4 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
- देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना...
→ श्लोक
- तैलात् रक्षेज्जलात् रक्षेत् रक्षेत् शिथिल बन्धनात् । मूर्खहस्ते न दातव्यं एवं वदति पुस्तकम् |
- माझे तेलापासून रक्षण कर, पाण्यापासून रक्षण कर, सैल बांधणीपासून रक्षण कर. मला मूर्खाच्या हाती देऊ नये. असे पुस्तक म्हणते.
→ चिंतन
-बहुतेक जण संकटाला घाबरत असतात. संकटाने त्रासून जातात, परंतु या संकटांवर आपण धैयनि, कल्पकतेने मात केली पाहिजे. या भावनेने प्रयत्नाला लागल्यास त्यातून आपण सहज पार पडतो, हे लक्षात घेऊन आलेल्या संकटांवर मात केली पाहिजे. बरेचदा संकटांचा बाऊ करून त्याच्यापासून स्वतःला लपविण्यातच सगळी शक्ती खर्च होते. पण संकटापासून जितके स्वतःला लपवू तितके ते डोक्यावर बसते. त्याऐवजी संकटाचा सामना करून मार्ग काढणे श्रेयस्कर ठरते. वार
→ कथाकथन मौनाचे महत्त्व
-एका जन्मी बोधिसत्त्व शेतकरी होऊन एका गावात राहत होता. त्या वेळी एक फेरीवाला एका गाढवावर आपले | सामान लादून गावोगाव फिरून आपल्या सामानाची विक्री करत असे. पण गाढवाच्या चाऱ्यासाठी मात्र आपले पैसे खर्च होऊ नयेत म्हणून त्यानं छानशी युक्ती शोधून काढली होती. त्याच्याजवळ एक सिंहाचं कातडं होतं. तो ते आपल्या गाढवाच्या अंगावर पांघरत असे नि लोकांच्या शेतात सोडून | देत असे. गाढव भरपूर खाऊन परत आपल्या धन्याकडे येत असे. हा लोकांना फसवायचा प्रकार बरेच दिवस चालला होता. एक दिवस तो फेरीवाला आपल्या गाढवाबरोबर बोधिसत्व राहत होता. त्या गावी आला. नेहमीप्रमाणे त्यानं गावाच्या वेशीवर गाढवावरील | सामान उतरवून त्याच्या अंगावर सिंहाचं कातडं घातलं, नि त्याला दिलं जवाच्या शेतात सोडून. मग तो स्वतः जेवणाच्या तयारीला लागला. इकडे त्या शेताचा राखणदार सिंह आला असं समजून धावत आपल्या मालकाकडे गेला नि त्याला शेतात सिंह आल्याचं सांगितलं. तेव्हा त्या शेतकऱ्यानं सर्व शेतकऱ्यांना ही बातमी दिली. तेव्हा बोधिसत्त्व म्हणाला, "चला, आपण शेतात जाऊन सिंह कसा असतो ते पाहू. आपण दुरून वाद्ये, शंख वाजवू. त्याच्या आवाजानंच तो पळून जाईल. एखादे वेळी आपल्यावर चाल केलीच तर आपण सर्वजण मिळून त्याला काठ्यांनी चांगलं बडवू काही घाबरू नका. सर्व गावकरी बोधिसत्त्वाला पुढे घालून शेताजवळ आले. त्यांनी वाद्ये वाजवायला सुरुवात केली. मोठमोठ्यानं आरोळ्या द्यायला सुरुवात केली. त्यांच्या त्या आरोळ्यांनी नि वाद्याच्या आवाजानं गाढव घाबरले. नि आपल्या स्वभावाला अनुसरून ओरडू लागले. तेव्हा बोधिसत्त्व म्हणाला, "अहो, हे ओरडणं सिंह किंवा वाघ यांचं नाहीच. हा नीच गाढव सिंहाचं कातडं पाघरून ओरडतो आहे. तेव्हा मात्र शेतकऱ्यांनी गाढवावर हल्ला करून त्याचे कातडे काढून घेतले नि त्याला भरपूर चोप दिला. यचेच्छ मार खाऊन मरणोन्मुख होऊन गाढव तेथेच पडले. इकडे गाढवाची वाट पाहून त्याचा मालक कंटाळला. तो गाढवाला शोधण्यासाठी शेतात शिरला. थोड्याच अंतरावर गाढव त्याला मरणोन्मुख अवस्थेत पडलेलं आढळलं. त्याची दशा पाहून नि सिंहाचं कातडं नाहीसं झालेलं पाहून लगेच मालकाच्या डोक्यात प्रकाश पडला. ती व्यथित स्वरात म्हणाला, "अरे गाढवा, सिंहाचं कातडे पांघरून तू खूप लोकांची शेते खाल्लीस. परंतु स्वतःच्या ओरडण्यानं तू स्वतःवर मरण ओढवून घेतलं आहेस " फेरीवाल्यानं गाढवाकडे पाहिलं तर गाढवानं केव्हाच डोळे मिटले होते.
→ सुविचार
• जेव्हा काय बोलावं असा प्रश्न पडतो तेव्हा सत्यच बोलावं किंवा मौन पाळावे-माट्वेन
• बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं.
→ दिनविशेष
• सर फिरोजशहा मेहता यांचा जन्मदिन १८४५ :
-'सर फिरोजशहा मेहता यांच्या इतका दणदणीत पुढारी मुंबई शहराला - आजवर लाभला नव्हता.' असे साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी टिळक चरित्रात म्हटले आहे. त्यांच्या विद्यार्थिदशेत त्यांनी दाखविलेली बुद्धिमत्ता अलौकिक होती. यामुळे सर अलेक्झांडर ग्रँट त्यांच्यावर खूष झाले आणि त्यांनी त्यांना विलायतेस जाण्यास मदत केली. १८६८ मध्ये ते बॅरिस्टर होऊन परत आले. काही खटल्यात त्यांना चांगले यश मिळाल्यामुळे बॅरिस्टर म्हणून त्यांची चांगली प्रसिद्धी झाली. लॉर्ड रिपनच्या काळात स्थानिक स्वराज्याची प्रगती झाली. तिला सर फिरोज शहांनी चांगलाच हातभार लावला. स्थानिक स्वराज्याची आवड असल्याने ते मुंबई म्युनिसिपालिटीत लवकर शिरले, तेथील नेतृत्व आजन्म आपल्याकडे टिकविले. राजकारणात तात्त्विकदृष्ट्या ते नेमस्त होते पण स्वाभिमानाची गोष्ट आली म्हणजे ते जहालाहून जहाल होत. राष्ट्रीय सभेचे ते प्रारंभीच्या वर्षात अध्यक्ष होते. मुंबई विद्यापीठातही त्यांनी बरेच कार्य केले. मुंबई शहराची आघाडी राजकारणात ठेवण्याचे पुष्कळसे श्रेय मेहतांना द्यावे लागेल. ५ नोव्हेंबर १९१५ मध्ये ते स्वर्गवासी झाले.
मूल्ये
• कर्तव्यदक्षता, शुचिता, साहस, स्वाभिमान.
→ अन्य घटना
जगातील प्रसिद्ध परीकथा लेखक हॅन्स अँडरसन यांचे निधन - १८७५ ना. सी. फडके यांचा जन्मदिन १८९४ -
• युरोपात जर्मनी व इंग्लंड यांचेमध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले - १९१४
• नागपूर विद्यापीठाची स्थापना - १९२३
• हॉकीपटू उधमसिंह यांचा जन्मदिन - १९२८
• मुंबईजवळील तुर्भे येथे आशियातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' सुरू झाली. १९५६ -
→ उपक्रम
- फिरोजशहा मेहता यांचे चारित्र माहीत करून घ्यावे.
→ समूहगान
• हिंद देश के निवासी सभी जन एक है....
→ सामान्यज्ञान
ग्रीष्म २१ एप्रिल ते २१ जून
शरद २३ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर
शिशिर २२ डिसेंबर ते १९ फेब्रुवारी
ऋतू • वर्षा - • हेंमत - री •
वर्षा. २२ जून ते २२ ऑगस्ट
हेंमत. २३ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर
वसंत. २० फेब्रुवारी ते २० एप्रिल
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा