२९ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
मंगलमय चरणि तुझ्या विनंति हीच देवा....
→श्लोक
अतिथीः बालकः पत्नी जननी जनकस्तथा । पंचैते गृहिणः पोठ्या इतरेव स्वशक्तितः ॥ वार पाहुणा, बालक, पत्नी, आई आणि वडील या पार्थींचे भरणपोषण गृहस्थाने करायलाच हवे. बाकीच्या आपल्या शक्य होईल तेवढे करावे.
→ चिंतन
मनुष्याच्या अंगी खरी योग्यता असेल व लोकांच्या कल्याणाबद्दल त्याला खरी कळकळ वाटत असेल तर लोकांच्या रागाची पहिली लाट निघून गेल्यावर ते त्याच्या बोलण्याचा शांतपणे विचार करू लागतात. आगरकर.
→कथाकथन '
मित्रस्नेह' पूर्वी चैतन्यप्रभु नावाचे महान सत्पुरुष होते. लहानपणी गुरुच्या घरी विविध शास्त्रांचे अध्ययन करणाऱ्या त्यांचा रघुनाथ वाचा सहाध्यायी (मित्र) होता. दोघांनाही न्यायशास्त्र अतिशय आवडत असे. दोघांनीही अत्यंत कठीण अशा न्यायशास्त्रात प्रावीण्य मिळविले होते. परंतु श्री न्यायशास्त्रावर अशा प्रकारचा ग्रंथ लिहीन की, ज्यामुळे मी अद्वितीय विद्वान होईन' अशी रघुनाथाची महत्त्वाकांक्षा होती. नंतर अध्ययन समाप्त झाल्यावर दोघेही मित्र स्वतःच्या घरी परत आले. रघुनाथाने न्यायशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले आणि स्वतःच्या वक्तृत्वामुळे विविध शास्त्रसभा जिंकल्या. विवानांनी दाखविलेल्या आदरामुळे आणि अनेक राजांनी आदरसत्कार केलेल्या त्याच्या कीर्तीचा सुगंध दशदिशांना पसरला. वेगळ्या स्वभावाचे चैतन्यमहाप्रभु मात्र ईश्वरचिंतनात मग्न होते. कितीतरी वर्षे होऊन गेली. दोघा मित्रांना परस्परांचे दर्शनसुद्धा झाले नव्हते. एकदा दुसऱ्या गावी जाण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर नावेची प्रतीक्षा करणाऱ्या रघुनाथ पंडिताला चैतन्यमहाप्रभूंना अचानक पाहून अतिशय आनंद आता एकाच नावेतून जाणारे ते दोघे संभाषणात (बोलण्यात मग्न झाले. कुशल चौकशीनंतर चैतन्यमहाप्रभू रघुनाथाला म्हणाले, "अरे मित्रा, पहा, न्यायशास्त्र या विषयावर मी हा ग्रंथ रचला आहे." रघुनाथ पंडितांनी कुतूहलाने तो ग्रंथ वाचण्यास आरंभ केला. ग्रंथ वाचल्यानंतर त्यांचा चेहरा उदास झाला. गप्प बसलेल्या त्यांना चैतन्यमहाप्रभूने विचारले, "अरे मित्रा, काय झाले? तुला माझा ग्रंथ आवडला नाही का? तुझ्या मुखावर ही खिन्नता कशासाठी" रघुनाथ पंडिताने सांगितले "हे मित्रा, मी सुद्धा न्यायशास्त्राला उद्देशून एक ग्रंथ लिहिलेला आहे. तो माझा ग्रंथ लोकांमध्ये अतुलनीय व्हावा अशी माझी आकांक्षा (इच्छा) होती, परंतु तुझा ग्रंथ वाचून कोणीही माझा ग्रंथ वाचण्याची इच्छा करणार नाही. माझे परिश्रम व्यर्थ झाले आणि इच्छा लुप्त झाली. या विचाराने मी दुःखी झालो आहे." मी ज्यावेळी रघुनाथ पंडिताचे बोलणे चैतन्यमहाप्रभुंच्या कानावर आले तेव्हा चैतन्यमहाप्रभु मृदुवाणीने म्हणाले, “अरे मित्रा, तुझे दुःख क्षणभरसुद्धा सहन करू शकत नाही. ते दूर करण्यासाठी मी प्राणांतीसुद्धा (प्राणाच्या मोबदल्यातही) प्रयत्न करेन. तुझ्या दुःखाचे कारण बनलेला हा ग्रंथ मी नदीच्या प्रवाहात फेकतो, आणि दुःखाचे कारणच नष्ट करतो. कारण नष्ट झाल्यावर कार्याची उत्पत्ती कशी होईल? तुझाच ग्रंथ विद्वानांमध्ये मान्य होवो." असे म्हणून, "असे करू नकोस." असे रघुनाथपंडित म्हणत असताना चैतन्याने तो ग्रंथ ताबडतोब नदीच्या पात्रात फेकून दिला. काय हा त्याग! काय है। चैतन्यमहाप्रभूंचे मित्रप्रेम!
→ सुविचार
• 'मित्राची परीक्षा आपल्या संकटकाळातच होते.'
→ दिनविशेष -
• हमीद दलवाई जन्मदिन - १९३२. चिपळूण येथे एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात हमीद दलवाईंचा जन्म झाला. हा युवक जोतीबा फुले, आगरकर, राममनोहर लोहिया यांचा वारसा सांगणारा आणि त्यांच्याच वाटेवरून पावले टाकणारा निघाला. अत्यंत अडाणी आणि मागासलेल्या कट्टर मुसलमान बांधवांना सुधारण्याचे कंकण त्याने हाती बांधले. या सुधारणांना त्यांना प्राणघातक विरोध झाला. प्राणघातक हल्ले झाले. प्रकृतीने साथ दिली नाही. पण कोणतेही संकट त्याला परावृत्त करू शकले नाही. १९७१ मध्ये अखिल भारतीय पुरोगामी मुसलमानांची भव्य परिषद त्याने भरविली. कोल्हापुरात मुस्लिम स्त्रियांसाठी शैक्षणिक परिषद भरविली. तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांचे मोर्चे घेऊन थेट राष्ट्रपतींपर्यंत धडक घेतली. १९७० मध्ये मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली व त्याद्वारे मुस्लिम समाज सुधारणेचे व्रत चिकाटीने चालू ठेवले. आजही त्यांचे अनुयायी त्यांच्या प्रेरणेने मुस्लिम समाजजागृतीचे काम मोठ्या चिकाटीने करीत आहेत. ३ मे १९७७ रोजी वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. जगातल्या आणि भारतातल्या मुस्लिम बांधांचा एक सच्चा मित्र हरपला.
→मूल्ये
समाजजागृती, विश्वबंधुत्व
→ अन्य घटना
सर सेनापती हरजी राजे महाडीक स्मृतीदिन. बाळकृष्ण गणेश ऊर्फ बाबासाहेब खापर्डे निधन १९०८
→ उपक्रम
• हमीद दलवाईच्या चरित्रावर निबंध लिहा. मुस्लिम समाजसुधारकांची माहिती मिळवा.
→ समूहगान
• पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड लगाके देखो ना....
→ सामान्यज्ञान
• सायकल १८२० मध्ये प्रथम वापरात आली. तेव्हाची सायकल म्हणजे दोन लाकडी चाके एका आडव्या लाकडी दांड्याने जोडलेली असे. या लाकडी दांड्यावर दोन्ही पाय बाजूला टाकून बसायचे आणि पायाने जमीन मागे रेटीत पुढे गाडी हाकलायची. या आध सायकलीपासून स्थित्यंतरे होत होत आजची वजनाला हलकी व वेगवान सायकल तयार झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा