Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

17 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 16 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

प्रार्थना- 

राम रहीम को भजनेवाले, तेरे है बंदे ख़ुदा या... 


→ श्लोक

 - अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति । व्ययतो वृध्दिमायाति क्षयमायाति संचयातू ।। जय जिजाऊ हे विद्यादेवी (भारती), तुझा हा विद्यारुपी खजिना (कोश) खर्च केला तर वाढतो व त्याचा संचय करून ठेवला तर मात्र नाश पावतो. → चिंतन 

 - बुध्दी ही दोषशोधक आहे आणि ती दाराशी राहून सतत पहारा करते. - महात्मा गांधी (यंग इंडिया दि. १४-१०-१९२६) बुध्दी एकदा विकसित झाली की ती आपोआप काम करू लागते, आणि हृदय जर निकोप असेल तर भ्रामक किंवा अनैतिक जे असेल त्याचा इन्कार करते. वैज्ञानिक शोधांची उपयुक्तता किंवा त्यातीत बुध्दिवैभव कोणीच नाकबूल करीत नाही. बुध्दीला दडपून टाकावे, असे मी कदापि मानीत नाही ज्यायोगे खुद्द बुध्दीचं पवित्र, शुध्द होते त्या वस्तूला, श्रध्देला योग्य मान द्या, असे माझे म्हणणे आहे. - - महात्मा गांधी. 

 

→ कथाकथन 

 स्वामी रामतीर्थ (जन्म - २२ ऑक्टो. १८७३ - मृत्यू १७ ऑक्टो. १९०६) - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्त्वचिंतक व अध्यात्मातील - स्वामी रामतीर्थ यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील मुरलीवाला (जिल्हा गुजराणवाला) या गावी झाला. त्यांचे मूळ नाव तीर्थराम तर त्यांच्या वडिलांचे नाव हिरानंद गोस्वामी असे होते. ते संत तुलसीदासांचे वंशज असल्याने भोवतालचा हिंदू समाज त्यांना अतिशय मान देई. तीर्थरामाची आई त्यांच्या बालपणीच वारली. त्यावेळेच्या रूढीनुसार त्यांचे वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झाले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे अनेक अडीअडणींना तोंड देत त्यांना शिक्षण घ्यावे लागले. तरीही लाहोरच्या मिशन कॉलेजमधून ते गणित विषय घेऊन प्रथम क्रमांकाने एम्.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्याच कॉलेजात गणिताचे प्राध्यापक झाले.बालपणी त्यांना रामकृष्ण परमंहसाचे शिष्य धन्नाराम भगत यांचा सहवास घडल्यापासून त्यांचे चित्त ईश्वरभक्तीत रंगू लागले. त्यातून पुढे द्वारकापीठाचे शंकराचार्य श्री राजराजेश्वतीर्थ यांची ब्रह्मसूत्रे व उपनिषदे यावरील प्रवचने आणि स्वामी विवेकानंदांची धर्मपर भाषणे ऐकल्यापासून तर त्यांना आध्यात्मिक आत्मोन्नतीचा ध्यास लागला. त्यामुळे ग्लर होण्यासाठी लंडनला जायला शिष्यवृत्ती मिळत असतानाही त्यांनी ती संधी व प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि संन्यास घेऊन व 'रामतीर्थ' हे नाव धारण करून अध्यात्मिक साधनेसाठी हिमालयाची वाट धरली. हिमालयात त्यांनी काही वर्षे त्या साधनेत घालविली. पण पुढे अनासक्त वृत्तीने राहून परोपकार करण्यात व धर्मग्रंथाचा अभ्यास करण्यात ते कालक्रमणा करू लागले. त्यानंतर टोकियोला आंतरराष्ट्रीय सर्वधर्म परिषद भरणार असल्याचे कळल्यावरून टेहरीच्या महाराजांच्या आग्रहाखातर ते १९०२ साली जपानला गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना ती बातमी चुकीची असल्याचे आढळून आले. तरीही निराश न होता त्यांनी जपानमध्ये अनेक शहरात वेदांतावर व्याख्याने दिली व ती लोकांना अतिशय आवडली. त्यानंतर ते अमेरिकेला गेले. तिथेही त्यांच्या व्याख्यानांचे विवेकानदांच्या व्याख्यानाप्रमाणेच स्वागत व कौतुक झाले. त्यांची गोरीपान व देखणी मूर्ती आणि त्यांचे इंग्लिश भाषेवरील प्रभुत्व यामुळे अमेरिकनांना तर ते त्यांच्यापैकीच वाटू लागले. त्या दोन देशांनी त्यांचे अपार कौतुक केल्यामुळे भारतीयांना त्यांची किंमत कळली व ते मायदेशी परत आल्यावर सामान्यांप्रमाणे बरीच बडी-बडी मंडळीही त्यांच्या शिष्यांत सामील झाली. कशाचाच मोह नको म्हणून त्यांनी प्रसिध्द करण्यासाठी लिहिलेले अनेक ग्रंथ गंगार्पण केले. एकदा गंगेत स्नानाला गेले असता ते भोवऱ्यात सापडले व क्याच्या तेहतिसाव्या वर्षी कालवश झाले. त्यांची काही भाषणे पुढे त्यांच्या शिष्यांनी प्रसिध्द केली.


 → सुविचार 

 • सर्व धर्मातून चांगले ते घ्यावे हाच मार्ग श्रेयस्कर व ईश्वरसंमत होय. • जीवन किती वर्षे जगला ह्याला फारसे महत्व नाही तर जीवन कसे जगला याला महत्व आहे. • कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली की, अद्भुत कार्ये घडतात.


 → दिनविशेष -

  • दादोबा पांडुरंग यांचा स्मृतिदिन - १८८२ : गेली हजार वर्षे जरी मराठी भाषा लोकव्यवहारात अस्तित्वात असली तरी त्या भाषेला स्वतःचे स्वतंत्र आणि नियमबध्द व्याकरण १९ व्या शतकापर्यंत अस्तित्वात नव्हते. भाषेचे सखोल आणि शास्त्रशुध्द असे पायाभूत व्याकरण करावे ही जाणीव प्रथम दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना झाली, दोन वर्षे अतिशय परिश्रम घेऊन वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' हा ग्रंथ १८३५ मध्ये प्रथम प्रकाशित केला. त्यांचे लघुव्याकरण हे पुस्तक महाराष्ट्रातील शाळांमध्ये ७०/८० वर्षे अखंडपणे अभ्यासले गेले. लोकहितवादींनी त्यांना 'मराठीचे पाणिनी' अशी पदवी दिली. वसईजवळ तखंड येथे दोदोबा पांडुरंगाचा जन्म १८१४ सालच्या मे महिन्यात झाला. | हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी इंग्रजांनी काढलेल्या पहिल्या शाळेचे विद्यार्थी होण्याचा मान दादोबांना मिळाला. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. जबाबदारीच्या अनेक जागांवर अधिकारी म्हणून काम केलेल्या दादोबांनी मराठीत इतरही उपयुक्त ग्रंथ लिहिले. 


मूल्ये 

-• अभ्यासूवृत्ती


अन्य घटना

  • सुप्रसिध्द गायक, संगीतकार, गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचा जन्म - १८६९.

 • स्वामी रामतीर्थ स्मृतिदिन - १९०६. 

 • जहागीर आर्ट गॅलरी उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करणारे प्रसिध्द उद्योगपती कावसजी जहागीर यांचे निधन - १९६२. 


→ उपक्रम

• दादोबा पांडुरंगाबद्दल अधिक माहिती मिळवा. 


→ समूहगान -

• हा देश माझा याचे भान, जरासे राहू द्यारे 


→ सामान्यज्ञान -

 • आशिया खंडात बांबूच्या सर्वात जास्त जाती आढळतात. त्यातही आग्नेय आशिया, भारतीय उपखंडात अनेक जाती आढळतात. आफ्रिका खंडात काही मोजक्या जाती तर ऑस्ट्रेलिया व अमेरिका खंडात अगदी कमी जाती आहेत. • डुक्कर - डुकरांचा उपयोग प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी होत असला; तरी त्यांच्यापासून अनेक उपपदार्थ मिळतात. डुकराच्या मांसाला पोर्क म्हणतात. त्याच्या मान व पाठ यावरील केस रंगाचे ब्रश करण्यासाठी वापरतात. खाण्याचे तेल, वंगण तेल, मेणबत्या, साबण व इतर अनेक उद्योगात त्याची चरबी वापरली जाते. काही ग्रंथींचा औषधांसाठी, तर खुरांचा औद्योगिक तेल काढण्यासाठी उपयोग होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा