Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

28 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 २८ डिसेंबर


प्रार्थना 

- सुखी ठेवी सर्वांस देवराया.... 


श्लोक

-उत्तम पुरूषासवे उत्तम नारी। तरि त्याचा संसार स्वर्गापरि पुरूषाहूनि काकणभरि । महिला वरीच राहत वार : स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान। तिलाच संयम, शहाणपण तिच्यानेच हालती वाटे संपूर्ण । संसारचक्रे - ग्रामगता 

-उत्तम पुरूषास उत्तम स्त्री प्राप्त होताच त्यांचा संसार स्वर्गापरि होतो. पुरूषाहून स्त्रिया काकणभर सरसच राहतात. स्त्रीच भक्तीमान आहे, ज्ञानी आहे. तिला संयम आहे. शहाणपण आहे. तिच्यानेच संपूर्ण संसारचक्रे चालत असतात. 10



. चिंतन- 

सहकार्य वाढवा, सामर्थ्य वाढवा. एकटा माणूस काहीच करु शकत नाही. त्यासाठी संघटना हवी, विविध विचारांची पण प्रगतीची वाटचाल करणारी संस्था हवी. संघटना माणसाच मनात बळ उत्पन्न करते. प्रेरणा निर्माण करते. एक गवताची काडी कुणीही मोडू शकेल, पण हजार काड्या एकत्र केल्या तर त्यांची ताकद अभेद्य अ म्हणून संघशक्ती हवी, संघटना हवी. जसे एकीचे बळ मिळते फळ. पाच बोटे एकत्र केली, मूठ तयार होते. एकीने राहू, नेकीने वागू.


कथाकथन 

- 'शिष्याची परीक्षा' - प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती. तेव्हा आचार्यांकडे तीन शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आले. यानी आपल्या आश्रमामध्ये विद्यादानाचे कार्य सुरु केले. विद्या ग्रहण करीत असताना आचार्यांच्या सहवासात आश्रमातील दिवस भरभर निघून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीनही शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी आचार्याकडे गेले. तेव्हा आचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे दिवशी तिन्ही शिष्य परीक्षेकरिता आले. इकडे आचार्यांनी परीक्षा घेण्यासाठी रस्त्यावर काटे पसरवून ठेवले होते. आचार्यांनी शिष्याला सांगितले की, ह काटेरी मार्ग पार करून आश्रमामध्ये प्रवेश करायचे.' ठरल्याप्रमाणे आचार्य आश्रमात बसून होते. सर्वप्रथम पहिला शिष्य काटेरी मार्गावरून पायी चालत चालत आश्रमात गेला. तेव्हा शिष्याचे पाय पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. त्यानंतर दुसरा शिष्य काटेरी मार्गावर पाऊलवाटेतील काटे बाजूला सारून पायाला एकही काटा रुतू न देता आचायांजवळ पोहोचला. नंतर तिसऱ्या शिष्याने हाती झाडू घेऊन रस्त्यावरील काटे झाडून रस्ता साफ केला आणि सर्व जाळून टाकल्यानंतर आचार्याजवळ आला. तेव्हा आचार्यांनी तिसन्या शिष्याचे अभिनंदन केले; तेव्हा दोन्ही शिष्यांना आश्चर्य वाटले. तेव्हा पहिला शिष्य आचार्यांना म्हणाला, 'मी कशाचीही पर्वा न करता रक्तबंबाळ होऊन आपल्याजवळ आलो.' दुसरा शिष्य म्हणाला, मी एकही काटा स्तु न देता सुखरुप आपल्याजवळ आलो.' तेव्हा आचार्यांनी शांतपणे उत्तर दिले. “शिष्योत्तमा तुला काही गरज नसताना पाय रक्तबंबाळ करून आलास." दुसन्या शिष्याला म्हणाले, 'तू काटेरी रस्त्यावरून येताना फक्त स्वतःपुरता विचार केलास. तर तिसऱ्या शिष्याने मात्र स्वतःचा विचार करून दुसऱ्यांचाही विचार केला.' असे आचार्यांनी सांगताच दोन्ही शिष्य निरुतर झाले. 


० सुविचार

 • निरभिमानी, निर्मत्सरी, सदातत्पर, हाव न धरणारा, दृढ मैत्री ठेवणारा, नवे ज्ञान मिळविण्यास उत्सुक असणारा व दिलेला शब्द पाळणारा तोच खरा शिष्य होय.



दिनविशेष -

 व्हायचे असते त्यानेच लांबा पणापात घालावयाचा असतो. असे विचार पर अंटन ए कांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. १८८५ मध्ये या गोष्टीला चालना मिळू लागली. व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन बानी राजकारणी लोकांनी वर्षातून एकदा एकत्र यावे व निर्भीडपणे आपले म्हणणे मांडावे म्हणले सरकारलाही आपल्या कामाची दिशा सोप आवश्यक त्या सुधारणा त्वरेने करता येतील, त्या सभेला गव्हर्नर अध्यक्ष नको, हिंदी पुढारीच असावा असेही अविण्यात आले. पुण्याच्या सार्वजनिक सभेने पुण्यात अधिवेशन भरविण्याचे ठरविले. 'इंडियन नॅशनल युनियन' ऐवजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' असे नामकरण झाले. नोलेंबर हात पुण्यात कॉल्याची साथ आली आणि पुण्याऐवजी मुंबईत २८ डिसेंबर १८८५ रोजी गोकुळदास तेजपात सभागृहात कलकल्पाच्या उमेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. अखिल भारतीय राष्ट्रसभेचा असा जन्म झाला. 


मूल्ये 

• देशभक्ती, त्याग, सर्वधर्मसमभाव, शुचिता 5 

• 

अन्य घटना

 प्रसिद्ध कादंबरीकार ग. त्र्यं माडखोलकर जन्मदिन १८९९ • हिंदी साहित्यिक सुमित्रानंद स्मृतिदिन १९७०


 उपक्रम 

 • स्वातंत्र्याचा इतिहास मुलांना चित्र, संवाद, व्याख्याने, कथा, चर्चा इ. माध्यमांतून सांगण्याचा प्रयत्न करणे.. [10]


 समूहगान 

 • आम्ही बालक ह्या देशाचे, शिकू धडे सारे विज्ञानाचे.... [D] 


सामान्यज्ञान 

शोध व संशोधक • कॉन्टेक्ट लेन्स सर जॉन हर्शेल (१८४५) इंजेक्शनची पिचकारी अलेक्झांडर चूड (१८५३) • सेल्युलॉइड (कचकडे) अलेक्झांडर पार्कस् (१८५५)



ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेतील भारताचे यश १. ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूचे वैयक्तिक यश :


नाव-स्थळ-स्पर्धा-क्रमांक -पदक  

नॉर्मन प्रिचर्ड-पॅरिस१९००-२०० मी हर्डल्स-२-रौप्य

 पॅरिस१९००-२०० मी धावणे -२-रौप्य


हेन्री रिबेली -लंडन (१९४८) -तिहेरी उडी-अंतिम फेरीत प्रवेश-

खाशाचा दादासाहेब जाधव • -लंडन१९४८) बँटमवेट  • -कुस्ती: फ्री स्टाईल-६


🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा