2024
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेकरिता
NMMS
नवनीत
(मार्गदर्शक व सराव पुस्तिका)
इयत्ता आठवी
पेपर 2
शालेय क्षमता चाचणी (SAT) (सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे व गणित)
MTSE
या परीक्षेसाठीही उपयुक्त
विभाग 1 : सामान्य विज्ञान ( प्रश्नक्रमांक 1 ते 35)
1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
2. आरोग्य व रोग
3. बल व दाब
4. धाराविदयुत आणि चुंबकत्व
5. अणूचे अंतरंग
6. द्रव्याचे संघटन
7. धातू-अधातू
8. प्रदूषण
9. आपत्ती व्यवस्थापन
10. पेशी व पेशीअंगके
11. मानवी शरीर व इंद्रिय संस्था
12. आम्ल, आम्लारी ओळख
13. रासायनिक बदल व रासायनिक बंध
14. उष्णतेचे मापन व परिणाम
15. ध्वनी
16. प्रकाशाचे परावर्तन
17. मानवनिर्मित पदार्थ
18. परिसंस्था
19. ताऱ्यांची जीवनयात्रा
विभाग 1 : सामान्य विज्ञान
1
सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा
1. सजीवांना वैज्ञानिक नाव देण्याची 'द्विनाम पद्धती'------ यांनी पहिल्यांदा वापरली.
(1) कोपलैंड
(2) कार्ल लिनिअस
(3) चॅटन
(4) व्हिटाकर
उत्तर-(2) कार्ल लिनिअस
____________________
2. --------'या सूक्ष्मजीवाची पेशीभित्तिका कायटीन या जटिल शर्करेपासून बनलेली असते.
(1) शैवाल
( 2) कवक
(3) जीवाणू
(4) विषाणू
उत्तर-कवक
___________
3. ----परपोषी सजीव आहे.
(1) क्लोरेल्ला
(2) क्लॅमिडोमोनास
(3) युग्लीना
(4) कवके
उत्तर- कवके
_____________
4. गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) कवके
(2) आदिजीव
(3) जीवाणू
(4) शैवाले
उत्तर-जीवाणू
___________
5. सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भातील प्रमाण :
1 मीटर =-------
मायक्रोमीटर
(1) 109
(2) 103
(3) 106
(4) 107
उत्तर-106
_______
6. मक्याच्या कणसावरील बुरशीला-----म्हणतात.
(1) अॅस्परजिलस
(2) पेनिसिलिअम
(3) भूछत्रे
(4) किण्व
उत्तर-अॅस्परजिलस
_________________
7. इ. स. 1866 साली----- यांनी सजीवांना 3 सृष्टींमध्ये विभागले.
(1) कार्ल लिनिअस
(2) कोपलँड
(3) चॅटन
(4) हेकेल
उत्तर-हेकेल
_________
8. 'जास्वंद' या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते ?
(1) हिबिस्कस रोझा-सायनेन्सिस
(2) कॅनिस फॅमिल्यरिस
(3) बोस टॉअरस
(4) सॉर्घम व्हलगेर
उत्तर-हिबिस्कस रोझा-सायनेन्सिस
_______________
9. -------यांनी इ. स. 1925 मध्ये सजीवांचे आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी असे दोन गट केले..
(1) व्हिटाकर
(2) कार्ल लिनिअस
(3) चॅटन
(4) कोपलँड
उत्तर-चॅटन
_________
10.---हे सजीव-निर्जीवांच्या सीमारेषेवर आहेत, असे
म्हणतात.
(1) कवके
(2) जीवाणू
(3) विषाणू
(4) शैवाले
उत्तर-विषाणू
____________
11.-----या आदिजीवामुळे आमांश होतो.
(1) एन्टामिबा हिस्टोलिटिका
(2) प्लास्मोडिअम व्हायव्हॅक्स
(3) युग्लीना
(4) पॅरामेशिअम
उत्तर-एन्टामिबा हिस्टोलिटिका
_______________________
12. विषाणूंचा आकार सुमारे एवढा असतो.
(1) 10um à 100 μm
(2) 200um
(3) 1m ते 10 um
(4) 10 nm ते 100 nm
उत्तर-10 nm ते 100 nm
______________________
13.-------हे मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात.
(1) जीवाणू
(2) विषाणू
(3) कवके
(4) शैवाले
उत्तर-कवके
___________
14. 'कुत्रा' या प्राण्याचे वैज्ञानिक नाव ----आहे.
(1) बोस टॉअसर
(2) कॅनिस फॅमिल्यरिस
(3) हिबिस्कस रोझा-सायनेन्सिस
(4) सॉर्घम व्हलगेर
उत्तर-कॅनिस फॅमिल्यरिस
__________________
15. दही किंवा ताकामध्ये----- जीवाणू आढळतात..
(1) लॅक्टोबॅसिलाय
(2) व्हायब्रीओ कोलेरी
(3) स्टॅफायलोकॉकस
(4) क्लोस्ट्रिडिअम बोट्यूलीनम
उत्तर-लॅक्टोबॅसिलाय
________________
16. पुढीलपैकी कवक कोणते ?
शैवाल, अमिबा, पेनिसिलिअम, युग्लीना
(1) शैवाल
(2) अमिबा
(3) पेनिसिलिअम
(4) युग्लीना
उत्तर-पेनिसिलिअम
_______________
17. रॉबर्ट व्हिटाकर यांनी इ. स. 1969 मध्ये सजीवांची----- गटांत विभागणी केली.
(1) 3
(2) 4
(3) 2
(4) 5
उत्तर-5
________
18. प्लास्मोडिअममुळे----- होतो.
(1) एड्स (HIV)
(2) आमांश
(3) मलेरिया
(4) पोलिओ
उत्तर-मलेरिया
___________
19.लॅक्टोबॅसिलाय कोणत्या सृष्टीत वर्गीकृत केला जातो?
(1) प्रोटिस्टा
(2) मोनेरा
(3) कवक
(4) वनस्पती
उत्तर-मोनेरा
_________
20.----'मध्ये हरितद्रव्ये नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही.
(1) शैवाल
(2) बुरशी
(3) निवडुंग
(4) कमळ
उत्तर-बुरशी
___________
21. आदिकेंद्रकी सूक्ष्मजीव---- 'सृष्टीतील आहेत.
(1) वनस्पती
(2) प्रोटिस्टा
(3) मोनेरा
(4) कवके
उत्तर-मोनेरा
___________
22. पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत यांनी वापरली.
(1) कार्ल लिनिअस
(2) रॉबर्ट व्हिटाकर
(3) हेकेल
(4) चॅटन
उत्तर-रॉबर्ट व्हिटाकर
_________________
23. गटात न बसणारा शब्द ओळखा :
पोलिओ विषाणू, इन्फ्लुएंझा विषाणू, HIV-एड्स विषाणू, पिकोर्ना विषाणू.
(1) पोलिओ विषाणू
(2) इन्फ्लुएंझा विषाणू
(3) HIV-एड्स विषाणू
(4) पिकोर्ना विषाणू
उत्तर-पिकोर्ना विषाणू
________________
24. आदिकेंद्रकी पेशीचा आकार----असतो.
(1) 5-100 मायक्रोमीटर
(2) 1-10 मायक्रोमीटर
(3) 5-100 नॅनोमीटर
(4) 1-10 नॅनोमीटर
उत्तर-1-10 मायक्रोमीटर
___________________
25.दृश्यकेंद्रकी एकपेशीय सजीवांचा समावेश----- सृष्टीमध्ये केला जातो.
(1) मोनेरा
(2) प्रोटिस्टा
(3) कवके
(4) शैवाले
उत्तर-प्रोटिस्टा
___________
26. पुढीलपैकी असत्य जोडी ओळखा
(1) मानव – इन्फ्लुएंझा विषाणू
(2) जीवाणू – बॅक्टेरिओफाज विषाणू
(3) वनस्पती - टॉमेटो विल्ट जीवाणू
(4) गुरे – पिकोर्ना विषाणू -
उत्तर-वनस्पती - टॉमेटो विल्ट जीवाणू
______________________
27. मोनेरा सृष्टीत जीवाणूंच्या व्यतिरिक्त आणखी कोणते सजीव येतात?
(1) विषाणू
(2) कवक
(3) नीलहरित शैवाल
(4) आदिजीव
उत्तर-नीलहरित शैवाल
__________________
28.1 मीटर=-------नॅनोमीटर.
(1) 103
(2) 106
(3) 109
(4) 104
उत्तर-109
_________
29.------हे मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात.
(1) शैवाले
(2) कवके
(3) आदिजीव
(4) विषाणू
उत्तर-कवके
_________
30.-----म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते.
(1) जीवाणू
(2) शैवाले
(3) कवके
(4) विषाणू
उत्तर-विषाणू
___________
31.दृश्यकेंद्रकी पेशीचा आकार-----
असतो.
(1) 1-10 मायक्रोमीटर
(2) 5-100 मायक्रोमीटर
(3) 5-100 नॅनोमीटर
(4) 1-10 नॅनोमीटर
उत्तर-5-100 नॅनोमीटर
__________________
32. पुढीलपैकी असत्य जोडी ओळखा :
(1) कवक-कॅन्डिडा
(2) आदिजीव - अमिबा
(3) शैवाल- आदिकेंद्रकी
(4) विषाणू- बॅक्टेरिओफाज
उत्तर-शैवाल- आदिकेंद्रकी
___________________
33.पेशीभित्तिका असणाऱ्या पण प्रकाश-संश्लेषण करू न शकणाऱ्या सजीवांचा समावेश सृष्टीमध्ये होतो.
(1) वनस्पती
(2) प्राणी
(3) मोनेरा
(4) कवके
उत्तर-कवके
__________
34. नीलहरित शैवालांचा समावेश -----सृष्टीमध्ये होतो.
(1) मोनेरा
(2) प्रोटिस्टा
(3) कवके
(4) वनस्पती
उत्तर-मोनेरा
___________
35.----- हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात.
(1) टॉमेटो विल्ट
(2) बॅक्टेरिओफाज
(3) पिकोर्ना
(4) इन्फ्लुएंझा
उत्तर-बॅक्टेरिओफाज
_____________
36. गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) गोलाकार
(2) तरफदार
(3) दंडाकार
(4) सर्पिलाकार
उत्तर-तरफदार
____________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा