Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

24 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

    २४ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

→ प्रार्थना

ऐ मातृभूमि तेरे चरणों में सिर नवाऊँ....

 → श्लोक 

 - उदय जरि रविचा जाहला पश्चिमेला । विचलित जरि मेरु, अग्निही थंड झाला । गिरिबरिहि शिलान्ती पद्म झाले प्रफुल्ल । तरी न कधिही वाणी सज्जनांची फिरेल |

 -  (एकवेळ) सूर्य पश्चिमेला उगवेल, मेरू पर्वत हालायला लागेल, अग्नी थंड भासेल, पर्वतावरील शिलाखंडावर कमळ फुलेल, परंतु सज्जन लोक एकदा दिलेला शब्द पुन्हा बदलणार नाहीत

→चिंतन

 अन्याय सहन करणे हेही अन्यायकारकच आहे. लोक गुलामाप्रमाणे वागतात हे अन्यायकारक खरे पण त्याचा परिहार कसा व्हावा ? तर शहाणपण शिकावे. सामर्थ्य संपादावे आणि दिवसाउजेडी प्रतिपक्ष्यांशी सामना करून त्यांच्या वरचढ होऊन त्यांच्या हातून निसटून जावे. परिस्थितीशी टक्कर देण्यास समर्थ होणे हेच खरे अंगी बाणले पाहिजे. नुसती काळावर भिस्त ठेवून चालणे हितावह होणार नाही. नाही तर काळ बदलेल पण आपण आहोत तेथेच आहोत. अन्याय करणाऱ्यांपेक्षाही अन्याय सहन करणारा दोषी असतो. तेव्हा गुलामाला गुलामीची जाणीव करुन द्या. म्हणजे तो बंड करून उठेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

→कथाकथन 

- 'पाइसी तेजस' - तेजस हा सातव्या वर्गात शिकणारा आपल्या आई- वडिलांना एकुलता एक मुलगा. घरापासून शाळेचे अंतर असल्यामुळे तेजस नेहमी पायी शाळेत जायचा. सोबत त्याचे मित्र संकेत व प्रवीण असायचे. नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना अचानक पांढ-या रंगाची टाटा सुमो थांबली. काही कळायच्या आत गुंडांनी तिघांनाही गाडीत कोंबले व गाडी भरधाव वेगाने धावू लागली. अगोदरच मुहानी मुलांचे अपहरण करून त्यांना गाडीत हातपाय बांधून ठेवले होते. इकडे गुंडानी तिघांचे हातपाय बांधून तोंडावर पट्टी बांधली. याच वेळी मुलांना आप पळवून नेत असल्याचे कळते. सर्व मुले डोळ्यातून अश्रू गाळण्याशिवाय काही करू शकत नव्हते. तसेच रडून त्यांची सुटका होणार नव्हती. तेजम होता. गुंडांच्या तावडीतून आपली सुटका कशी होईल याचा तो मनात विचार करू लागला. तिघे मित्र एकाच सीटवर बसले होते. तिघांचे हातम मागे बांधून ठेवत होते. तेजसने संकेतला डोळ्यांनी इशारा केला. संकेतने कुणाच्याही रुक्षात न येता तेजसच्या हाताला बांधलेला दोर सोडला, परंतु येऊ नये म्हणून त्याने आपले हात मागेच ठेवले. भरधाव वेगाने धावणारी टाटा सुमो अचानक थांबली. 'तुमच्यासाठी नास्ता आणतो, ग करायची नाही.' म्हणून गुंड खाली उतरून नास्ता करण्यासाठी हॉटेलात गेले. तेवढ्यात गाडीचा चालक लघुशंकेकरिता मूत्रिघरात गेला. चालकाचे नसताना तेजस गाडीतून उतरुन अंधारात पसार झाला. चालक आपल्या सीटवर बसला, पण झोपेने पेंगुळला असल्याने तेजस पढाल्याचे त्याच्या | आले नाही. नास्ता करून गुंड येताच तेजस पाल्याचे गुंडाच्या लक्षात आले. तो पर्यंत तेजसने पोलिस स्टेशन गाठले होते. इकडे गुंड सिगारेट देऊन तेजस कुठे पळाला, याची माहिती काढत होते. काहीच माहिती हाती लागत नाही व इथे थांबणे योग्य नाही, असे समजून गुंडानी मालेगावच्या गाडी टाकली. तेजसने पोलिसांना पडलेली सर्व घटना सांगितली. पोलिसांनी तेजसच्या घरी फोन करून तेजस सुखरुप असल्याचे कळले शहराच्या चारही बाजूंनी नाकेबंदी केली. मालेगावच्या रस्त्यांनी पांढया रंगाची टाटा सुमो भरधाव वेगाने जात असल्याचे दिसताच पोलिसांनी पाठलाग केला. पोलीस पाठलाग करताना दिसताच गुंडांनी गाडी सोडून पळ काढला. परंतु पोलिसांनी जेरबंद केले व अटक केली. तेजसा सुटका झाल्याने आनंद झाला. ते गुंड कुख्यात असल्यामुळे पोलिसांना अनेक गुन्ह्याखाली पाहिजे होते. परंतु ते नेहमीच हुलकावणी द्यायचे. तेजस पकडणे शक्य झाले होते. मुलांना दुसऱ्या देशात नेऊन विकणार असल्यानी दिली. तेजसच्या शौर्याबद्दल, धाडसाबद्दल त्याला २६ राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला.

→'सुविचार

 • हौकिक पाहिजे असेल, तर काहीतरी अलौकिक करुन दाखवा.' • 'अभ्यासाने / शिक्षणाने बुध्दी सुदृढ व चपळ होते' + • शिक्षण हे वाघिणीचे रूप आहे जो ते घेईल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही.' (शिक्षणाने धैर्य, धाडस, शौर्य वाढीस लागते.) • क्षमेारखे तप नाही, संतोषापेक्षा मोठे सुख नाही, लोभासारखा रोग नाही आणि दयेपक्षा मोठा धर्म नाही.

→ दिनविशेष 

• महिला क्रांतिकारक मॅडम कामा जन्मदिन १८६१. मॅडम भिकाई कामा यांचा मुंबई येथे १८६१ मध्ये जन्म झाला. त्यांचे शि इंग्लंड येथे झाले. त्या थोर भारतीय क्रांतिकारक महिला होऊन गेल्या. क्रांतिकारी विचारांचा विशेष प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता. क्रांतिकारी चळव त्यांचे विशेष होते. क्रांतिकारकांचा त्या मोठाच आधारस्तंभ होत्या. क्रांतिकारक वाङ्मय प्रसिध्द करणे, व्याख्याने देणे व वीरभक्ती जागविणे ही प्रामुख्याने त्यांनी केली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झटणाऱ्या या क्रांतिकारक महिलेची प्राणज्योत ११ ऑगस्ट १९३६ ला मालवली.

→ मूल्ये 

स्वातंत्र्यप्रेम, ध्येयनिष्ठा • जागतीक हृदयदिवस

→अन्य घटना

  •  छत्रपती शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक - १६७४ 

  • महात्मा ही पदवी दिली गेली १८८७

  • सत्यशोधक समाज स्थापना दिवस - १९७३

   • कानपूर विद्यापीठाला छत्रपती

    • मुंबईला कोळीवाडा येथे ज्योतिबा फुले यांचा जाहीर सत्कार करून

    • राज्याध्यक्ष बबनराव घोलप यांनी महाराष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना केली -१९९५.

→ उपक्रम 

• स्वातंत्र्य चळवळीतील महिला क्रांतिकारकांची नावे व माहिती जमवा.

 • मॅडम कामा यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवा.

समूहगान 

• ये देश है वीर जवानों का, अलबेलोंका मस्तानों का...

→सामान्यज्ञान 

भारतीय संगीत 

• उत्तरेकडील:- हिंदुस्थानी संगीत

• दक्षिणेकडील :- कर्नाटकी संगीत

• लोकसंगीत:- पोवाडा, भजन, लावणी, कव्वाली, ओव्या, अंगाई गीते, कोळीगीते, सुगीची गीते. 

 भारतीय बाजे

 • तालबाये:- तबला, ढोल, चौघडा, मृदंग, घट्द्म, खोळ.

 • तंतुवाद्येः- बीणा, सरोद, सतार, तंबोरा, सारंगी, संतूर, सुर सुषिर बाये:- बासरी, सनई

 • अन्यः- तुतारी, डफ, झांजा, टाळ, डमरू, शंख, हलगी, तुणतुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा