Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

26 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

             २६ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 

→ प्रार्थना

  सृष्टिकर्ता इस प्यारे, एक हो तुम एक हो....

→श्लोक 

द्रव्यास हे गमनमार्ग यशावकाश । की दान, भोग अथवा तिसरा विनाश । जो येथे ज्ञान आणि भोग करी न देही । त्याच्या धनासि मग केवळ नाश पाही ॥ दान देणे, उपभोग घेणे किंवा नष्ट होणे हे संपत्तीचे तीन मार्ग आहेत. जो मनुष्य धनाचे दान करीत नाही किंवा उपभोगही घेत नाही, धन तिसन्या मार्गानेच जाते. (नष्ट होते.)

→ चिंतन

 ज्याने जो धंदा पत्करला त्याने त्याबद्दल दुसरे काय म्हणतात या विषयी फारसा विचार करीत बसता कामा नये, त्या धंद्यापासून दुसऱ्याचे ह आहे. एवढी पक्की खात्री होऊन गेली असली म्हणजे लोकापवादी चर्चा न करता तो त्याने बेलाशक चालविला पाहिजे. - आगरकर

 →कथाकथन

  - 'एकाच मातेची लेकरे'  

- एक होता महर्षी. आश्रमशाळा होती. आश्रमशाळा होती. आश्रमात शेती बागायत होती. एकदा फिरत फिरत तो आपल्या बागेत आला. बागेत मोठमोठाले भोपळे लागले होते. कपीने पाहिले व त्याला मोठे आश्चर्य वाटले. भोपळ्यांमध्ये मोठे झगडा-भांडण चालू होते सारे भोपळे वावातावाने भांडत होते. महर्षीणाले, 'अरे हे तुमचं चाललं आहे काय? आपसात भांडता काय?' भोपळ्यांत दोन गट पडले होते. “मारामारी काली करता? एकमेकांवर प्रेम करा." "हे शक्यच नाही. 'दोन दुष्मन एकमेकांवर प्रेम करूच शकत नाहीत.' 'हे प्रेम कसं करायचं?' एका भोपळ्यात विचारले. "शांत बसा व ध्यान, चिंतन करा. " गुरू म्हणाले, 'आश्रमात पहा. सारे भिक्षु कसे शांत बसले आहेत." भिक्षूंची डोकी गोल गरगरीत केसविरहित भोपळ्यांसारखीच दिसत होती. "तुम्ही त्यांच्यासारखे बसा. निःस्तब्ध" तेव्हा प्रथम भोपळे पोटभर हसले. भांडण विसरून शांत झाले. यापूर्व गुरुजींनी हे कधीच सांगितले नव्हते. आज सांगितले आहे. पाहू या प्रयत्न करून, असे मनात म्हणाले व शांतपणे सुखासन घालून बसले. डोळे मिटून स्वस्थ बसले. माणूस जेव्हा असे चिंतन करतो तेव्हा ध्यानधारणा होते. भोपळ्यांनी मीन धारण केले. शांत होत गेले. रागाचा भर ओसरला. सारे शांतपणे बसले, असं कधीच झालं नव्हतं. भोपळे थकित झाले. हैराण झाले. एवढी मनःशांती त्यांना कधीच मिळाली नव्हती. र. मंत्र एका अपूर्व आनंदाची लहर पसरली. गुरुजी परत आले व म्हणाले, 'आता एक काम करा. आपापल्या डोक्यावर हात ठेवा.' डोक्यावर हात ठेवताच त्यांच्या लक्षात आले की, 'अरे! आपण तर एकाद वेलीवर आलो आहोत. सर्वांना एकच रस मिळत आहे. आणि आपण भांडत बसलो आहोत. भोपळ्यांनी जिथे हात ठेवला तिथे हिंदू शेंडी ठेवतात. योगी त्याला साचे चक्र म्हणतात. गुरुजी म्हणाले याला सहस्त्रार म्हणतात. आपण सर्व एकाच रसाने पुष्ट होत आहोत. 'त्याचे नाव 'प्रेमरस.' जी वेल तुम्हा सर्वांना देत आहे. एकच परमात्मा. एकच निसर्गसत्ता. एकच चैतन्य. एकच अस्तित्व. एकंच सागर लहरी अनेक. सागरात एकच लहर उठत नाही. झाडाचे एकच पान हलत नाही. तसा एकच माणूस नसतो. मानवजात एक असते. ज्या दिवशी ही एकत्वाची अनुभूती येते, त्या दिवशी प्रेमाचा जन्म होतो. वेगळेपणा नष्ट होतो.. देस दुसरेपणा परकेपणा नाहीसा होतो. वर वर माणसे वेगवेगळी दिसतात, पण आता चैतन्य-प्राणशक्ती एकच असते. ज्या दिवशी ही प्राणशक्ती नाहीशी होते। दिवजीवन संपते. परकेपणा संपतो. तेव्हा वृक्ष, पर्वत, नदी, ओवे, नाले, पुरुष-स्त्री, पशुपक्षी, तारे-ग्रह सारेच एक वाटतात. प्रेम ही प्रार्थना आहे. भिकारीच भिकाऱ्यासमोर हात पसरतो. कोणी काही मागतो. आणि मिळते तेव्हा तृप्ती, समाधान नसते. निसर्ग न मागताच सर्व काही देत असतो. पण हे लक्षात न आल्यामुळे आपण मागत बसतो. मुलं आईकडे मागतात, पिता मुलाकडे मागतो. बहिण भावाकडे मागते. अन् सारेच भिकारी बनतात. या मागण्यामुळे भांडण होते. न मागण्याने प्रेम निर्माण होते. प्रेम मागून मिळत नाही. प्रेम करायला कारण लागत नाही. भांडणे मात्र कारणावाचून होत नाहीत. प्रेम स्वातंत्र्य देते. हुकमत गाजवत नाही. प्रेम विकत घेता येत नाही, प्रेम निसर्गनिर्मित आहे. प्रेम कृत्रिमता नसते. प्रेमाचे ओझे वाटत नाही. गुरुजी सांगत होते. "एक मुलगी सात-आठ वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन चालली होती. मुलगा तसा मोठा होता. तुला त्याला असे उचलून घेऊन जाताना तुझे हात दुखत नाहीत का?" आईने विचारले, “नाही गं आई तो माझा धाकटा भाऊ आहे ना?" "प्रेम म्हणजे देवाचा अंधार घालविणारा प्रकाश असतो

→ सुविचार

 • साया प्रेमाच्या मागे, सर्वस्वाचा त्याग लपलेला असतो.' 

• त्यागबुध्दीने केलेल्या कर्माचे फळ फार मोठे आहे.'

दिनविशेष • लक्ष्मणराव किर्लोस्कर स्मृतिदिन १९५६. जून १८६९ रोजी धारवाडनजिकच्या गुर्लहोसूर खेड्यात जन्मलेल्या एका मुलाने भारताथ उद्योगक्षेत्रात चमत्कार करून दाखविला. लौकिक शिक्षण फार झाले नसले तरी चौकस बुद्धी, चौकस वाचन, अफाट परिश्रम करण्याची जिद्द यांच्याबर त्यांनी प्रत्येक कामात यश संपादन केले. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा महामंत्र 'उद्योग' या एकाच शब्दात सापडेल. शून्यापासून सुरुवात करून स्व किर्लोस्करवाडी हे आदर्श औद्योगिक वसाहतीचे गाव स्थापन केले. सुरुवातीस कष्टाचे आणि तुटपुंज्या प्राप्तीचेच त्यांचे जीवनमान होते. परंतु सातत्याने नवनवीन उद्योग सुरू करण्याच्या वृत्तीने या काळात शेकडो वेगवेगळे व्यवस्तये त्यांनी यशस्वी करून दाखविले. त्यांची जिद्द पाहून औंधच्या राजांनी आपल्य संस्थानमधील कुंडलरोड नजीकची जागा त्यांना बहाल केली. भगीरथ प्रयत्नांनी किर्लोस्करांनी तेथे उद्योगांची गंगा आणली. आणि जागेचे चीज केले. पुणे. बंगलोर, हरिहर इकडेही त्यांनी कारखाने उभारले. केवळ स्वतःच उद्योग उभारले नाही तर शेकडो उद्योजकांना हात देऊन उभे केले. अगदी शेवटच्या १० वर्षातही शेतीमध्ये विविध पिके घेण्याचे पशुपैदास सुधारणा याचे तंत्र त्यांनी विकसित केले. 


→ मूल्ये

  श्रमनिष्ठा, जिद्द 


→ अन्य घटना

 • पं. घरचंद विद्यासागर जन्मदिन १८७७

  • प्रसिद्ध नर्तक उदयशंकर स्मृतिदिन - १९७७ 


→ उपक्रम 

• किर्लोस्कर समूहाच्या उद्योगाबद्दल माहिती मिळवा.

 • किर्लोस्करांच्या जीवनावर नाट्य प्रसंग सादर करा. 


→ समूहगान

 • ऐ मेरे वतन के लोगों, तुम खुब लगा लो नारा..... 


→ सामान्यज्ञान

• सायकलीचा विकास दाखविणारी पाच तिकिटांची खास मालिका, झेकोस्लोव्हाकियाच्या पोस्ट खात्याने १९७९ च्या सप्टेंबरमध्ये काढली. • अंध व्यक्ती ओळखता यावी, यासाठी जगभर पांढऱ्या रंगाची काठी व तिला लाल रंगाचा टोकाचा भाग ही खूण वापरली जाते. अशा व्यक्तीला रस्ता ओलांडणे, बसमध्ये चढणे, जिना चढता-उतरताना मदत करणे, हे अपेक्षित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा