Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

11 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ → प्रार्थना 

 ए मालिक तेरे बंद हम, ऐसे हो हमारे करम- 

 → श्लोक

  - तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । विवेके अहंभाव याते जिजावे । अहंतागुणे वाद नाना विकारी । तुटे बाद संवाद तो हितकारी ।। 

जय वाद (कलह, भांडण) ज्यामुळे संपतो, तोच विचारविनिमय (संवाद) म्हणावा. विवेकाने अहंकार जिंकावा. अहंभावाने नाना प्रकारचे क वाढतात. विकार उत्पन्न होतात. ज्याच्यामुळे कलह संपतो, तोच संवाद (विचारविनिमय) हितकारक असतो. 

चिंतन 

ज्या मानाने जीवनात सत्य, शिव आणाल त्या मानाने सुंदरता येईल. - सौंदर्य दोन प्रकारचे आहे. आंतरिक व बाह्य. जीवनात सुंदरता कशाने येईल सत्याने, सेवेने, प्रेमाने येईल. आपण ज्या वेळेस खोटे बोलतो, त्या वेळे आपण सुंदरता गमावतो, मुखावरची प्रसन्नता जाते, हृदय वाकडे होताच तोंड वाकडे होते. आपले सारे अंतरंग आपल्या मुखावर लिहिलेले असते. दु प्रेम करीत असाल, तर तुमचे डोळे किती सुंदर दिसतात! मुखावर कर कोवळीक असते. सत्य, शिव, सुंदर असे शब्द आपण वापरतो. ज्या मानाने जीवन सत्य, शिव 

आणाल त्या मानाने सुंदरता येईल. 


कथाकथन 

- 'सत्य हेच ब्रह्म'- सत्य हे निर्लेप असलं पाहिजे. तेव्हाच त्यांची चांगली फळ मिळतात. छांदोग्य उपनिषदामधली सत्यकाम जाबालवी हेच सूचित करते.

-  ब्रह्मचर्याची दीक्षा घेण्याकरता सत्यकाम जाबाल गुरूकडे गेला. गुरूनं त्याला कुल विचारलं. सत्यकाम म्हणाला, माझं गोत्र कोणतं ते मला  मिळविण्याकरता सत्यकामानं स्वतःविषयी कोणतीही माहिती लपवली नव्हती. त्यामुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. ते म्हणाले. "दीक्षा देण्यासाठ नाही, मला माझ्या आईचं नाव तेवह ठाऊक आहे. पित्याचे नाव ठाऊक नाही. माझ्या आईलासुद्धा माझ्या पित्याचं नाव माहीत नाही. योग्य आहेस. कारण तू सत्यापासून ढळला नाहीस" निर्मळ आणि शुद्ध सत्य बोलण्यामुळे सत्यकाम ब्रह्मपदी जाऊन पोचला. याउलट कर्णाची सांगता येईल. ब्रह्मास्त्र मिळविण्यासाठी कर्ण महेन्द्रपर्वतावरील परशुरामांच्या आश्रमात गेला. परशुरामांना त्यानं आपल्या गोत्राविषयी, कुलावि असत्य कथन केलं. पांडवांना ठार करण्यासाठी काहीही करून ब्रह्मास्त्र मिळवणं एवढाच हेतू त्यानं मनात बाळगला होता. त्यासाठी त्याने असत्याची का धरली होती.

-   परशुरामांनी त्याला यथावकाश ब्रह्मास्त्र दिलं. परंतु आश्रम सोडण्यापूर्वी दोन घटना घडल्या. त्यामुळे कर्णाचा हेतू निष्फळ ठरला. त्याच्या हातून ए ब्राह्मणाच्या गायीचा वध घेतला गेला. त्या ब्राह्मणानं संतापाच्या भरात शाप दिला, 'तू ज्याच्याशी स्पर्धा करीत आहेस त्याच्याशी ऐन समरप्रसंगी 'रथचक्र भूमी गिळंकृत करील.' पाठोपाठ परशुरामांनाही कर्णाचं खरं स्वरूप समजलं. त्यामुळे ते क्रोधाविष्ट झाले. त्यांनीही कर्णाला शाप दिला. 'बरोबरीच्या योध्दयांशी युद्ध करीत असताना अंतकाली तुला या अस्त्राची विस्मृती होईल.' कर्णाचा हेतू असत्यामुळे विफल ठरला. असत्य कथनामुळे माणसाचा तात्कालिक जरी लाभ झाला तरी तो अंतिम लाभ ठरत नाही. याउलट कथनामुळे अंतिम लाभ निश्चित पदरात पडतो. म्हणूनच सत्याला ब्रह्म म्हटलं आहे. 

सुविचार 

 • 'सत्यमेव जयते' आमुचे ब्रीदवाक्य आहे, सत्यं, शिवम्, सुंदरतेचा मंत्र तोची आहे.

सत्य म्हणजे तुमचा आतील आबाद तुम्हाला जे सांगतो ते.


 • सत्याच्या पुजाऱ्याने जमिनीवरील धुळीइतके विनम्र असले पाहिजे. सत्याचाराने त्याची विनम्रता वाढत जाते.

 • सर व अहिंसा या गोष्टी केवळ वैयक्तिक आचरणाच्या बाबी म्हणून आपल्याला प्रस्थापित करावयाच्या नसून गटांनी, समाजांनी व राष्ट्रांनीही त्या आचरण करावे. 

• सौंदर्यात सत्य शोधण्याची दृष्टी आपण सामान्य माणसात उत्पन्न करू शकत नाही. म्हणून त्यांना सत्य दाखवा म्हणजे सौंद आपोआप दिसेल. हजार सूर्य एकत्र केले तरी त्यांनी सत्यरूपी सूर्याची बरोबरी करता येणार नाही. सत्य हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

 • दिनविशेष 

   • • क्रांतीवीर खुदीराम बोस स्मृतिदिन - १९०८ : खुदीराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९ साली बंगालमधील मिदनापूर येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षीच खुदीरामचे आई वडील निवर्तले. त्यांच्या भगिनी अपरूपा यांनी त्यांचा सांभाळ केला. बालवयातही खुदीरामांचे शारीरिक सामर्थ्य आणि टणकपणा वाखाणण्यासारखा होता. एकदा शाळेत शिक्षकांनी टेबलावर अधिकाधिक गुद्दे कोण मारतो याची स्पर्धा लावली. काही सात-आठ गुद्यात हरले. खुदीराम बोटे रक्तबंबाळ होई तो गुद्दे मारत होते. स्पर्धेत ते पहिले आले. पुढे 'युगांतर' या क्रांतिकारक संस्थेचे ते सभासद झाले. हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्ता शक्य तितक्या लवकर उलथून पाडण्यासाठी आत्मसमर्पण करणाऱ्यात खुदीराम बोस होते. मुजफ्फरपूरला किंग्जफोर्ड आल्यावर त्याची घोडागाडी समजून प्रिंसले केनेडी या युरोपियन वकिलाच्या गाडीवर खुदीरामांनी बाँब टाकला. गाडीत बसलेल्या दोन युरोपियन स्त्रिया बाँबच्या आघाताने जागीच ठार झाल्या. खुदीरामांना फाशीची शिक्षा ठोठावली. दि. ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी हातात गीता घेऊन धैर्याने आणि सस्मित मुद्रेने ते फाशीच्या तक्ताकडे चालत गेले..

मूल्ये 

 • राष्ट्रप्रेम, निर्भयता. 

अन्य घटना

 • संत सावतामाळी स्मृती - १२९५ 

• मादाम भिकाई कामा यांचा स्मृतिदिन -१९३६

. • मानवशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांचे निधन - १९७०.

उपक्रम

 क्रांतिकारकांची चित्रे मिळवून त्यांची माहिती संकलित करुन चित्राखाली लिहा.

• क्रांतिगीते मिळवून पाठ करा.

 → समूहगान

 मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा 

सामान्यज्ञान 

 • ११ ऑगस्ट १६७१ हा हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजाम-उल्-मुल्क यांचा जन्मदिन. याचे मूळ नाव मौर कमरुद्दीन, हा औरंगजेबांच्या तालमीत तयार झालेला मोगल मुत्सद्दी व युद्धकुशल सेनापती. याने मोगल साम्राज्याच्या पडत्या काळात ते साम्राज्य सावरण्याचा प्रयत्न केला. दक्षिणच्या सुभ्यावर त्याला मराठ्यांशी कायम झगडावे लागे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी त्याची सर्व कारस्थाने हाणून पाडली. माळवा आणि गुजराथ हे प्रांत पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेलेले त्याला पाहावे लागले. मोगल साम्राज्य सावरण्यात यश न आल्याने १७२४ मध्ये त्याने दक्षिणेत स्वतंत्र सत्तेची स्थापना केली. पुढे हैदराबादेस २२५ वर्षे निजाम घराणे राज्य करीत होते. दि. २१ मे १७४८ हा त्याचा निर्वाण दिन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा