Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

26 nov

 २६ नोव्हेंबर प्रार्थना

 सृष्टिकर्ता ईश प्यारे,एक हो तुम एक हो...


श्लोक - 

बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर । पंछी को छाया नहीं, फल लागे अतिदूर ।। - संत कबीर कोणाला आपल्या मोठेपणाचा गर्व असेल तर तो व्यर्थ होय. असा मोठेपणा खजुराच्या झाडासारखा असतो. या झाडाची सावली पक्ष्यांना मिळत नाही. शिवाय या झाडाची फळे उंचावर लागत असल्यामुळे ती देखील मिळत नाहीत. 


 

→ चिंतन

- व्यक्तीच्या मनात मूलभूत परिवर्तन घडून येण्यापासूनच शिक्षणाला प्रारंभ होतो. धर्म, पंथ, वाद, कसलेही कारण असो, यासाठी युद्ध माजवणे चुकीचे आहे, ही जाणीव शिक्षणाने निर्माण केली पाहिजे. मनात प्रेम असणे, सत्य शोधून काढण्यासाठी तळमळ वाटते यातच


→ कथाकथन 

- 'सत्यप्रिय मोनिया' - लहानपणी मोहनदास करमचंद गांधींना लोक 'मोनिया' म्हणत असत. प्रेमाने 'मोहन च्या एव जीवनाचे काय होईल म्हणत. मोनियाचे शरीर सुदामासारखे हाडकुळेच होते. ते दुर्बल होते. लहानपणी त्यांना झाडावर चढणे फार आवडीचे वाटे. जवळच एक म मंदिराच्या प्रांगणात पपई, पेरु, आंबे, फणस अशी झाडे होती. मोनिया झाडावर चढून फळे काढी. वडिलांना त्याची भीती झाडावर चढू देत नसत. पण एक दिवस संधी साधून तो झाडावर चढला. योगायोगाने त्याच्या मोठ्या भावाने ते पाहिले आणि पटकन पकडला. दोन थापाही मारल्या. मोनिया रडत रडत आईकडे गेला व म्हणाला, "आई, मला दादाने मारले. मग तूही त्याला मारायचे " म्हणाली. आईने हा सा देताच मोनियाचे रडणे एकदम बंद झाले. तो गंभीर झाला. "आई! हे तु मला सांगतेस ? मी त्याला मारु ? अग 'मोठा भाऊ आहे ना? मोठ्या भावाच्या अंगावर हात टाकायचा?" आई म्हणाली, "अरे! त्यात काय झाले? मुला-मुलाची अशी भाडणे, मरा होतातच. "आई! काय सांगतेस हे मला!" कसली शिकवण देत आहेस. दादा मोठा आहे. भले तो मला मारो पण मी नाही त्याच्यान उगारणार, त्याला नाही मारणार. " गांधी म्हणाले. हे ऐकून आई चकितच झाली. तिने ते वाक्य सहज उद्गारले होते. ती काहीतरी बोल मोनिया पुढे म्हणाला, "आई, जो मला मारतो त्याच्यापासून तू मला का संरक्षण देत नाहीत? लहान भावाला मारु नकोस असं तू त्याला सांगत? उलट मार खाणाऱ्यालाच तू सांगतेस की तूही त्याला मार.. आईचे हृदय भरून आले. आपल्या मुलाच्या निर्मळ बुद्धीचे तिला कौतुक वा तिचे मन अभिमानाने भरुन आले. तिने त्याला आपल्या हृदयाशी घट्ट धरले. "कोणी शिकवला हा शहाणपणा तुला? कोणाला ठाऊक विधार मनात काय आहे?" हाच मोहन पुढे महात्मा बनला. निर्भय बनला. राष्ट्राचा महान नेता बनला. १९१६ साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी ब हिंदू युनिव्हर्सिटीच्या पदवीदान प्रसंगी महात्मा गांधींना आवर्जून आमंत्रण दिले. काठेवाडी फेटा, अंगावर उपरणे, लांब अंगरखा अशा पोशा बनारसला गेले. त्यांना द्वारपालनेही ओळखले नाही. मालवीयाजींना कळवले तेव्हा ते स्वतः सभागृहात घेऊन गेले. डॉक्टर अॅनी अध्यक्ष होत्या. मोठमोठे राजे, महाराजे, सोन्या-मोत्यांचे दागिने घालून वस्त्रालंकारांनी नटून थटून आले होते. गांधीजींना बोलण्याची विनंती क आली. ते हिंदीतून बोलले. त्या काळात ती अपूर्व गोष्ट होती. गांधीजी बॅरिस्टर होते पण वखलंकारविभूषित संस्थानिक इंग्रजांचे आपण गुलाम हे विसरुन आले होते. ते बोलू लागले. "मला हे दृश्य बघवत नाही. संस्थानातील प्रजा अर्ध नम, अर्ध भुक्त, दुःखी, कष्टी आहे. निरक्षर आहे असताना यांना (राजांना) हे दागिने घालण्याचा काय अधिकार आहे? ही संपत्ती प्रजेची ठेव आहे. ही प्रजेच्या कल्याणासाठीच खर्च केली प वापरली पाहिजे." अॅनी बेझंट खवळल्या. त्यांनी भाषण बंद करण्याचा आदेश दिलाअॅनी बेझंट खवळल्या. त्यांनी भाषण बंद करण्याचा आदेश दिला. सभेत खळबळ माजली. आता 'मोनिया' निर्भय झाला होता परमेश्वर मानणारा राष्ट्रपिता झाला होता. भारतमातेनेही त्याला आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लोकमान्यांच्या निधनानंतर राष्ट्रीय सभेची होती लोकांनी दिली. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' अशी त्याची सत्यावर प्रीती आणि भक्ती होती. 


→ सुविचार - 

• 'सत्य आणि सदाचार याहून अधिक श्रेष्ठ धर्म दुसरा नाही.' 


→ दिनविशेष सत्यापरता नाही धर्म । सत्यतेचि परब्रह्म । सत्यापाशी पुरूषोत्तम । सर्व काळ तिष्ठित ।। कवी मुक्तेश्वर 

• राष्ट्रीय छात्रसेना स्थापना दिन - १९४८ - भारतातील शालेय, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्याथ्यांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने २५ नोव्हेंबर १९४८ या दिवसापासून राष्ट्रीय छात्रसेना (एन.सी.सी.) ही योजना सुरु केली. नेतृत्व, क बंधुभाव, खिलाडूवृत्ती, सेवावृत्ती इत्यादी गुणविशेषांचे युवकवर्गाला प्रशिक्षण देणे. राष्ट्रीय आपत्तीकाळात प्रशिक्षित व शिस्तबद्ध अशा युवका साहाय्य मिळविणे ही राष्ट्रीय छात्रसेनेची उद्दिष्टे आहेत. देशात छात्रसेनेची एकूण १६ संचालनालये आहेत. सर्व घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश अखत्यारीत येतात. लेफ्टनंट जनरल या दर्जाचा अधिकारी राष्ट्रीय सेनेचा प्रमुख असतो तर ब्रिगेडियर किंवा तत्सम दर्जाचा अधिकारी हा संचालनालय प्रमुख असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्येष्ठ विभाग, शालेय विद्यार्थ्यांचा कनिष्ठ विभाग व विद्यार्थिनींचा एक विभाग असे छात्रसेनेचे तीन विभा आहेत. सैनिकी प्रशिक्षणाबरोबरच छात्रांना गिर्यारोहण, जलपर्यटन, ग्लायडिंग इत्यादि प्रकारच्या साहसी कामांचे प्रशिक्षण दिले जाते. वृक्षारोपण, गलिच्छ वस्त्यांचे निर्मूलन, प्रौढशिक्षण, संकटग्रस्तांची सेवा इत्यादी सामाजिक कार्यातही छात्र भाग घेतात.


मूल्ये •

 साहस, देशप्रेम, समाजसेवा 

 

"अन्य घटना - 

• सिंधु दुर्गाच्या बांधकामास प्रारंभ १६६४

 • अलाहाबाद उच्चन्यायालयाचे उद्घाटन १८६६ पांडुरंग दामोदर गुणे स्मृतिदि १९२२ 

• दासगणू महाराजांची समाधी १९६२ 

• महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन १९८४ 


→ उपक्रम -

 • आपल्या ऐतिहासिक व आताच्या आरमाराबद्दल माहिती मिळवून सांगा. • शिवरायांची उभारलेल्या सागरी किल्यांची यादी बनव 


→ समूहगान -

 • जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़ियाँ करती हैं बसेरा... 


→ सामान्यज्ञान - 

• महाराष्ट्रातील लष्करी शिक्षण देणाऱ्या काही संस्था • सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय - पुणे. • आर्मी कोअर सेंटर अँड स्कूल अहमदनगर. -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा