Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

मराठी व्याकरण ,काळ सराव प्रश्न

 १३.काळ ( सराव प्रश्न)



१) आता कोठे मला कवितेचा अर्थ कळत आहे.

अ) साधा वर्तमानकाळ

ब) अपूर्ण वर्तमानकाळ

क) रिती वर्तमान काळ

ड) साधा भूतकाळ

उत्तर-ब) अपूर्ण वर्तमानकाळ

--------------------------------  

२) सर्व जनतेला आव्हान करण्यात आले होते.

अ) पूर्ण भूतकाळ

ब) अपूर्ण वर्तमान काळ

क) अपूर्ण भूतकाळ

ड) रिती भूतकाळ

उत्तर-अ) पूर्ण भूतकाळ

--------------------------------  

३) आम्ही हसलो.

अ) वर्तमान काळ

ब) भविष्यकाळ

क) भूतकाळ

ड) अपूर्ण भूतकाळ

उत्तर-क) भूतकाळ

--------------------------------  

४) त्याचे कष्ट कमी होणार नाहीत.

अ) पूर्ण भविष्यकाळ

ब) अपूर्ण भविष्यकाळ 

क) रिती भूतकाळ

ड) साधा भविष्यकाळ

उत्तर-ड) साधा भविष्यकाळ

--------------------------------  

५)रमा गीत गाते.

अ) भविष्यकाळ

ब) वर्तमानकाळ 

ड) पूर्ण वर्तमानकाळ

ड) भूतकाळ

उत्तर-ब) अपूर्ण भविष्यकाळ 

--------------------------------  

७) एकावर्षात ३६५ दिवस असतात.

अ) भूतकाळ

ब) रिती वर्तमानकाळ 

क) भविष्यकाळ

ड) वर्तमानकाळ

उत्तर-ड) वर्तमानकाळ

--------------------------------  

८) आम्ही गीत गात असू.

अ) रिती भूतकाळ

ब) रिती भविष्यकाळ 

क) अपूर्ण भूतकाळ

ड) पूर्ण वर्तमानकाळ

उत्तर-अ) रिती भूतकाळ

--------------------------------  

९) 'संनिहित भूतकाळ' असलेल्या वाक्याचा पुढील पर्यायातून शोध घ्या. (जाने. ९६)

१) सूर्य रोज उगवतो

२) मी उठतो, तोच तुम्ही पसार

३) तो नेहमीच खरे बोलतो

४) तो उद्या सकाळी जात आहे.

उत्तर-२) मी उठतो, तोच तुम्ही पसार

--------------------------------  

१०) झाडाला नेहमी फुले येत असतात.

१) पूर्ण भविष्यकाळ

२) रिती वर्तमानकाळ 

३) साधा वर्तमानकाळ 

४) अपूर्ण वर्तमानकाळ

उत्तर-२) रिती वर्तमानकाळ 

--------------------------------  

११) राधा मोदक खात जाईल.

१) पूर्ण भविष्यकाळ

२) अपूर्ण भविष्यकाळ 

३) रिती भूतकाळ

४) रिती भविष्यकाळ

उत्तर-४) रिती भविष्यकाळ

--------------------------------  

१२) रिती वर्तमानकाळ असलेले वाक्य पुढीलपैकी कोणते? (जाने.-९६)

१) मी लेखन करीत असतो

२) मी व्यायाम केला आहे.

३) मी पुस्तक वाचीत असे

४) मी लेखन करीत राहिन.

उत्तर-१) मी लेखन करीत असतो

--------------------------------  

१३) मी पाढे पाठ करीत होतो.

१) अपूर्ण भविष्यकाळ 

२) पूर्ण भविष्यकाळ 

३) अपूर्ण भूतकाळ

४) भविष्यकाळ

उत्तर-३) अपूर्ण भूतकाळ

--------------------------------  

१४) 'ही पहा बस आली' या वाक्यातील काळ कोणता? (डिसें.-९८)

१) भविष्यकाळ

२) भूतकाळ

३) अपूर्ण वर्तमानकाळ 

४) रिती वर्तमानकाळ

उत्तर-२) भूतकाळ

--------------------------------  

१५) मोर वनात नाचला असेल.

१) अपूर्ण भूतकाळ

२) पूर्ण भविष्यकाळ 

३) रिती भविष्यकाळ

४) भूतकाळ

उत्तर-२) पूर्ण भविष्यकाळ 

--------------------------------  

१६) खालील पैकी रिती वर्तमानकाळाचे वाक्य कोणते ?

१) मी गीत गाते

२) मी गीत गाणार होतो

३) मी गीत गात असतो

४) मी गीत गात जाईन

उत्तर-३) मी गीत गात असतो

--------------------------------  

१७) 'मी निबंध लिहीत असे' या वाक्यातील काळ ओळखा. (फेब्रु-९७)

१) रीती भूतकाळ

२) रीती वर्तमानकाळ 

३) रीती भविष्यकाळ 

४) अपूर्ण भूतकाळ

उत्तर-१) रीती भूतकाळ

--------------------------------  

१८) खालील पैकी रिती भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय क्रमांक शोधा.

१) वाचत होतो

२) वाचत जाईन

३) वाचत असतो

४) वाचतो

उत्तर-२) वाचत जाईन

--------------------------------  

१९) पुढील वाक्याचा काळ ओळखा 'देवकी गीत गात आहे.' (ऑगस्ट-१०)

१) पूर्ण वर्तमानकाळ

२) पूर्ण भूतकाळ 

३) अपुर्ण वर्तमानकाळ 

४) अपर्ण भूतकाळ

उत्तर-३) अपुर्ण वर्तमानकाळ 

--------------------------------  

२०) खालीलपैकी अपूर्ण भूतकाळी क्रियापदाचा पयार्य क्रमांक शोधा.

१) नाचतो

२) नाचत होतो

३) नाचत जाईन

४) नाचत असे

उत्तर-२) नाचत होतो

--------------------------------  

२१) खालीलपैकी पूर्ण भविष्यकाळातील वाक्य कोणते ?

१) मामांनी मुंबई गाठले

२) मामा मुंबई गाठत असेल

३) मामा मुंबई गाठत जाईल

४) मामांनी मुंबई गाठले असेल.

उत्तर-४) मामांनी मुंबई गाठले असेल.

--------------------------------  

२२) खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे.

१) मी जेवण करीन

२) मी जेवतो आहे

३) मी जेवण केले

४) मी दररोज जेवतो

उत्तर-३) मी जेवण केले

--------------------------------  

२३) पुढील वाक्याचा काळ ओळखा- सुमन झाडाला पाणी घालत होती. (जाने. -९६)

१) अपूर्ण वर्तमानकाळ 

२) रीती वर्तमानकाळ 

३) पूर्ण वर्तमानकाळ

४) अपूर्ण भूतकाळ

उत्तर-४) अपूर्ण भूतकाळ

--------------------------------  

२४) 'तो नाचत नाचत नवरदेवाच्या घोड्याजवळ जात असे' काळ ओळखा.

१) पूर्ण भूतकाळ

२) रिती भूतकाळ 

३) वर्तमानकाळ

४) पूर्ण वर्तमानकाळ

उत्तर-२) रिती भूतकाळ 

--------------------------------  

२५) 'मी पत्र लिहीत असे' या वाक्यातील काळ ओळखा. (फेब्रु-९७)

१) साधा भविष्यकाळ 

२) रीती भविष्यकाळ 

३) पूर्ण भविष्यकाळ 

४) रिती भूतकाळ

उत्तर-४) रिती भूतकाळ

--------------------------------  

२६) 'ता' ख्यातावरुन कोणता काळ ओळखला जातो.

१) वर्तमान

२) भूतकाळ

३) भविष्य

४) रिती वर्तमान

उत्तर-१) वर्तमान

--------------------------------  

२७) 'ला' ख्यातावरुन कोणता काळ ओळखला जातो? (डिसें-९८)

१) वर्तमान

२) भूतकाळ

३) भविष्य

४) रिती वर्तमान

उत्तर-२) भूतकाळ

--------------------------------  

२८) 'मला पाहताच चोर पसार' काळ ओळखा.

१) भूतकाळ

२) रिती वर्तमानकाळ 

३) वर्तमानकाळ

४) भूतकाळ

उत्तर-३) वर्तमानकाळ

--------------------------------  

२९) खालील वाक्यातील काळ ओळखा - 'रामा पुस्तक वाचतो.' (मार्च- ०१)

१) वर्तमानकाळ

२) भूतकाळ

३) भविष्य

४) रिती वर्तमान

उत्तर-१) वर्तमानकाळ

--------------------------------  

३०) 'त्याने जेवण बनविले' या वाक्याचे अपूर्ण वर्तमानकाळ करा.

१) तो जेवण बनवत असतो.

२) तो जेवण बनवित असे.

४) तो जेवण बनवित आहे.

३) तो जेवण बनवित होता.

उत्तर-४) तो जेवण बनवित आहे.

--------------------------------  

३१) 'बाळ दररोज शाळेत जातो' या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा. (मार्च- ०१)

१) बाळ दररोज शाळेत जात असेल.

२) बाळ दररोज शाळेत गेला.

३) बाळ दररोज शाळेत जातो.

४) बाळ दररोज शाळेत जात होता.

उत्तर-४) बाळ दररोज शाळेत जात होता.

--------------------------------  

३२) रिती वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.

१) मी क्लास घेत राहीन

२) मी क्लास घेत असतो.

३) मी क्लास घेत असे

४) मी क्लास घेतो.

उत्तर-२) मी क्लास घेत असतो.

--------------------------------  

३३) 'जा' या क्रियापदाचे भूतकाळात रूप कोणते होईल ? (डिसें-०४)

१) गेला

२) जातो

३) जा

४) जाताना

उत्तर-१) गेला

--------------------------------  

३४) निश्चित भविष्यकाळ असतांना वाक्यात कोणता काळ वापरतात.

१) वर्तमानकाळ

२) भविष्यकाळ

३) भूतकाळ

४) यापैकी नाही

उत्तर-३) भूतकाळ

--------------------------------  

३५) म्हण या धातूवरुन भूतकाळीरुप बनवा.

१) म्हटले

२) म्हणतो

३) म्हणेल

४) म्हणतात

उत्तर-१) म्हटले

--------------------------------  

३६) 'या' या धातूपासुन अनेकवचनी स्त्रीलिंगी भूतकाळी रुप बनवा.

१) येतो

२) आला

३) आले

४) आल्या

उत्तर-४) आल्या

--------------------------------  

३७) पुढील वाक्यातील काळ ओळखा वैशाली दररोज अभ्यास करते. (डिसें-०४)

१) साधा वर्तमान

२) रीती वर्तमान

३) अपूर्ण वर्तमानकाळ 

४) साधा भविष्यकाळ

उत्तर-२) रीती वर्तमान

--------------------------------  

३९) सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्यकाळ करा. (डिसें. -०५)

१) सूर्य मावळेल

२) सूर्य मावळत असेल

३) सूर्य मावळलेला असेल 

४) सूर्य मावळला

उत्तर-३) सूर्य मावळलेला असेल 

--------------------------------  

४०) त्याचे पुस्तक वाचून झाले भविष्यकाळ करा. (डिसें-०५)

१) तो पुस्तक वाचणार आहे

२) त्याने पुस्तक वाचलेले होते.

३) त्याचे पुस्तक वाचून झाले होते

४) त्याचे पुस्तक वाचून होईल.

उत्तर-४) त्याचे पुस्तक वाचून होईल.

--------------------------------  

४१) 'हो' या धातूपासून अनेकवचनी पुल्लिंगी भूतकाळ बनवा.

१) झाले

२) होले

३) आले

४) झया

उत्तर-१) झाले

--------------------------------  

४२) 'मी सिनेमा पाहिला' अपूर्ण भविष्यकाळ करा. (मे-०८)

१) मी सिनेमा पाहत असेन

२) मी सिनेमा पाहीन

३) मी सिनेमा पाहणार आहे

४) मी सिनेमा पाहिलेला असेल

उत्तर-१) मी सिनेमा पाहत असेन

--------------------------------  

४३) 'ई' आख्यातवरुन कोणता काळ ओळखला जातो.

१) रिती भविष्यकाळ

२) रिती भूतकाळ

३) वर्तमानकाळ

४) भविष्यकाळ

उत्तर-२) रिती भूतकाळ

--------------------------------  

४४) 'आहे' या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रुप कोणते होईल ? (मे-०८)

१) असते

२) असत

३) असेल

४) होईल

उत्तर-३) असेल

--------------------------------  

४५) 'ई लाख्यात' वरुन कोणता काळ ओळखला जातो.

१) रिती भविष्यकाळ 

२) रिती भूतकाळ 

३) वर्तमानकाळ

४) भविष्यकाळ

उत्तर-४) भविष्यकाळ

--------------------------------  

४६) 'बस' या धातूचे तृतीय पुरुषी पुल्लिंगी, अनेकवचनी भुतकाळी रुप ओळखा. (मे-०८) 

१) बस

२) बसले

३) बसल्या

४) असतील

उत्तर-२) बसले

--------------------------------  

४७) तो नेहमी आजारी असतो- वाक्यातील काळ ओळखा.

१) रिती भूतकाळ

२) भूतकाळ

३) भविष्यकाळ

४) रिती वर्तमानकाळ

उत्तर-४) रिती वर्तमानकाळ

--------------------------------  

४८) 'सूर्य पूर्वेला उगवेल' रीती-वर्तमान करा. (मार्च-०९)

१) सूर्य पूर्वेला उगवत असेल

२) सूर्य पुर्वेला उगवत असतो.

३) सूर्य पूर्वेला उगवत आहे.

४) सूर्य पूर्वेला उगवणार

उत्तर-२) सूर्य पुर्वेला उगवत असतो.

--------------------------------  

४९) 'पाह' धातूचे भूतकाळी तृतीय पुरुषी रूप ओळखा (मार्च- ०९)

१) पाहिले

२) पाही

३) पाहा

४) पाहू

उत्तर-१) पाहिले

--------------------------------  

५०) विज्ञानाने सत्य झालेली विधाने कोणत्या काळात असतात.

१) भूतकाळ

२) भविष्यकाळ 

३) वर्तमानकाळ

४) वरीलपैकी सर्व

उत्तर-३) वर्तमानकाळ

--------------------------------  

५१) 'त्याने पत्र लिहिले' या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा. (मार्च-०९)

१) त्याने पत्र लिहावे.

२) तो पत्र लिहीत असतो.

३) तो पत्र लिहितो.

४) तो पत्र लिहित आहे.

उत्तर-३) तो पत्र लिहितो.

--------------------------------  

५२) आई त्या सरोवराच्या काठी बसे काळ ओळखा. (मार्च- ०९)

१) भूतकाळ

२) रीती भूतकाळ 

३) भविष्यकाळ

४) वरीलपैकी सर

उत्तर-२) रीती भूतकाळ 

--------------------------------  

५३) ऐतिहासिक घटना जिवंत करुन सांगतांना कोणता काळ वापरतात.

१) वर्तमानकाळ

२) भूतकाळ

३) भविष्यकाळ

४) वरीलपैकी सर्व

उत्तर-१) वर्तमानकाळ

--------------------------------  

५४) खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे. (ऑगस्ट-१०)

१) मी जेवण करीन 

२) मी जेवतो आहे 

३) मी जेवण केले

४) मी दररोज जेवतो

उत्तर-३) मी जेवण केले

--------------------------------  

५५) योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. (ऑगस्ट-१०)

१) वचन

२) पुरुष

३) लिंग

४) आख्यात

उत्तर-४) आख्यात

--------------------------------  

५६) ज्या शब्दावरुन क्रियेची वेळ समजते त्या शब्दाला

१) काळ

२) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

३) क्रियापद

४) कर्ता

उत्तर-२) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

--------------------------------  

५७) पुढील वाक्याचे अपूर्ण वर्तमानकाळी रूप लिहा. 'त्याने अभ्यास केला.' (ऑक्टो-१०)

१) तो अभ्यास करीत आहे

३) तो अभ्यास करतो

२) त्याने अभ्यास केला

४) तो अभ्यास करीत असतो

उत्तर-१) तो अभ्यास करीत आहे

--------------------------------  

५८) एखाद्या गोष्टीबद्दल तर्क लढवितांना कोणता काळ वापरतात.

१) वर्तमानकाळ

२) भूतकाळ

३) भविष्यकाळ

४) वरीलपैकी सर्व

उत्तर-३) भविष्यकाळ

--------------------------------  

५९) 'मुग्धाने फुले तोडली आहेत'- या पूर्ण वर्तमानकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते?

१) मुग्धा फुले तोडेन

२) मुग्धा फुले तोडीत असेल

३) मुग्धाने फुले तोडली असतील

४) मुग्धा फुले तोडीत जाईल

उत्तर-२) मुग्धा फुले तोडीत असेल

--------------------------------  

६०) खालील वाक्यातील काळ ओळखा. 'मी बालपणी लवकर उठत असे.' (सप्टें.-११)

१) रीती भूतकाळ

२) अपूर्ण भूतकाळ 

३) पूर्ण भूतकाळ

४) पूर्ण वर्तमानकाळ

उत्तर-१) रीती भूतकाळ

--------------------------------  

६१) सगळेच नंबर एक कसे बनतील. काळ ओळखा.

१) वर्तमानकाळ

२) भूतकाळ

३) भविष्यकाळ

४) वरीलपैकी सर्व

उत्तर-३) भविष्यकाळ

--------------------------------  

६२) पुढीलपैकी 'ला' आख्यात ओळखा. (सप्टें.-११)

१) बसला

२) बसू

३) बसतो

४) बसावे

उत्तर-१) बसला

--------------------------------  

६३) अवतरण चिन्ह वर्तमानात असतांना कोणता काळ होतो.

१) वर्तमानकाळ

२) भूतकाळ

३) भविष्यकाळ

४) वरीलपैकी सर्व

उत्तर-१) वर्तमानकाळ

--------------------------------  

६४) 'तू एवढ्या भाकरी कराव्यात' या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा

१) आख्यात

२) वाख्यात

३) ताख्यात

४) लाख्यात

उत्तर-२) वाख्यात

--------------------------------  

६५) 'मी कांदबरी लिहीन' - या वाक्यातील काळ ओळखा. 

१) भूतकाळ

२) वर्तमानकाळ

३) भविष्यकाळ

४) साधा वर्तमानकाळ

उत्तर-३) भविष्यकाळ

--------------------------------  

६६) रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. (डिसें.-११)

१) मी लेखन करीत राहीन

२) मी लेखन केले आहे.

३) माझे लेखन झाले आहे.

४) मी लेखन करीत असतो.

उत्तर-४) मी लेखन करीत असतो.

--------------------------------  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा