Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

11 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 ११ ऑक्टोबर



प्रार्थना -

 ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम...

श्लोक -

 अव्यापारेषु व्यापारं यो नरः कर्तुमिच्छति । स तत्र निधनं याति कीलोत्पाटीव वानरः ।। 

 आपला काहीही संबंध नसलेल्या कामात लुडबूड करणाराचा नाश, कापीत असलेल्या लाकडातील पाचर उपटून काढणाऱ्या वानराप्रमाणे होतो. 

 

. → चिंतन - होईल जीवनाची उन्नती । ज्ञानविज्ञानाची प्रगती । ऐसीच असावी ग्रंथ संपत्ती । गावोगावी - संत तुकडोजी महाराज गावागावातून ग्रंथालये असणे आवश्यक आहे. ग्रंथ हे माणसाचे गुरु होते. ग्रंथ हे माणसाला मार्ग दाखविणारे असतात. ग्रंथ हे मित्रासारखे उपयुक्त, आनंददायी असतात. सर्व काळ, सुख, दुःख, निराशा यात ग्रंथ साथ देतात. ग्रंथाद्वारे ज्ञानविज्ञानाची नवी कवाडे खुली होतात. नवीन ज्ञान मिळविण्याचा मार्ग खुला होतो. जीवनात प्रगती साधता येते.


→ कथाकथन 

- संत तुकडोजी महाराज - आधुनिक महाराष्ट्रातील एक समाजसुधारक, संत व कवी तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर असे होते. त्यांचा जन्म विदर्भातील यावली (जिल्हा अमरावती) या गावी झाला. ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने माणिकवर भजनापूजनाचेसंस्कार बालपणीच झाले. शालेय शिक्षणात त्यांचे मन रमेना म्हणून इयत्ता तिसरीची परीक्षा उत्तीर्ण होताच शाळेला रामराम ठोकून आजोळच्या वरखेड गावी गेले. तिथे त्यांना आडकुजी महाराज भेटले, माणिकने त्यांना आपले गुरु मानले आणि ते त्यांच्या सेवेत कालक्रमणा करू लागले. माणिक यांना शिक्षण कमी असले तरी बुद्धी व विचारशक्ती चांगली होती. शिवाय पद्यरचनेसाठी | नागणारी प्रतिभाही त्यांना लाभली होती. ते मराठी व हिंदी पदे फार छान रचीत व गुरूपुढे गाऊन दाखवीत. एकदा दूर उभ्या असलेल्या आपल्या । | शिष्याला माणिक या नावाने हाक न मारता गुरुंनी तुकड्या अशी हाक मारली. तेव्हापासून हे गुरुप्रसादाचे चिन्ह म्हणून ते त्या नावाचा आपल्या प्रत्येक पदाच्या शेवटच्या चरणात मुद्रा म्हणून वापर करू लागले. ते आपल्या पदांतून, भजनांतून व कीर्तनांतून जातिभेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत. प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरूस्मरण व अंधश्रध्दा, वाईट रूढी, व्यसने यांचा त्याग करा अशा आशयाचे थोडा वेळा भाषण केले की, हातातल्या खंजिरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाड़ी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी, हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होऊन जाई, सर्व पंथाचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले व त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी या नावाने संबोधू लागले. सन १९३० च्या सत्याग्रहात त्याचप्रमाणे १९४२ च्या भारत छोडो चळवळीत भाग घेऊन त्यांनी कारावास भोगला. म. गांधी, राजेंद्रबाबू, पं. नेहरू, मौलाना आझाद आदि राष्ट्रनेत्यांबरोबर त्यांचा चांगला परिचय झाला होता. त्यांनी गुलझारीलाल नंदा यांच्याबरोबर ' भारत सेवक समाजा' चे काही काळ कार्य केले. स्वांतत्र्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला अस्पृश्योध्दार, जातिनिर्मूलन व भूदान चळवळ या कार्याला वाहून घेतले. सन १९५५ मध्ये ते विश्वशांती परिषदेसाठी जपानला गेले. ते कुठल्याही राजकीय पक्षात नव्हते. १९६६ साली प्रयाग येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे त्यांना अध्यक्षपद देण्यात आले. 'माणसाने ईश्वरभक्ती करता करता आत्मोध्दार व दीनदुबळ्यांचाही उद्धार करावा.' हीच त्यांची मुख्य जीवननिष्ठा होती. अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावी असलेल्या त्यांच्या आश्रमात त्यांना मृत्यू आला. तिथे त्यांची समाधी असून त्या आश्रमातर्फे अनेक समाजपयोगी कामे चाललेली असतात. 



→ सुविचार -• सर्वापरि समभाव । सर्वांभूती वासुदेव । हे जाणी तोचि खरा मानव । सत्यधर्म हाचि त्याचा - तुकडोजी महाराज.आपली साधावी उन्नती । सौख द्यावे इतरांप्रती । या उद्देश जी जी संस्कृती । धर्म म्हणावे तिजलागी संत तुकडोजी | 



→ दिनविशेष 

लोकनायक जयप्रकाश नारायण जन्मदिन - १९०२ : भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण 

आकले. बिहारच्या सारन जिल्हयातील सिताबदियार येथे जन्म. तेथेच प्राथमिक व पाटणा येथे माध्यमिक शिक्षण, १९२२ मध्ये अमेरिकेस विस्कॉन्सिन विद्यापीठाची एम.ए. पदवी घेऊन १९२९ मध्ये भारतात परत. भारतात आल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सत्याग्रह चळवळीच्या दुसन्या | पर्वात त्यांनी चळवळीची सूत्रे सांभाळली. दुसऱ्या महायुध्दात त्यांनी युध्दविरोधाचे व स्वातंत्र्यलढा उग्र करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे तुरुंगवास १९४२ च्या सुरुवातीस तुरुगांतून फरारी होऊन ते भूमिगत चळवळीचे नेतृत्व करू लागले. पण १९४३ मध्ये त्यांना पकडण्यात आले. १९४८ मध्ये | समाजवादी पक्षाची स्थापना करून काँग्रेसला पर्यायी पक्ष निर्माण केला. १९५२ मध्ये प्रजासमाजवादी पक्षाची स्थापना केली. १९५३ नंतर विनोबाजींच्या भूदान आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली व सक्रीय राजकारणातून अंग काढून घेऊन ते सर्वोदयी कार्यकर्ते झाले. १९७२ मध्ये मध्यप्रदेशातील अट्टल दरोडेखोरांनी जयप्रकाशांच्या विनंतीवरून भारत सरकारपुढे शरणागती पत्करली. देशात आणीबाणी जाहीर झाली त्यावेळी काही काळ ते स्थानबध्द होते. नंतर त्यांची सुटका झाली. असा हा थोर आणि झुंजार देशभक्त ८ ऑक्टोबर १९७९ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.


 * मूल्ये 

 * • राष्ट्रप्रेम, संवेदनशीलता. - 


→ अन्य घटना 

• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन - १९६८. कॉम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर जन्म- १९४६. 


→ उपक्रम 

• जयप्रकाश व त्यांच्या पत्नी प्रभावती यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवून वर्गात सांगा. • ग्रामगीता वाचा व तसे आचरण करा. 


→ समूहगान 

• मंगल देशा ! पवित्र देशा !! महाराष्ट्र देशा !!! 

→ सामान्यज्ञान

 १- • माणिक नावाच्या एका पोरक्या लहान मुलाला वन्हाडातील संत अडकुजी महाराज यांनी सांभाळले, मोठे केले, तुकड्या हे नाव | दिले. गावोगावी भजनांतून समाजजागृती करणारा हा मुलगा पुढे तुकडोजी महाराज झाला. हरिनामाइतकाच राष्ट्रभक्ती, सामाजिक एकता यावर भर असे. समाजातील अनिष्ट रूढींवर ते कोरडे ओढीत. ब्रिटिशांच्या अन्याया विरूध्द जनमत जागृत करीत. खंजिरीच्या साथीने पहाड़ी त्यांच्या भजनाने जनमानसावर विलक्षण प्रभाव पडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा