Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

27 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

           २७ नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना

 मंगलम तुझे सतत गाऊ दे.... (आदर्श मूल्यशिक्षण) 

 

→ श्लोक –

 पापन्निवारयति योजयते हिताय, गृहां च गृहति गुणान्प्रकटीकरोति । आपद्यतं न चजहाति ददाति काले, सन्मित्रलक्षणमिदं प्रवदन्ति सन्तः ||

  चांगल्या मित्राचे लक्षण सज्जनांनी सांगितले आहे ते असे - सन्मित्र हा आपल्या मित्राला पापाचरणापासून देर ठेवतो व हितकारक गोष्टी करार लावतो. मित्राचे रहस्य गुप्त ठेवतो आणि गुण मात्र जगात प्रकट करतो. आपला मित्र संकटात असताना तो त्याला सोडून जात नाही व योग्य वेळी द्रव्यादिकार मदत करतो. 

 

→ चिंतन-

 शिक्षणाला शुद्ध चारित्र्याची बैठक नसेल तर त्या शिक्षणाची किंमत शून्य आहे. त्या शिक्षणाला सत्यनिष्ठतेचा व शुद्ध भरभक्कम आधार नसेल तर ते कुचकामी ठरेल. आपल्या जीवनातील व्यक्तिगत शुद्धता, पवित्रता याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमचा न होईल, केवळ तुमच्या पंडित्याला काही किंमत नाही. म. गांधी कथाकथन -

  डोळस व आंधळे' - एकदा बादशहा दरबारात आल्यावर नंतर बिरबल आला. त्याने बादशहाला मुजरा केला आणि तो द राहिला. बादशहाने त्याला विचारले, 'बिरबल! या जगात आंधळे जास्त आहे की डोळस?' बिरबलला वाटले आज बादशहाने एकदम अ विचारले. तरीसुद्धा विचार करून बिरबल म्हणाला, 'खाविंद! नक्की आकडा मी आताच सांगू शकत नाही. पण इतकं मात्र खरं की, डोळस लोक आंधळ्या लोकांची संख्या खूपच जास्त आहे.' बादशहा म्हणाला, 'असं तू कशावरुन म्हणतोस?' बिरबल म्हणाला, 'खाविंदांना जर खात्रीच करून असली तर उद्या दाखवतो?' दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबलने काय केले, अत्यंत रहदारीच्या चौकात एक बिन विणलेली बाज मांडली. स्वतः ती विद्य बसला. बिरबलाच्या दोन्ही बाजूंना दोन कारकून वह्या व दौत-लेखण्या घेऊन बसलेले होते. हां हां म्हणता लोकांच्या झुंडीच्या झुंडी तो अजब प्रका पाहण्यासाठी येऊ लागल्या. तेथे येणारा प्रत्येकजण विचारू लागला, 'काय बिरबल, काय चालवलंय हे आज?' जो जो माणूस असा प्रश्न करी त्याचे न बिरबल कारकुनाला एका वहीत लिहावयास सांगे. मधूनच एखादा माणूस विचारी, 'काय बिरबल, आज स्वतःच बाज विणण्यांचे कारण काय?' बिरहर मग असा प्रश्न करणाऱ्यांची नावे दुसऱ्या वहीत लिहावयाससांगे. बिरबल स्वतः बाज विणीत आहे ही बातमी कळताच खुद्द बादशहा तिथे आला नि विचारू लागला, 'हे काय चालवलंय बिरबल?' बिरबल बादशहाला उत्तर न देता कारकुनाला म्हणाला, 'खाविंदाच नाव पहिल्या वहीत लिही.' तो वही पाहात बादशहाने विचारले, 'आंधळ्यांची यादी! अन् त्या यादीत पहिलं माझं नाव!' बिरबल म्हणाला, मी इथं बाज विणतोय हे दिसत असून देखील, ' 'हे काय चालवलंय?" असं विचारणाऱ्यांना आंधळे म्हणायचं नाही तर काय? आ तोच प्रश्न केला म्हणून आपलं नाव आंधळ्यांच्या यादीत घालणं भाग पडलं. ज्यांनी 'बाज आपण आपण स्वतः विणता?' असा प्रश्न केला त्यांची डोळस माणसांच्या यादीत आहेत.' दुसऱ्या वहीचे पहिले पानही नावं लिहून संपले नव्हते. बिरबलने विचारले. 'आता तरी खाविंदांना खात्री झाली ना की डोळस लोकांपेक्षा आंधळ्यांची संख्या खूपच मोठी आहे ते!'सुविचार

 • कोणी करणे किवा वैर करणे म्हणजे आपला विकास थांबवून ठेवणे. • आकाशातील तळपता तारा होणे कदाचित शक्य नसेल पण अंगणातील दिवा होऊन भोवतालचा परिसर उजाळणे मात्र मुळीच अशक्य नाही.. *साठी छाती पुढे केल्याशिवाय मुकुटासाठी मस्तक पुढे करता येत नाही. •बुद्धी, भावना यांचा समन्वय म्हणजे विवेक 

 

→ दिनविशेष

 • मोरया गोसावी यांनी समाधी घेतली १४६१. मोरया गोसावी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गणेशभक्ता - वारसा त्यांच्या महिलांकडून मिळाला. वामन भट्ट शाळिग्राम हे आपल्या उतारवयात मोरगाव येथे स्थायिक झाले. येथील (गणेशाच्य कृपेमुळे त्यांना पुत्र झाला. या श्रद्धेमुळे त्यांनी मुलांचे नाव मोरया ठेवले. लहानपणीच वेदाध्ययन पूर्ण करून मोरयाने बेऊरला जाऊन तपश्चर्या केली त्यांना गणेशाचा साक्षात्कार झाला. तेव्हापासून ते 'मोरया गोसावी' बनले. आईवडिलांच्या निधनानंतर पुण्याजवळील चिंचवड येथे पवना नदी काठी राहू लागले. त्यांनी गणपतीविषयी अनेक प्रासादिक पदांची रचना केली आहे. २७ नोव्हेंबर १४६१ या दिवशी चिंचवड येथे समाधी घेतली. पुढे त्यांच्या मुलाने समाधीवर मंदिर उभारले. 


→ मूल्ये

 साहित्यप्रेम श्रद्धा 


→ अन्य घटना 

• हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांचा जन्म - १९०७ ग. त्र्यं. माडखोलकर स्मृतिदिन १९७६ 


 → उपक्रम 

• मोरया गोसावींचे चरित्र माहीत करुन घ्यावे

. • आवडल्या गायकांची माहिती सांगा.


 

 

→ समूहगान 

बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या....

 


→ सामान्यज्ञान

  • पृथ्वीवर खारे पाणी, गोडे पाणी, बर्फ बाप्प आणि भूजल मिळून एकूण २ अब्ज ३६ कोटी घन किलोमीटर्स इतके पाणी असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. यापैकी ८२ लक्ष घन किलोमीटर्स इतके पाणी भूजल या स्वरूपात असून वातावरणामध्ये वाप्पाच्य रुपाने १३ हजार घन किलोमीटर्स पाणी सतत असते. • जलवाहतूक हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे. जगभर पुरातन काळापासून जलवाहतूक चालते. या वाहतुकीस वेळ थोडा जास्त लागतो. परंतु कमी येतो. याच कारणाने अमेरिकेने प्रचंड असा पनामा कालवा काढला.

 • एका मोठ्या ट्रकमध्ये दहा टन माल भरता येतो. रेल्वेच्या एका वाघिणीत बारा टन माल भरता येतो. रेल्वेच्या मालगाडीला पन्नास ते एकवीस असतात. रेल्वेतून चौदाशे टन माल पाठविता येतो. तर सामान्य आकाराचे जहाज एकावेळेस पन्नास ते साठ हजार टन वाहतूक करू शकते. मोठे लाख टनापर्यंत माल वाहून नेऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा