→ प्रार्थना
हे मातृभूमी तेरे चरणों में सिर नवाऊँ...
→ श्लोक
-सुखार्थी त्यजते विद्यां, विद्यार्थी त्यजते सुखम् । सुखार्थिनः कुतो विद्या, कुतो विद्यार्थिनः सुखम् ॥
- सुखांच्या मागे लागणारा विद्येला मुकतो, विद्या मिळवू पाहणारा सुखाचा त्याग करतो. सुख हवे तर विद्या कशी प्राप्त होईल? विद्या हवी तर सुख कसे मिळेल?
→ चिंतन
- नैतिक तारेच्या सूराशी कलेच्या तारेचा सूर जुळला नाही, तर जीविताची सतार बदसूर होईल आणि कोणालाही आनंद व्हावयाचा नाही. - वा. म. जोशी
- मानवी जीवनात कलेला फार महत्त्वाचे स्थान आहे. विविध कलांनी मानवी जीवन समृध्द होत असते. पण कलाकारांनी त्याबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे, की आपले वर्तन हे सदाचारयुक्त, नैतिकतेने परिपूर्ण असले पाहिजे. कलेच्या तारेचा सूर नैतिकतेच्या तारेशी जुळला तरच सुंदर संगीत निर्माण होईल. तसे जर झाले नाही तर जीविताची सतार बदसूर होईल आणि त्यामुळे कोणालाच आनंद होणार नाही..
→ कथाकथन - 'मोहिनी'
: एका धिप्पाड व शक्तिमान राक्षसानं आपल्याला सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून शंकराची तपश्चर्या सुरू केली. खडतर अशा तपश्चर्येनंतर शंकर त्याच्या समोर प्रकट झाले व म्हणाले, ' हे राक्षसा! तू केलेल्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा तू कोणताही एक वर माग. मी तो तुला देईन.' यावर तो तामसी वृत्तीचा राक्षस म्हणाला, 'हे शंकरा! मी ज्याच्या ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन, त्याचे त्याचे भस्म होऊन जाईल, अशी सिद्धी तू मला दे. मला दुसरे, तिसरे काहीएक नको.' या राक्षसाला आपण जर हा वर दिला तर तो काय अनर्थ करून सोडील, या गोष्टीचा विचार न करता शंकरांनी 'तथास्तु' म्हणून त्याला तो वर दिला व ते तिथून अंतर्धान पावले. परंतु त्या वरामुळे तो राक्षस एवढा उन्मत बनला, की जो दिसेल व त्याला जो नको असेल, त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचे भस्म करू लागला. जग त्याला 'भस्मासुर' या नावाने ओळखू लागले व त्याचे नुसते नाव | निघाले तरी चळचळा कापू लागत. एकदा तर भस्मासुर प्रत्यक्ष वर देणाऱ्या शंकरांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचे भस्म करण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागला. तेव्हा शंकर मदत मागण्यासाठी विष्णूंकडे गेले. सरळ द्वंद्वयुद्धात या भस्मासुरापुढं आपला निभाव लागेलच अशी खात्री न वाटल्याने भगवान विष्णूंनी अत्यंत सुंदर अशा मोहिनी अप्सरेचे रूप घेतले आणि भस्मासुरासमोर सुंदर अंगविक्षेपांसह नृत्य करायला सुरुवात केली. मोहिनीचे ते अलौकिक रुप पाहून बेभान झालेला भस्मासूर, ती नाचेल तसा नाचू लागला व ती हातवारे करी तसे हातवारे करू लागला. आपल्यावर मोहित झालेला भस्मासुर आता पूर्णपणे देहभान हरपून गेला असल्याचे पाहून, मोहिनीचे रूप घेतलेल्या विष्णूंनी आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला. त्याबरोबर भस्मासुरानेही मोहिनीचे अनुकरण केले आणि आपला हात आपल्या मस्तकावर ठेवून, स्वतःचेच भस्म करून घेतले!
→ सुविचार
•'अविचारानं आत्मघात होतो' - आचार्य जावडेकर
• विचारांचे हत्यार नीट हाताळता यावे, याचेच नाव खरे शिक्षण
• राग आणि द्वेष यांपासून दूर राहणारा मनुष्य आदर्श बनतो.
• द्वेषाला सहानुभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.
• मनुष्य विचारी असेल तर तत्त्वज्ञ बनतो आणि विकारी असेल तर तो बेकार बनतो.
→ दिनविशेष
- पन्नालाल घोष जन्मदिन - १९११
-: पन्नालाल घोष हे सुप्रसिद्ध बासरी वादक. त्यांचा जन्म बारिसाल (बांगलादेश) येथे झाला. त्यांचे वडील अक्षयकुमार घोष हेही उत्तम सतारवादक होते. वयाच्या १४ व्या वर्षापासून पन्नालालने बासरी वाजविण्यास सुरुवात केली. १९४०-४४ या काळात चित्रपटसृष्टीत त्यांनी संगीत दिग्दर्शकाचे काम केले. १९५६ पासून ते आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात वाद्यवृंद निर्देशक होते. १९६० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी संशोधन करून मोठ्या व्यासाची, अधिक लांबीची व परिणामतः अधिक स्वरक्षेत्राची बासरी तयार केली.
→ मूल्ये चिकाटी, परिश्रम, कलाप्रेम
→ अन्य घटना
स्वतः विमान चालवून अटलांटिक महासागर पार करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक अमोलिया इयरहार्ट यांचा जन्म - १८९८
रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानची स्थापना - १९३२
• राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसं आरंभ - १९६८
• माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा व कै. अरुणा असफअली यांना 'भारतरत्न' हा किताब बहाल करण्यात आला - १९९७
→ उपक्रम
• ज्या विद्यार्थ्यांना गायन-वादनाची आवड आहे त्यांना प्रोत्साहन द्यावे गायन-वादनाच्या स्पर्धा आयोजित कराव्यात.
-> समूहगान
- • ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानो का....
→ सामान्यज्ञान
• व्हायोलिन पं. गजानन जोशी, व्ही. जी. जोग, पुष्पलता कुलकर्णी
• तबला - पं. झाकीर हुसेन वाद्य वादक
• सरोद अली अकबर खाँ, झरीन दारुवाला, शरण राणी हार्मोनिअम बासरी
हार्मोनिअम • - गोविंदराव टेंबे, पु. लं. देशपांडे, अप्पा जळगांवकर
बासरी •- पन्नालाल घोष, हरिप्रसाद चौरसिया
• सनई - बिस्मिल्ला खान, बाबूराव खळदकर
• संतुर - पं. शिवकुमार शर्मा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा