→ प्रार्थना
- गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे...
: → श्लोक
- दीनाचा दयाळू, मनाचा मवाळू । स्नेहाळू, कृपाळू जनी दासपाळू तया अंतरी क्रोध संताप केचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।
- जो दीन दुबळ्यांचा कैवारी आहे, मनाने मवाळ (नम्र) आहे, जो प्रेमळ स्वभावाचा आहे, जो सर्वांच्या वर कृपा करणारा आहे, गरिबांचा । रक्षणकर्ता आहे, त्याच्या मनात कोणाविषयी सुद्धा राग (क्रोध) आणि मनातल्या मनात जळफळाट (संताप) असणेच शक्य नाही असा तो परमेश्वराचा (सर्वोत्तमाचा) भक्त (दास) धन्य होय.
→ चिंतन
- आम्ही शांततेचे चाहते आहोत, आमचा मैत्रीचा हात नेहमी पुढे केलेला असतो, तो आपल्या हाती घेण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी घ्यावा. मात्र आमच्या मैत्रीच्या हातामागे असा उंच देह आहे की, जो अन्यायापुढे वाकणार नाही, त्या देहात असे मन आहे की, जे तत्त्वनिष्ठेमुळे कोणालाही शरण जाणार नाही. - लोकमान्य टिळक
→ कथाकथन
- 'लोकनाट्याचे जनक शाहीर अण्णाभाऊ साठे' - (१ ऑगस्ट १९२०, मृत्यू १८ जुलै १९६९)
:- कुरुंदवाड संस्थानातील सटेगाव हे अण्णाभाऊंचे जन्मगाव. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अण्णाभाऊंचे बालपण गेले. मातंग समाजात जन्म, घरात अठराविश्वे दारिद्र, पिता- भाऊ साठे व मातोश्री बालुबाईच्या पोटी हे नररत्न जन्माला आले. त्याकाळात ग्रामीण भागात कमालीची अस्पृश्यता पाळली जात होती. मातंग समाजाला शालेय शिक्षणाचा गंध नाही. घरातील सततच्या उपासमारीने कंटाळून दरकोस दरमुक्काम करीत भाऊ साठे आपल्या चिलापिलांसह मुंबईला आले. अण्णाभाऊंना एकटेच माणसाच्या गर्दीपासून दूर डोंगर, दऱ्या, नद्यांचे काठ, जंगले, गुहा अशा परिसरात फिरण्याचे विलक्षण वेड होते. एकटेच दहा वीस मैलाचा फेरफटका मारून निसर्गाशी एकरूप व्हायचे. निसर्गातील बारकावे अभ्यासायचे व आपल्या टिपेच्या आवाजात लोकगीतांचे सूर आठवत राहायचे. मुंबईत, कल्याण, भायखळा येथील कामगार वस्तीत राहिल्याने कामगारांचे संप, मोर्चा, आंदोलने जवळून बघता बघता एक दिवस अण्णाभाऊ कामगार चळवळीत समाविष्ट झाले. साम्यवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून कम्युनिस्ट पक्षात त्यांनी प्रवेश घेतला. अण्णाभाऊ हाडाचे कलावंत होते.. पाटणेच्या खोऱ्यात बापू साठेचा तमाशाचा फड चांगलाच नावारूपाला आलेला होता. अण्णाभाऊ या फडांत सामील झाले. आपल्या अंगातील कलागुणांचे त्यांनी चीज केले. पुढे अण्णाभाऊ साठे, अमर शेख व शाहीर गव्हाणकर यांनी मिळून १९४४ साली लाल बावटा कलापथक काढले. या कलापथकातून जन जागरणाचे काम चाले. अण्णाभाऊंनी कवने रचायची व शाहीर अण्णाभाऊंनी आपल्या भारदस्त आवाजात गावून दाखवायचे असा शिरस्ताच झाला होता. १९६१ साली ते रशियन जाऊन आले. लिहिणे वाचणे आल्याने अण्णाभाऊंमधील साहित्यिक जागा झाला. कथा, कादंबरी, गीत, लावणी, कवने, स्टॅलीनग्राडचा पोवाडा, अकलेची गोष्ट, माझी मुंबई, खापया चोर इ. गाजलेली वगनाट्ये अण्णांनी लिहिली. त्यांच्या १२ कथावर मराठीत चित्रपट निघाले. अनेकांना लाखाचा धनी बनविणारे अण्णाभाऊ मात्र कोरडेच राहिले. एक बुलंद प्रतिभेचा शाहीर म्हणून ते प्रसिद्ध होते. यश, अपयश, मान, अपमान, अण्णाभाऊंना सतत पाहावा लागला, ताकदीचा दलित साहित्यिक म्हणून त्यांची स्वतंत्र प्रतिमा निर्माण झाली होती. शेवटी पुन्हा एकदा अण्णा एकटे पडले. उपवासकावत राहिलेत. सभोवतालच्या नातेवाईकांनी व भुतावळीने त्यांना अक्षरक्षः नागविले. एका कुंद पावसाळ्यात रविवारी दुपारी ८ जुलै १९६९ रोजी अण्णाभाऊंचे निधन झाले. अण्णाभाऊंच्या शोकांताची विविध कारणे असतीलही परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्र एका प्रतिभावंत लोकसाहित्यिकाला मुकला
→ सुविचार
• साहित्याची शक्ती परमेश्वराच्या शक्तीबरोबरची आहे आचार्य विनोबा भावे
• कवी हा जन्मजात कवी असतो, तो बनवून तसा होत नाही.'
• साहित्यिक, कवी हा राष्ट्राचा प्राण नसला तरी अलंकार आहे.
• ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.
• मोठे कवी, महान तत्त्वज्ञ हे कोणत्याही देशात जन्मले असले तरी हे सर्व जगाचे उपकारकर्ते या नात्याने पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांना आपलेसे वाटत असतात.
दिनविशेष -
• बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन - १९२० :
• रत्नागिरी जिल्ह्यात २३ जुलै १८५६ रोजी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म चिखलगाव | येथे झाला. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून बी.ए. झाले. पुढे त्यांनी वकिलीची सनद घेतली आणि लोकशिक्षण है। त्यांनी आपले जीवितकार्य ठरविले. विष्णुशास्त्री चिपकरांची भेट होताच ते त्यांच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले. पुढे ते केसरीचे संपादक झाले. | केसरीतील त्यांचे लेखन जहाल स्वरूपाचे होते. त्याबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यात त्यांना काळ्या पाण्याची सहा वर्षे शिक्षा होऊन ब्रह्मदेशात मंडाले येथे ठेवण्यात आले. तेथे त्यांनी 'गीतारहस्य' हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. लोकजागृतीसाठी त्यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध जनमत उभे करण्यात त्यांना अपूर्व यश मिळाले. समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत त्यांनी | स्वराज्यासंबंधीचे विचार पोहोचविले म्हणून त्यांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणत. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार गोष्टी त्यांनी आग्रहाने मांडल्या. स्वराज्याचा मंत्र त्यांनी उच्चारताच राष्ट्रीय चळवळीला धार आली. घटना • रघुनाथराव पेशवे यांचा जन्म १७३४. डी. डी. टी. जंतुनाशकाचा शोध १८७४ - - • महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना - १९६२
उपक्रम -
• लोकमान्य टिळकांचे विचार संग्रहित करा.
बाळ गंगाधर टिळकांच्या विविध कार्याची माहिती द्या.
→ समूहगान
बहु असोत सुंदर संपन्न की महा..
→ सामान्यज्ञान
• गंगाधर टिळक उत्तम गणिती होते. ते गणिताचे उत्तम प्राध्यापकही होते. • गणितातील भागाकार, गुणाकार, घात इ. गणनक्रिया लवकर व सुलभतेने करण्यास 'गिरिम' चा फार उपयोग होतो. लॉगचा शोध इ.स. १६१४मध्ये स्कॉटलंडमधील जॉन नेपिअर व स्वित्झर्लंडमधील ज्यूत्स बूर्गी या गणितज्ज्ञांनी लावला. पुढे त्यात अनेक सुधारणा होत गेल्या.
• गुणसूत्रे
• सर्व जीवांचे शरीर पेशींनी बनलेले असते. प्रत्येक पेशीत एक केंद्रक असतो आणि त्यात धाग्यासारख्या काही महत्त्वाच्या संरचना असतात. त्यांना गुणसूत्रे म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा