१३ ऑक्टोवर
प्रार्थना
नमस्कार माझा ज्ञानमंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरा -
→श्लोक
ॐ सहनावत् । सहनौ भुनक्तु । सहवीर्यकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शांतिः शांतिः शांतिः
॥ १३ ऑक्टोवर वार: आम्ही सारे एकोप्याने राहून आमचे रक्षण करू, एका भोजन करू, एकजुटीने पराक्रम गाजवू, आमचे अध्ययन आम्हाला तेजस्वी बनवो. आमचेकडून कधीही एकमेकांचा द्वेष न पडो. सर्व शांतीचे अधिराज्य येवो..
→ चिंतन
मुलाबद्दल खरोखर प्रेम असेल तर त्याला आपल्या डोळ्यांनी पाहू दे. आपल्या कानांनी ऐकू दे, आपले शब्द बोलू दे, आपल्या - चालू दे, आपल्या मनाने अनुभव घेऊ दे, आपल्या हातांनी काही करू दे, आपल्याला मुलांचे पोपट बनविण्याची घाई असते. आपल्या अतुम महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी परमेश्वर मुले पाठवितो अशी आपली समजूत असते काय न कळे - रवीद्रनाथ टागोर
→ कथाकथन
- 'सुवर्णपात्राचा मानकरी' एक देवळाच्या आवारात आकाशातून सोन्याचा एक तांब्या पडला. त्यावर लिहिले होत खल्या ईश्वरभक्तानेच हे सुवर्णपात्र घेऊन जावे.' मग काय विचारता? सोन्याचा तो जाडजूड तांब्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी, स्वत ला खरा ईश्वरभक्त म्हणवून घेणान्यांची नुसती झुंबड उडाली. एक मनुष्य पुढे होऊन म्हणाला, "मी आठवड्यातून चार-पाच उपवास करतो. साहजिकच माझ्यासारखा ईश्वरभक्त दुसरा कोण असेल? तेव्हा तो सोन्याचा तांब्या मीच घेतो." असे बोलून त्याने तो तांब्या उचलला, पण त्याने तो उचलताच तो तांब्या लोखंडाचा झाला. मग तो तांब्या होता तिथे ठेवून तो मनुष्य बाजूला झाला. त्याबरोबर तो तांब्या पूर्ववत सोन्याचा झाला. दुसरा एक मनुष्य पुढे सरस्यवाला व म्हणाला. "दिवसातले तीन-चार तास मी पूजेअर्चेत घालवतो. तेव्हा या सुवर्णपात्राचा खरा मानकरी मीच आहे. असे म्हणून त्याने त्या सोन्याच्या ब्याला स्पर्श केला न केला, तोच तो तांच्या पुन्हा लोखंडाचा झाला. त्याबरोबर तो मनुष्य बाजूला झाला आणि आश्चर्य असे की, तो तांब्या पूर्ववत् सोन्याचा झाला. त्यानंतर कुणी आपण केलेल्या जपजाप्याचे, कुणी आपण केलेल्या तीर्थयात्रांचे, तर कुणी धर्मग्रंथांच्या पारायणांचे डांगोरे पिटले व ते तो सोन्याचा तांब्या उचलायला गेले, पण प्रत्येक वेळी पूर्वीचेच आक्रीत घडले. त्याच गावात परिस्थितीने असातसांच असलेला एक परोपकारी मनुष्य होता. तो रंजल्या-गांजलेल्या मदत करी. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके घेऊन देई व भाकड झाल्यामुळे मालकांनी सोडून दिलेल्या गुरांना चारापाणी घाली. तो निराधार व आजारी असलेल्या एका वृध्द माणसाला घेऊन त्या देवळावरून जाणाऱ्या वाटेनेच वैद्याकडे चालला होता. त्या सोन्याच्या तांच्याभोवती जमलेल्या गर्दीतील एका माणसाने त्या परोपकारी माणसाला हाक मारून त्याला तो तांब्या उचलण्यास सांगितले. त्याने त्याच्या आग्रहास्तव ते सुवर्णपात्र उचलताच ते लोखंडाचे न होता सुवर्णाचे राहिले. तो चमत्कार पाहून ते पात्र मिळण्यास अपात्र ठरलेले लोक त्या देवळातील गाभान्यामध्ये असलेल्या विष्णूच्या मूर्तीकडे पाहून म्हणू लागले 'देवा' अरे किती अन्यायी आहेस तू । ज्या आम्ही पूजाअर्चा, उपवासतापास, जपजाप्य, तीर्थयात्रा, पारायणे केली, त्या आम्हाला तू अभक्त ठरविलेस आणि ज्याने यापैकी एकही गोष्ट केली नाही. त्या माणसाला तू 'खरा ईश्वर भक्त' ठरवून या सुवर्णपात्राचा मानकरी बनवलेस?" तेवढ्यात त्या देवळाच्या गाभाऱ्यातून दिव्य अशा आवाजात शब्द बाहेर पडले 'बाबांनो । तुम्हाला मी अभक्त ठरविले नाही. पण तुम्ही जरी माझी भक्ती केलीत, तरी या भूलोक जी माझी गरीब, अडाणी, रंजलीगांजलेली लेकरे आहेत, त्यांच्याकडे पाठ फिरविलीत. या परोपकारी माणसाने मला तीर्थक्षेत्री, देवळात वा देव्हाऱ्यात न पाहता पिडल्यानडलेल्या लोकात पाहिले आणि त्यांच्या सेवेसाठी स्वतःचे जीवन अर्पण केले, म्हणून मी त्याला 'खरा (भक्त' 'मानून त्या सुवर्णपात्राचा मानकरी बनविले. ती देववाणी ऐकताच त्या गर्दीतील बऱ्याच जणांनी त्या परोपकारी मनुष्याचा जयजयकार केला. पण तिथे न थांबता तो मनुष्य बरोबर असलेल्या निराधार वृध्द माणसाला वैद्याकडे घेऊन गेला. पुढे त्या माणसाने ते मौल्यवान सुवर्णपात्र मोठ्या किंमतीला विकले आणि आलेल्या रकमेतून गरिबांसाठी एक मोफत वैद्यकीय उपचार केंद्र सुरू केले.
→ सुविचार (-• मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते. • जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केलीत तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील- रवींद्रनाथ टागोर. • प्रत्येक सत्यकृत्य हे दानधर्मच आहे. • कमला भिणाऱ्या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरूंनी मरावं. • कर्तव्याची प्रीती ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ती होय. • कर्तव्याची प्रीती ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ती होय.
→ दिनविशेष
• भगिनी निवेदिता स्मृतिदिन - १९११ : स्वामी विवेकानंदानी १९ सप्टेंबर १८६३ या दिवशी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माची सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता सर्व जगाला पटवून दिली. साऱ्या मानवजातीसाठी एकाच विश्वधर्माची आवश्यकता त्यांनी पटवून दिली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन जन्माने आयरिश असलेली एक आंग्ल तरूणी त्यांची शिष्या झाली. तिचे वडील ख्रिश्चन धर्मप्रसारक असूनही तिने अमेरिकेतून भारतात येऊन हिंदू धर्म स्वीकारला. श्रीरामकृष्ण परमहंसाच्या पत्नी शारदामाता यांच्या सहवासात हिंदू धर्म, चालीरिती, आचारविचार समजावून घेऊन अंगी बाणविले. २९ मार्च १८८९ रोजी ब्रह्मचारिणी दीक्षा घेतली. संपूर्ण आयुष्य भारत देशातील दीनदुबळ्यांच्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा