Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

18 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 १८ डिसेंबर 


प्रार्थना 

प्रभु तेरी नाम जो ध्याये फल पायें सुख लाये....


श्लोक

उत्तम महिला हेचि करी । आपुले घर ब्रीदासह सावरी । मूलबाळ आदर्श करी । वरि प्रेमळपण सर्वांशी ॥ वार : याच गुणे 'मातृदेवो भव' । वेदाने आरंभीच केला गौरव । नररत्नांची खाण अपूर्व । मातृजाति म्हणोनिया ॥ - ग्रामगीता उत्तम महिला आपले घर ब्रीद सांभाळून सावरते. मुलाबाळांना आदर्श करते. सर्वांशी ती प्रेमळपणे वागते. मातेच्या याच गुणामुळे 'मातृदेवोभाव' असे म्हटले आहे. वेदांनी आरंभीच मातृगौरव केला आहे. माता ही नररत्नाची अपूर्व अशी खाण आहे.


चिंतन 

विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. उच्च, उदात्त, सात्विक गोष्टी ते शिकू शकतात. त्याचप्रमाणे हीन, तामस अशा गोष्टीचेही शिक्षण अनुकरणाने उचलीत असतात. त्यासाठी समाजाला शिस्त लावण्याचा, समाजात उच्च मूल्ये, रुजविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, की शाळेचे विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे, शिकविण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. डॉ. ग. श्री. खैर 

→ कथाकथन 

. 'माणसाची योग्यता जातीवर नसते' एका जन्मी बोधिसत्व चांडाळ कुळात जन्मता. वयात आल्यावर दिवाह करून तो आपल्या कुटुंबाचे | काकथन सन्मार्गाने पालन पोषण करीत असे. एकदा त्याच्या बायकोला भलत्याच ऋतूत आंबे खाडलले तिने नवऱ्याकडे | हह धरला. पण भलत्याच दिवसात आंबे कसे मिळणार ? बोधिसत्वाने तिची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दुसरे एखादे आंबट फळ खाऊन आपले डोहाळे भागव असे तिला सांगून पाहिले. पण ती काही केल्या ऐकेना, त्यावेळी बारासणीच्या राजाच्या उद्यानात त्या ऋतूत आंब्याला फळे येत असत. कोणी पाहिले नसावे, पण असे ऐकिवात तरी होते. तेव्हा आपल्या पत्नीच्या हट्टाखातर बोधिसत्वाने जिवाची पर्वा न करता रात्री त्या उद्यानात देश केला. रात्रभर त्याने आंब्याचा शोध केला. पण एकही आंबा मिळाला नाही ! तोवर पहाट झाली. माळी लोक उद्यानात येऊन झाडांना पाणी घालण्याचे करू लागले. तेव्हा उद्यानातून बोधिसत्याला माध्यांच्यादेखत पाहूनही जाता येईना. नाईलाजाने तो एका मोठ्या आंब्याच्या झाडावर जनून बसला. नेमका त्याच झाडाखाली राजा आपल्या पुरोहितासह येऊन बसत असे व मंत्र शिकत असे. पण, त्यावेळी राजा स्वतः उच्चासनावर बसून पुरोहिताला मात्र जमिनीवर बसवीत असे. रोजच्याप्रमाणे त्याही दिवशी राजा पुरोहिताला घेऊन तेथे आला. रोजच्याप्रमाणे अध्ययन सुरु झाले. राजा उच्चासनावर व पुरोहित जमिनीवर बसून मंत्र सांगताना पाहून बोधिसत्वाला ते असह्य झाले. त्याने एका फांदीला लोंबकळून राजा आणि पुरोहित पांच्या मधोमध उडी घेतली ! तो म्हणाला, 'महाराज, मी तर आज नष्ट झाल्यासारखच आहे. पण, तुमचा आणि पुरोहिताचा हा प्रकार पाहून मला फार ईट वाटत. का बरं ? राजाने विचारले 'महाराज, बोधिसत्य म्हणाला, 'आपण दोघेही धर्म जाणत नाही. गुरूला खाली बसवून आपण अध्ययन करणे। हा शिष्याचा धर्म नव्हे आणि खाली बसून उच्चासनावर बसलेल्या शिष्याला पाठ सांगणे हा गुरुचा धर्म नके! तेव्हा आपण दोघेही पतित आहा असे मला वाटते. ते ऐकून पुरोहित म्हणाला, 'अरे तू मोठ्या धर्माच्या गोष्टी सांगतोस, पण राजाच्या घरी सुग्रास भोजन मिळत असल्याने ऋषिमुनींना सांगितलेल्या धनांची भला पर्वा नाही.' बोधिसत्व म्हणाला, 'अशा अधर्माने पोटाची खळगी भरण्यापेक्षा निःसंग होऊन भिक्षा मागून जगलेल बरं ! राजाच्याच घरी अज्ञ शिजत आहे, आणि इतरांच्या घरी शिजत नाही अस नाही. तेव्हा हा नरकाला जाण्याचा मार्ग सोडून देऊन यातून बाहेर पड! नीचपणाने आणि अधर्माने । | मिळविलेल्या धनद्रव्याचा आणि कीर्तीचा धिक्कार असो ! हे बोधिसत्वाचे बोलणे ऐकून राजा प्रसन्न झाला आणि म्हणाला, 'हे माणसा, तुझी योग्यता मोठी असल्याने मी तुला नगर रक्षकाच्या पदावर नेमतो. दिवसा जरी मी राजा असलो तरी रात्री तुझीच या नगरावर सत्ता राहील. ' 'असे म्हणून राजाने त्याच्या यात तांबड्या फुलांची माळ घातली. आणि ताबडतोब त्याला कोतवालाची जागा दिली. तेव्हापासून कोतवाल तांबड्या फुलांची माळ घालत असत. 

सुविचार 

• माणसाची योग्यता त्याच्या जातीवर, बयावर, हाताच्या हस्तरेषेवर अवलंबून नसून त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते.


दिनविशेष

अस्पृश्यता निवारण दिन - म. ज्योतिबा फुले, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेमहाराज, साने गुरुजी, डा. आंबेडकर या व यांसारख्या इतर अनेक व्यक्तींनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य केले आहे. सर्व मनुष्यमात्र समान आहेत ही भूमिका समाजात माविण्यासाठी. अनेक सामान्य, असामान्या व्यक्तींनी जीवाची कुरवंडी केली. शतकानुशतकाच्या दास्यत्वातून मुक्तता दिली ती भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान नागरिकत्वाचा अधिकार देऊन. त्यासाठी सतत २०० वर्षांपासून समाजाची मनोभूमिका तयार करण्याचे कार्य विचारवंतांनी केले. सावरकरांनी स्वतः कृतीतून अस्पृश्यता निवारणाचे कार्य करून दाखविले. -


मूल्ये 

- समता, बंधुता, न्याय. 


→ अन्य घटना

 • क्रांतिकारक अशफाकउल्ला खान यांना फाशी- १९२७० माजी पंतप्रधान राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांना 'भारतरत्न' पुरस्कार - १९७१ | 


→ उपक्रम

 • विषमतेविरुध्द लढा देणाऱ्या भारतीय व इतर देशातील व्यक्तींची माहिती मिळविणे. 


→ समूहगान 

• नन्हा मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ...... -


 → सामान्यज्ञान 

 • स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त कन्याकुमारी येथे तीन समुद्रांच्या संगमावरील भव्य शिलेवर त्यांचे स्मारक बनविले गेले. त्यासाठी मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे तत्त्व अंगी बाणवून आजीवन कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटना स्थापली. 'विवेकानंद केंद्र' हे तिचे नाव. व्यक्तिमत्त्व विकास आणि राष्ट्र पुनरुत्थान हे डोळ्यांपुढे ठेवून कार्य करणारे हे सेवा संघटन, समाजातील दुर्बल घटकांसाठी सतत विविध क्षेत्रातून प्रयत्नशील असलेले.. • विवेकानंद केंद्राची महाराष्ट्रात व भारतात बऱ्याच ठिकाणी केंद्रे असून समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी त्याव्दारे विविध उपक्रम चालविले जातात. कन्याकुमारी येथे मुख्य केंद्र असून अरुणाचल प्रदेश, रामनाड येथेही मोठी केंद्रे आहेत. अनेके सुशिक्षित, सेवाभावी, त्यागी कार्यकर्त्यांनी या कार्याला वाहून घेतले असून त्यांना जीवनव्रती असे संबोधले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा