ श्लोक 

- सर्वांना सुख लाभावे, तशीच आरोग्यसंपदा । व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये ॥ 

- २७ जानेवारी वार: सर्व लोकांना, आपल्या सर्व देशबांधवांना सुख लाभावे, ते सुखी-समाधानी राहावेत; त्यांचे आरोग्य निकोप असावे, शरीरे स्वचिच कल्याण व्हावे, भले व्हावे, कोणालाही कसलेही दुःख असू नये. 

→ चिंतन 

 माणूस स्वतःच स्वतःचा भाग्यविधाता असतो. सुदृढ व्हावी, माणूस आपले भवितव्य स्वतःच घडवू शकतो. निसर्गाने त्याला बुध्दी दिली आहे. अंगात ताकद दिली आहे. याचा त्याने उपयोग करून घेतला पाहिजे. दीर्घ प्रयत्न- जिद्द, चिकाटी यांच्या योगाने यशाकडे वाटचाल केली पाहिजे. प्रत्येकाने आपले भवितव्य आपल्याच हातात आहे. आपणच आपले भाग्यविधाते आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे.

कथाकथन

 'बिरबल व न्हावी' -

 बिरबल हा अकबर बादशहाच्या दरबारातील चतुर मंत्री, दरबाराचा तो प्राण समजला जाई. त्याच्या चतुर तो अकबर बादशहाचा सर्वात आवडता झाला होता. बादशहा कोणतेही काम बिरबलच्या सल्ल्यानेच करीत असे. हे मात्र तिच्या विरोधकांना खपत नव्हते. या दरबारातून बिरबलला कायमचे काढून टाकावे हे विरोधकांचे बिरबला विषयीचे विचार होते. बिरबलला काढण्यासाठी त्यानी बरेच षडयंत्र रचले, पण बिरबलच्या चातुर्यासमोर ते बाद झाले. बादशहाची आपल्या पित्यावर अपार अशी निष्ठा होती. त्यांचे पिता स्वर्गवासी झालेले होते. बादशहाची आपल्या पित्यावर निष्ठा आहे. या संधीचा फायदा घेवून बिरबलाला दरबारातूनच नाही तर, दुनियेतून कायमचे काढता येते. | अशी युक्ती विरोधकांना सुचली. त्यानुसार त्यांनी नियोजन आखण्यास सुरुवात केली. बादशहाचा दरबार भरला. नियोजनानुसार विरोधक न्हावीबुवा बादशहा समोर मुजरा घालून हजर झाला व म्हणाला, 'शाह पनाह, मला रात्री स्वप्नात आपल्या वडिलांशी संवाद पडला. हे ऐकून बादशहा अत्यंत | आनंदीत झाले. पुढे सांगण्यास सांगितले तेव्हा न्हावी बुवा सांगू लागले, 'हुजूर त्यांना आपल्या दरबारातील बिरबलाची फारच आठवण येत आहे. | शिताशिवाय त्यांना जराही करमत नाही. त्यांना वाटत बिरबलाची एकदा भेट व्हावी. भेट न झाल्यास ते फार दुःखी होतील. आता काय ठरवायचे ते तुम्ही ठरवा.' यावर बादशहा म्हणाले, 'त्याची काहीच काळजी करून नका. होळी करून त्या होळीत बिरबलला टाकले म्हणजे जळल्यानंतर बिरबल आमच्या पित्याला जरूर भेटेल' ही युक्ती बादशहा बरोबर बिरबलालाही मान्य होती. बिरबल फारच चतुर त्याने होळीच्या खाली तळघर खोदले, तो दिवस उजाडला बिरबल होळीवर जावून बसला व होळी पेटविण्यात आली. बिरबल ताबडतोब होळी खालील तळघरात शिरला. दरबारातील इपस्थितांना हा वाटले की, बिरबलचा जळून अंत झाला. बिरबलच्या मरणावर त्याचे विरोधक आनंद लुटत होते. बिरबलाचा कायमचा काटा काढण्याचा आनंद त्यांना झाला होता. या घटनेला पंधरा दिवस होऊन गेले होते. अचानक दरबारात विरक्त ह बादशहाला व बिरबलच्या चाहत्यांना आनंद झाला मात्र विरोधकांनी तोंडात बोटे गेली व दातखीळीच बसली. बादशहा खुप होऊन वडिलांची हकीकत विचारू लागला. यावर बिरबलने सांगीतले, 'घाबरण्यासारखे काही नाही, आपल्या पित्याची दाढीच फार वाढली आहे. दादी लावण्यास एखादया नाव्याला पाठवून द्यावे म्हणून म्हणाले, हे ऐकून न्हावी अर्धमेला झाला. बादशहाने त्याच न्हावी बुवाला दाढी लावण्यासाठी जाण्याचा हुकूम दिला, ज्या |दतीने बिरबल पाठविण्यात आले, बिरबल सारखी न्हावीबुवाची चतुराई कसली. जसी होळी पेटवली तसाच न्हावी बुवा जळून मरण पावला व सर्व हेच यसले की, न्हावीबुवा दाढी लावण्यास गेला. ' 

 

*सुविचार

* • कोणाची धनसंपत्ती किंवा शाळेतील हुशारी, चतुराई पाहून मनोमन जळू नये त्यात आपलेच नुकसान आहे..चांगल्या प्रयत्नांनी आपण चांगली जागा घेवू शकतो हे निश्चित,  

दिनविशेष

जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्मदिन - १९२६ - अरुणकुमारांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण अलिबाग आणि याच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. लहानपणापासूनच ते धाडसी, स्वावलंबी, शांत आणि विचारी होते. नेतृत्वाचा गुणही अंगी होता २९४४ साली त्यांनी बेळगावच्या ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. १९४५ साली सैन्यात कमिशन्ड ऑफिसर, भारतीय लष्करी दलात विविध भूषविली. प्रत्यक्ष युध्दातही त्यांनी भाग घेतला होता. दुसऱ्या महायुध्दात ते आघाडीवर लढले. चीनच्या दुध्दात आणि पाकिस्तानशी १९६५ आणि १९७१ साली झालेल्या युध्दात त्यांनी मोठी कामगिरी केली. त्याबद्दल त्यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले. १ ऑगस्ट १९८३ रोजी त्यांची मुखपदी नेमणूक झाली. सरसेनापती म्हणून सियाचेन येथील सैनिकी कारवाई आणि 'ऑपरेशन ब्लू स्टार' या महत्वाच्या कामगिन्या त्यांनी स्वी केल्या. त्यांच्या आग्रहावरूनच रशियन बनावटीच्या टी-७२ तोडीस तोड असलेला 'अर्जुन' रणगाडा भारतात निर्माण झाला. दोनदा महावीर मिळविणारे ते एकमेव सेनाधिकारी होते. १० ऑगस्ट १९८६ रोजी अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जो सर्वांत कमी चुका करतो तो स्वांत श्रेष्ठ सेनापती असतो. * 

मूल्ये 

-• राष्ट्रप्रेम, श्रमनिष्ठा. 

अन्य घटना 

• महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे शालेय अभ्यासक्रम तयार करणारे मंडळ स्थापन करण्यात आले. - १९६७

 • कल्पकम येथील अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे पहिले युनिट सुरु - १९८४.

  • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी जन्मदिन १९०१.

→ उपक्रम

 • शौर्यकथा सांगाव्यात. लष्करी शस्त्रास्त्रांची माहिती मिळवावी. 

 • इतिहासकालीन - शिवकालीन शस्त्रांची चित्रे वहीत काढून घ्यावीत.

सामान्यज्ञान

विविध सन्मान : 

• नागरी पुरस्कार 

• सरंक्षण क्षेत्रातील

भारतरत्न 

परमवीर चक्र, 

अशोक चक

पद्मविभूषण

 महावीर चक्र

कीर्ती चक्र

शौर्य चक्र

वीर चक्र 

 पद्मभूषण

पद्मश्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा