Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

30 nov

 ३० नोव्हेंबर



प्रार्थना

 आता बंदिता मी गुरु माऊलीला, अति आदरे मी नमी या पदाला... 



 श्लोक

- दुर्लभ मानुष्य जन्म है, होय न दूजी बार । पक्का फल जो गिर पडा, लगे न दूजी बार || मानव जन्म दुर्लभ आहे. तो (पुर्नजन्म) पुन्हा पुन्हा कधीही मिळत नाही. झाडावरील पिकलेले फळ एकदा खाली पडले की, तेथे दुसरे फळ पुन्हा कधीही लागत नाही. त्याप्रमाणेच मानव जन्माचे आहे. + 



चिंतन -

 शिक्षणामुळे एका चांगल्या माणसासारखं सुखी जीवन तुम्हाला खात्रीने जगता येईल, शिकलेला माणूस नदीच्या वाहत्या पाण्यासारखा आहे. ज्या पाण्याला वाहता वाहता सतत ज्ञानरूपी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे ते स्वच्छ राहतं व त्यात घाणेरड्या विचारांचा मळ साचत नाही. + कथाकथन 'कृतज्ञता' अचानकपणे पतीचे अपघातात निधन होते आणि तरूणपणी एकाकी आयुष्य वाट्याला येते. पदरी दोन लहा



कथाकथन

 कृता' - अचानकपणे पतीचे गाव होते आणि दोन लहान अम फार मोठा प्रश्न निर्माण होतो. नव्याने नोकरी मुलाचे नीट संगोपन आणि ज स्याना परिस्थितीचे गांभीर्य कळत नसते. त्यांचे बालहट्ट चालूच राहतात. आई मात्र या सर्व प्रतिकूल परिस्थूिते ऑफिसमध्ये कर आणि घरी अफाट कष्ट. कधी कधी मनात येते की, जगसारखे पवित्र मन असलेल्या आई नावाच्या प्रमादीला दोनही रेष्ट वेदश्चेच का मिळतात. सुखाचा किनारा खूप वेळेला तिला दिसतच नाही, मात्र तिच्या मनात येते की, जपली ही दोन मुले म्हणजे आपले उद्याचे सुखाचे किनारे आहेत. मुले मोठी होऊ लागतात. तेव्हा तिला खूप बरे वाटते. मुले सज्ञान होतात. परंतु आश्चर्य म्हणजे आपली ही दोन मुले साना ऐवजी मूर्खासारखी बागायला लागली आहेत हे आईच्या लक्षात येते आणि तिला नव्याच प्रश्नांना सामोरे जावे लागते. आपल्याला बडील नाहीत याची पुलांना तरुणवयातसुध्दा जाणीव होत नाही याची आईला खंत वाटू लागते. बीस - बावीस वर्षाची पदवीधर झालेली मुले आईच्या वेदनेशी समरस व्हायच्या ऐवजी तिच्या वेदनेत भरच टाकू लागतात. घरातल्या कामाल हात लावत नाहीत. चहाचा कप त्यांच्या हातात नेऊन द्यावा लागतो. साधी आपली कपबशी सुध्दा ही मुले उचलून ठेवत नाहीत. दोन्ही खांद्यावर सामानाच्या जड पिशव्या सांभाळत आई जेव्हा दमून घरी येते, तेव्हा टी.व्ही. बघण्यात गर्क झालेली मुले चटकन उठ्त आईच्या खांद्यावरच्या पिशव्या सुध्दा घेत नाहीत. उलट आईलाच म्हणतात की, आई मला भूक लागली आहे. काही तरी करून दे... आणि ती प्रेमाची माऊली हातपाय धुवून देवापुढे दिवा लावून स्वयंपाकघरात मुलांसाठी काहीतरी पदार्थ करायला लागते. मुलांनो, मनात असा प्रश्न येतो की, भावना नावाचे इंद्रिया बहुतेक तरुण मुले हरवून बसली आहेत का... माकडाचा माणूस झाला, तेव्हा शेपूट गळून पडले आणि गेल्या पाच-दहा वर्षात झालेला या इलेक्ट्रॉनिक्सच्या क्रांतीमुळे माणसांचे भावनेचे आणि मायेचे इंद्रिय गळून पडले. अलिकडे असे दृश्य सर्वत्रच दिसू लागले आहे की, मुलांचे आई-वडिलांशी संबंध फक्त सुख ओरबाडण्यापुरतेच राहिले आहे. मुलांनो, आपल्या आई-वडिलांशी कृतज्ञ भावनेने राहायला शिका. त्यांच्याशी प्रेमाने वागा. ज्या घरात वडील नाहीत त्या घरातल्या मुलांनी तर तरुणपणी तरी जबाबदारी घ्यायला शिका... आपल्याच घरात आई नावाचे समुद गाव नांदते आहे, त्याला कदापि विसरू नका. नाहीतर तुम्ही बेघर व्हाल...


 → सुविचार - 

 -• दुसरं काही विसरा पण आई, वडील, गुरु यांना विसरू नका.

 • जीवन हे आपल्याला संधी देत असते. संधी मिळाल्यावर तुम्ही मनापासून एखादे काम केले तर तुम्हाला नक्की यश मिळेल.

  • आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उंचबळत असतात. - साने गुरुजी

   • बुध्दीमान बना, न्यायशील बना व सद्संगती ठेवा  .

   • आयुष्य एक क्रमळ आहे, जे दुःखाच्या रात्री कोमजते व सुखाच्या पहाटे उमलते. 

• झोपले अजून माळ तापवीत काया, असंख्य या नद्या अजून वाहतात वाया. अजून हे अपार दुःख वाट पाहताहे - बाबा आमटे. 'माऊली'


- दिनविशेष - 

- • कवी बा. भ. बोरकर यांचा जन्मदिन - १९१० : बाकीबाब या नावे प्रसिध्द असणारे मराठीतील प्रसिद्ध कवी, कांदबरीकार आणि लघुनिबंधकार बोरकर यांचा जन्म कुचकडे (गोवा) येथे झाला. त्यांचे शिक्षण धारवाड येथे मॅट्रिकपर्यंत झाले. पोर्तुगीज टीचर्स परीक्षाही उतीर्ण झाले. गोव्यातील हायस्कूलात ते काही काळ शिक्षक होते. मुंबईच्या विविध वृत्तपत्रात त्यांनी नोकरी केली. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी भाग घोलला. आमचा गोमंतक आणि पोजेंचा आवाज या पत्रांचे ते सपादक होते. आकाशवाणीच्या पुणे-पणजी या केंद्रावर वाङ्मय विभागात काम करून ते निवृत्त झाले. 'प्रतीभा' हा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह १९३० मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलनात प्रसिध्द झाला. त्यानंतर 'जीवन संगीत', 'दूधसागर', 'आनंदभैरवी 'चित्रवीणा', 'गीतार',' चैत्रपुनव' आणि 'कांचनसंध्या' हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. 'सासाय' हा त्यांचा कोकणी काव्यसंग्रह १९८१ मध्ये प्रसिध्द झाला आणि त्याला त्या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. बोरकर तसे परंपराप्रेमी पण त्यांच्या परंपरा प्रेमावर झालेल्या रसपूर्ण संस्कारांनी त्यांना क्वी बनविले. बालकवी आणि विशेषत तांबे यांच्या कवितेचा आदर्श त्यांच्यापुढे होता. त्यांची कविता गेय असून त्यांचे संगीतप्रेम त्यांच्या कवितासंग्रहांच्या नावावरूनही दिसून येते. राष्ट्रपतींनी १९६७ मध्ये पद्माश्री हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारतर्फे त्यांना १९७४ मध्ये ताम्रपट देण्यात आला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यातील एक प्रतिभावान कवी हरपला. वाट पाहता- बाबा आमटे. हृदयातील या पणत्या, ज्योती, झुरूनि अंधकारी जरि मिणमिणती । त्यांस लाभता आज जागृती, स्नेहाविण का उततिल वाती ? मीपण नेऊं हसत विनाशा, फुलवू अपुली प्रकाशभाषा । उजळू मानवतेच्या आशा, जळुनि करू जीवनमुक्ती ।। - बा.भ. बोरकर


 मूल्ये - 

 • सौंदर्यदृष्टी, देशप्रेम, संवेदनशीलता, समता, समानता, सौजन्यशीलता.


 → अन्य घटना - 

 • सुप्रसिध्द लेखक, कवी, नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचे निधन - १९०० रमेशचंद्र दत्त यांचा स्मृतिदिन - १९०९. 


 → उपक्रम - 

 • बोरकरांची 'तेथे कर माझे जुळती' ही कविता पाठ करा. बोरकरांची 'महाराष्ट्रातील' कविता अर्थासह जाणून घ्या. 

→ समूहगान - 

• हम भारत की नारी है, फूल नहीं चिनगारी हैं..... 


→ सामान्यज्ञान

 • एव्हर्टन विक्स, फ्रँक वॉरैल व क्लाईड वॉलकॉट हे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे 'तीन डब्ल्यू' म्हणून प्रसिध्द होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाने क्रिकेट मानावर कोणता ना कोणता तरी विक्रम केला आहे. 

 • विविध भाषेतील ज्येष्ठ कवी - संस्कृत - कालीदास; इंग्रजी शेक्सपियर, हिंदी- तुलसीदास, उर्दू - गालिब ; बंगाली - रवींद्रनाथ टागोर, फारसी - शेख, लॅटीन-बर्जिल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा