Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

17 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

       17 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ→ प्रार्थना 

- राम रहीम को भजनेवाले, तेरे है बंदे खुदा या... 

श्लोक

 - नसे गर्व अंगी सदा वीतरागी । क्षमा, शांति भोगी, दयादक्ष योगी । नसे लोभ ना क्षोभ ना दैनवाणा । इही लक्षणी जाणिजे योगिराणा । 

 (हे मना, ज्याला कधीही गर्व नसतो, कसलीही आसक्ती नसते, जो क्षमाशील, शांत व दया करण्यात तत्पर असतो, ज्याला लोभ, क्षोभ ( जळफळाट) व दीनवाणेपण नसते, तोच योग्याचा राजा असतो.


 → चिंतन

 माझी अशी भावना आहे की माझ्या देशावर झालेला अन्याय हा परमेश्वराचाच अपमान होय. मातृभूमीसाठी कार्य हे परमेश्वराचं आहे. तिची सेवी ही देवाची सेवा आहे. - मदनलाल धिंग्रा

कथाकथन

 'शिवरायांचा प्रताप' - छत्रपती शिवाजी महाराजांवर अगदी लहानपणापासून त्यांच्या आईने म्हणजेच जिजाऊसाहेबांनी | संस्कार केले. अगदी लहान वयात अक्षरओळख करून दिली. शस्त्रास्त्रे कशी चालवायची, याचे उत्तम शिक्षण दिले. 

जिजाऊसाहेबांची आपल्या शिवबावर पारीसारखी नजर होती. बाल शिवाजी जिजाऊसाहेबांच्या भोवतीभोवतीने वावरायचा. हिंदवी स्वराज्याची तहान खरे तर जिजाऊसाह आगली होती आणि आपला हा लाडका पुत्र ही इच्छा पूर्ण करणार, याची जिभाऊसाहेबांना खात्री होती. हिंदवी स्वराज्याच्या उद्याच्या छत्रपतालक आई घडवीत होती. र, मुलांनो, शिवाजी महाराज मातृभक्त होते. आईची स्वराज्याची तहान त्यांनी पूर्ण केली. वयाच्या सोळाव्या वर्षी राजांनी तोरणा किल्ला सर केला न जिजाऊसाहेबांना अतिशय आनंद झाला. एका मागोमाग एक किल्ले जिंकत राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली

राजांच्या बरोबरीने जिजाऊ स्वराज्यनिर्मितीत पूर्णाशांनी गुंतल्या होत्या. रयतेवर कुणी अन्याय करणार नाही; याची काळजी जिजाऊसाहेब घेत होत्या. रयतेशी संवाद साधत होता खरे सांगायचे तर शिवाजी महाराजांनी जिजाऊसाहेबांच्या मदतीने स्वराज्याची स्थापना केली. रायगडाच्या पायथ्याशी तक्क्याची विहीर होती. जिजाऊस संध्याकाळी विहिरीशी बसायच्या. पाणी भरायला ज्या बायका येत त्यांच्याशी 

जिजाऊसाहेब बोलायच्या. त्यांची सुखदुःखे जाणून घ्यायच्या. त्य राजांना रयतेची सुखदुःखे कळायची. रयतेला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेणारे शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेब म्हणजे, मु आणि आई या नातेसंबंधातली अपूर्व जोडी.... मुलांनो, शिवाजी महाराजांचे चरित्र एवढ्यासाठी वाचायचे की हिंदवी स्वराज्याची स्थापना राजांनी कशी केली हे तर कळेलच. परंतु त्याहून अधि काय तर आईवर प्रेम कसे करावे आणि आपल्या आईची इच्छा कशी पूर्ण करायची, याचे आपल्यावर उत्तम संस्कार होतात. आणखी एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून सिंहासनावर आरूढ झाल्याचे पाहिल्याचे सद्भाग्य जिजाऊसाहेबांना लाभले. असे सद्भाग्य आपण आपल | आईला द्यायला नको का?

 → सुविचार 

 • 'प्रीतिचे माहेर, शांतीचे आगर, मांगल्याचे सार आई माझी' - साने गुरुजी 

दिनविशेष 

• हुताम्या मदनलाल धिंग्रा स्मृतिदिन - १९०९ : मदनलाल धिंग्रा हे जातीने क्षत्रिय आणि पंजाबच्या वीर भूमीत जन्मलेले

 वडील अमृतसर येथे सिव्हिल सर्जन होते. त्यांचे घराणे राजनिष्ठ होते. मदनलाल २१ वर्षांचे असताना त्यांचा विवाह झाला. एका पुत्ररत्नही झा गुप्तपणे इंग्लंडला गेले. तेथे 'युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये' स्थापत्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून चांगला लौकिक मिळविला. हिंदुस्थानातील ब्रिटिश अधिकार चालविलेला जुलूम, हिंदी युवकांना दिली जाणारी फाशीची शिक्षा आणि त्यांना भोगावी लागणारी हद्दपारीची शिक्षा यांनी मदनलाल धिंग्राचे अंत भडकले. त्यांनी कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा प्रतिशोध घेण्याचे ठरविले. नॅशनल इंडियन असोसिएशनच्या वार्षिक मेजवानीच्या प्रसंगी प्रवेश मिळविला. त्यांनी उंची पोशाखात हत्यारे लपविली होती. कर्झन वायलीच्या जवळ जाऊन हळू आवाज ते काही बोलले. ते नीट ऐकू येण्यास | कर्झन वायलीने कान त्यांच्याजवळ नेला आणि निमिषार्धात आपल्या कोल्ट रिव्हाल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या. कर्झन वायलीच्या डोक् | चिंधड्या झाल्या. तो दूर जाताच पुन्हा त्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा तो कोसळलाच. मदनलाल धिंग्राला पकडण्यात आले. त्यांच्यावर खटला भ गेला. १७ ऑगस्ट १९०९ रोजी लंडन येथील पेंटनव्हिले कारागृहात मदनलाल धिंग्रा यांना फासावर लटकविण्यात आले. फासावर जाण्यापूर्वी ते म्ह "परमेश्वरापाशी माझी इतकीच प्रार्थना आहे की, ती स्वतंत्र होईपर्यंत याच मातृभूमीचे पोटी मला पुनर्जन्म प्राप्त होवो आणि याच पवित्र कार्यात मला • छत्रपती शिवाजी महाराजांची अग्र्याहून सुटका - १६६६. मोहेंजोदडो व तक्षशिला ही स्थळे शोधन काढणारे मल मार का देख व ते झ च मृत्यू येवो

. → मूल्ये 

देशप्रेम, स्वातंत्र्यनिष्ठा.

अन्य घटना

• छत्रपती शिवाजी महाराजांची अग्र्याहून सुटका - १६६६.

 • मोहेंजोदडो व तक्षशिला ही स्थळे शोधून काढणारे सर जॉन ह्युबर्ट यांचा मृत्यू - १९५८ 

 

- • भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र उठाव या प्रवासातील हौताम्य पत्करलेल्या क्रांतिकारांची माहिती मिळवा. 

मूल्ये 

-• देशप्रेम, स्वातंत्र्यनिष्ठा. → अन्य घटना - → उपक्रम 'समूहगान 

• हा देश माझा ह्याचे भान, जरासे राहू द्यारे....

•  → सामान्यज्ञान राष्ट्रीय दिवस -0 राष्ट्रीय युवा दिन- १२ जानेवारी 

•• सेना दिन - १५ जानेवारी 

• हुताम्या दिन - ३० जानेवारी 

• राष्ट्रीय विज्ञान दिन - २८ फेब्रुवारी 

 • महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने 

 •  (१) पेंच (नागपूर) 

(२) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. (बोरिवली-मुंबई उपनगर) 

(३) नवेगाव (भंडारा) 

(४) ताडोबा (चंद्रपूर)


 • राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह - ३ जाने. ते ९ जाने.

  • वन्य प्राणी सप्ताह - १० ऑक्टो ते १७ ऑक्टो.

 • पर्यावरण महिना १९ नोव्हें. ते १८ डिसे. (९४)

  • राष्ट्रीय सकस आहार सप्ताह १ सप्टें. ते ५ सप्टें

. • सहकार सप्ताह १४ नोव्हे. २० नोव्हे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा