Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

7 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

7 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना 

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो.... 


→ श्लोक

 पिको वसन्तस्य गुणं न वावसः, करी च सिंहस्य बलं न मूषकः गुणीं गुणं वेत्ति न वेति निर्गुणः बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बलः । गुणवान माणसालाच गुणांची जाण असते गुणहीनाला नाही. शक्तिशाली माणसालाच शक्तीची जाण असते. दुर्बलाला नाही. वसंत ऋतूचे गुण कोकिळ जाणतो कावळा नाही. सिंहाच्या शक्तीची कल्पना हत्तीला असते, उंदराला नाही. 

 

→ चिंतन 

- स्वराज्य म्हणजे आपले राज्य. ते आपल्याजवळ आहे ते कोणी कोणाला देत नसतो. प्रयत्न करा. आपल्या पायावर उभे राहा. ते तुमच्याजवळ आहे ते काही आकाशातून पडत नाही. एके दिवशी सकाळी उठल्याबरोबर स्वराज्याचा पाऊस पडलेला दृष्टोत्पत्तीस आला, असे कधी होणार


कथाकथन -

 ध्वजदिन (७ डिसेंबर) प्रत्येक राष्ट्राचे स्थैर्य त्याच्या सेनादलांवर अवलंबुन असते. आपल्या देशाची तिन्ही सेनादले देशाच्या संरक्षणासाठी समर्थ अशीच आहेत. सागरी किनाऱ्यांवर नौदल तर भूमी सरहद्दीवर भूदल आणि हवाईदल सतत जागता पहारा देत आहेत. या सेनादलातील सैनिक आपले कुटुंब, घरदार वगैरे सोडून देऊन आपल्या गावातून हजारो किलोमीटर लांबवरील छावण्यांमध्ये देशाच्या संरक्षणाचे महत्त्वपूर्ण कार्य करीन आहेत. हे कार्य करताना कधी मरणाला सामोरे जावे लागेल, याचा नेम नसतो. परकीय आक्रमणांच्या वेळी तर त्यांना तळहाती शिर घेऊनच लढावे लागते आपल्या सेनादलांनी चीनच्या आणि पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी अतुल पराक्रम दाखविलेला आहे. बांगलादेश मुक्तिलढ्यात अवघ्या दोन आठवड्यात आपल्या सैन्याने जी बिनतोड करामत दाखविली व पाकिस्तानच्या अन्याय आणि जुलमी राजवटीपासून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यामुळे साया | जगाला आपल्या तिन्ही सेनादलांचे सामर्थ्य दिसून आले आहे. त्यामुळेच आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी रात्रंदिवस जोखमीचे कार्य करणाऱ्या या सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबाच्याही अनेक समस्या असतात, हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? त्यांच्या प्रापंचिक अडचणी, त्यांच्या मुलांचे शिक्षण वगैरेसाठी त्यांना मदत हवी असते. सैन्यातून निवृत्त झालेल्या | सैनिकांना व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची गरज असते, याचा विचार प्रत्येक नागरिकांने करायला हवा. कारण सैन्याच्या जीवावरच आपण आपले | जीवन शांतपणे व सुखसमाधानाने घालवितो. त्या सैनिकांचे उत्तराई होणे हे आपले कर्तव्यच आहे. हे जाणूनच आपल्या सरकारने ७ डिसेंबर हा ध्वजदिन जरा करण्याची प्रथा सुरू केली. या दिवशी छोट्या आकाराची कोट्यवधी निशाणे नाममात्र किमतीला देशभर विकली जातात आणि त्यातून सैनिकांच्या साठी निधी उभारला जातो. हा निधी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होतो व जिल्हाधिकारी तो सर्व निधी दिल्ली येथील मध्यवर्ती कडे पाठवितात. त्यातील ४५ टक्के रक्कम माजी सैनिकांसाठी व उरलेली रक्कम आजी सैनिकांसाठी देण्यात येते. हे ध्वज जास्तीत जास्त प्रमाणात आपण या निधीला हातभार लावला पाहिजे. जय जवान, जय किसान!सुविचार

 हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आद्रसूर्य नांदो स्वातंव्य भारतावे. दि. •राष्ट्रासाठी मरण पत्करणारे अमर • सेवा हा ज्याने आपला धर्म ठरविला आहे त्याने मानसन्मानाची कमीही अपेक्षा करू नये.


 → दिनविशेष 

 • मनदिन मृत्यूची टांगती तलवार सदैव आपल्या डोक्यावर घेऊन जो स्वदेशासाठी, स्वबांधवांसाठी हाती शीर स्वतःची मुले, माणसे, घरदार यांना विसरून जो दूर सीमेवर शत्रूशी झुंज देतो, प्रसंगी प्राण अर्पण करून स्वदेशाचे रक्षण करतो, त्या सैनिका | आदरांजली वाहण्याचा दिवस म्हणजे ध्वजदिन ध्वजदिनाचे दिवशी रणांगणात देह ठेवलेल्या वीरांच्या स्मृती जाग्या ठेवणे, त्यांच्या वा देणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. सेनाध्वजदिन - ध्यजनिधी विनियोग- माजी सैनिकांच्या कामासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या राबविण्यासाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीत संरक्षण खात्याअंतर्गत पुनर्वास महासंचालनालय हे देशातील सर्व माजी सैनिकांच्या कामात सुर आणण्यासाठी व विविध सवलतीचे नियोजन करण्यासाठी एक कार्यालय दिल्ली येथे आहे. त्यांच्या अखत्यारित केंद्रीय सैनिक मंडळ असते. जे राज | जास्तीत जास्त निधी संकलित करेल, त्याला दर वर्षी केंद्र सरकारकडून चषक दिला जातो. महाराष्ट्राने सलग दोन वर्षे हाच चषक जिंकला होता.

 • 

 → मूल्ये 

 देशभक्ती, कृतज्ञता, आदरभाव. 

 

→ अन्य घटना - 

• क्रीडा भाष्यकार शरदिंदु संन्याल यांचा स्मृतिदिन - १९७८. इन्सॅट - 

• २ या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण - १९९५ उपक्रम 

• भारताच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या पुण्यात धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांच्या बलिदानाच्या वीर य विद्यार्थ्यांना सांगणे.

 • लष्करातील आजी-माजी जवानांना, सैनिकांना, अधिकाऱ्यांना शाळेत बोलावून त्यांचे अनुभव ऐकणे. 

 

→ समूहगान 

• धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान परतीची आम्ही लेकर.... 


→ सामान्यज्ञान 

• मानवाला उपयुक्त अशा अनेक प्रकारच्या खनिजांचा प्रचंड साठा चांद्रभूमीवर आहे. चंद्रावरून आणलेल्या खडकांच्या | क्ष-किरणांच्या सहाय्याने परीक्षण केल्यानंतर त्यात सोडियम, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन व लोह ही मूलद्रव्ये आहेत, असे निश्चित करता आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा